अभिनव कल्पनांमुळे उद्योजकांना प्रेरणा- केंद्रिय लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. भानुप्रतापसिंह वर्मा यांचे प्रतिपादन.आर.डी. इन्फ्राचे राहुल देशमुख यांना इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड्स सन्मान !


अभिनव कल्पनांमुळे उद्योजकांना प्रेरणा- केंद्रिय लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. भानुप्रतापसिंह वर्मा यांचे प्रतिपादन.


आर.डी. इन्फ्राचे राहुल देशमुख यांना इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड्स सन्मान !

       नवी दिल्ली::- कनझूमर अँड इंडस्ट्रीज तर्फे इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड्स या पारितोषिकाने सुप्रसिध्द उद्योजक आरडी इन्फ्रा इक्विपमेंटचे व्यवस्थापकीय संचालक राहुल देशमुख यांना  केंद्रिय लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. भानूप्रतापसिंह वर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

         या प्रसंगी व्यासपीठावर जमैकाचे राजदूत जासान हॉल, गयाणाचे राजदूत प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते.
        दिल्ली येथील ताज पॅलेस येथे आशिया आफ्रिका बिझनेस अँड सोशल फोरम तर्फे झालेल्या कार्यक्रमात ना. वर्मा म्हणाले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम आहे. यामुळे व्यापार उद्योगांना चालना मिळते आणि नव उद्योजकांना प्रेरणा देणारे ठरते असे सांगीतले.
याप्रसंगी राहुल देशमुख यांनी सांगितले की सातत्याने अभिनव संकल्पनांचा पाठपुरावा केला तर उद्योगात यशस्वी होता येते. निर्यातक्षम उद्योगांच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने आणि सेवा यावर नवउद्योजकांनी अधीक भर देणे गरजेचे असल्याचे सांगीतले.
     या कार्यक्रमास खा. गौतम गंभीर, खा. इंदू गोस्वामी, दक्षिण आफ्रिकेचे राजदूत जोएल राय, उद्योगपती किरण नाडर, तारा भट्टाचार्य, आरडीच्या संचालिका सौ. अंजली देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव