पोस्ट्स

जिल्हा परिषद शाळेत होणार "विनोबा" ऍपचा वापर !जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाउंडेशन मध्ये सामंजस्य करार !

इमेज
जिल्हा परिषद शाळेत होणार "विनोबा" ऍपचा वापर ! जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाउंडेशन मध्ये सामंजस्य करार !      नाशिक : जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुढील काळात जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी "विनोबा ऍपचा" वापर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी ओपन लिंक्स फाउंडेशनकडून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांशी निगडित सर्व प्रकारच्या माहितीचे संकलन हे विनोबा नावाच्या ऍप मध्ये करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, ओपन लिंक्स फाऊंडेशन चे संजय दालमिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.     आचार्य विनोबा भावे शिक्षक सहायक ऍप           शिक्षणाच्या अनुभव बाबतीत शाळेतील ९०% विद्यार्थ्यांवर त्यांच्या शिक्षकांचा प्रभाव असतो. "विनोबा" हा एक माहिती तंत्रज्ञानावर आधारीत ऍप आहे. भारतामध्ये उच्च गुणवत्तेवर आधारीत K -१०  शिक्षण पध्द्ती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.  शिक्षकांचा दैंनदिन कामात

गुजरात विधानसभेतील विजयाचा नाशिक भाजपाकडून जल्लोष...!

इमेज
गुजरात विधानसभेतील विजयाचा नाशिक भाजपाकडून जल्लोष...!           नाशिक- गुजरात विधानसभा निवडणूकीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा १८२ जागांपैकी १५६ पेक्षा अधिक जागांवर भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय  मिळविल्याबद्दल भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत तसेच एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.             या जल्लोषाप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव रेहान मेमण, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, जगन पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, रोहिणी नायडू, काशिनाथ शिलेदार, अरुण शेंदुर्णीकर, सागर धर्माधिकारी, सुरेश पाटील, चंद्रकांत थोरात, फिरोज शेख, माधवी पढार, विजय बनछोडे, शाहिन मिर्झा , शिवाजी गांगुर्डे,  प्रा.कुणाल वाघ, रुची कुंभारकर, हेमंत शुक्ल, चारुदत्त आहेर, सुनिल देसाई, विश्वास पारनेरकर, राकेश पाटील, सोनल दगडे, धनंजय पळसेकर, उदय जोशी, वसंत उशीर, विनायक कस्तुरे, सोनाली कुलकर्णी, सुशमा गोराणे, सुरेश पिंगळे

बहुविकलांग बालकांचा प्रश्न ऐरणीवर !शासनाने सहकार्य करावे ही माफक अपेक्षा !!

इमेज
बहुविकलांग बालकांचा प्रश्न ऐरणीवर ! शासनाने सहकार्य करावे ही माफक अपेक्षा !!       नाशिक ( प्रतिनिधी ) सध्या निराधार, बेवारस बालकांवरील अत्याचाराच्या घटनांनी शहर परिसर हादरुन गेला आहे. नुकताच बाल लैंगिक शोषण प्रतिबंध दिन झाला. आज (दि.३) जागतिक दिव्यांग दिन आहे. घारपुरे घाटाजवळच्या आधाराश्रम संस्थेत वयोमर्यादा पूर्ण केलेली १० बहुविकलांग बालके असून त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांना नियमानुसार योग्य संस्थेत दाखल करण्याची गरज आहे. यानिमित्ताने हे मंथन.    नाशिकमध्ये आधाराश्रम ही संस्था गेली ६८ वर्षे निराधार बालकांना आधार देऊन त्यांच्या संगोपनाचे, पुनर्वसन करण्याचे काम करते. मातापित्यांनी टाकून दिलेली, अनौरस, एकल पालकांची तसेच बेवारस आढळलेली बालके जिल्हा रुग्णालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष व जिल्हा बालकल्याण समिती या संस्थांच्या मार्फत कायदेशीर प्रक्रिया करून आधाराश्रमात दाखल होतात. एक दिवस ते ६ वर्षे वयाचे ३० मुलगे तर एक दिवस ते १२ वर्षे वयाच्या ९० मुली सध्या येथे आहेत. या आकड्यांवरून अजूनही समाजात मुलींना स्वीकारण्याचा दृष्टिकोन किती संकुचित, नकारात्मक व अपरिपक्व आहे हे लक्षात येते. आ

श्री बाबा रामदेवजींचा जम्मा जागरण ५ डिसेंबरला ! नाशिकच्या रामदेवजी भक्त परिवाराने केले आयोजन !

इमेज
श्री बाबा रामदेवजींचा जम्मा जागरण ५ डिसेंबरला !  नाशिकच्या रामदेवजी भक्त परिवाराने केले आयोजन !     नाशिक::- येथील रामदेवजी भक्त परिवारातर्फे ‘ श्री बाबा रामदेवजी यांचा विशाल जम्मा जागरण’ कार्यक्रम सोमवार ५ डिसेंबर २२ रोजी दुपारी १ वाजेपासून ते रात्रीपर्यंत धनदाई लॉन्स येथे आयोजित केला आहे. हैदराबाद येथील संगीतकार व कथाकार सुशिल गोपल बजाज हे हा कार्यक्रम सादर करणार आहे.        या कार्यक्रमात दुपार पासून होम हवन, अखंडज्योत, भजन, जन्म वृत्तांत, कथा ब्यावला, महाप्रसादी व महाआरती होणार आहे.  तर या कार्यक्रमाचे आयोजन समिती तर्फे स्वप्नील जैन, रुपाली गौड, तृप्ती जैन, संजय लोढा, प्रा. सीए. लोकेश पारख, नंदकिशोर हरकुट, सचिन कोठारी हे विशेष परिश्रम घेत आहे.         या जम्मा जागरण सोहळ्यात सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन रामदेवजी भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.

सदाचारी बनो जीवन में आगे बढो !

इमेज
सदाचारी बनो जीवन में आगे बढो !    नासिक::- बॉईज टाऊन पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम व्यक्तिमत्व व बदलत असलेली शिक्षण पद्धती यांचे महत्व सांगण्यासाठी  दि. २५ नोव्हेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.        आजच्या समाजात शिक्षणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शिक्षणाचे बरेच उपयोग आहेत परंतु त्यास एक नवीन दिशा देणे आवश्यक आहे. शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आवश्यक साधन आहे. आपल्या जीवनात शिक्षणाची ही साधने वापरुन आपण काहीही चांगले साध्य करू शकतो. उच्च स्तरीय शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर ठेवण्यास आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षणाचा काळ हा सर्वांसाठी, सामाजिक आणि वैयक्तिकरित्या खूप महत्वाचा काळ आहे, यामुळेच आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व  आहे.आजच्या आधुनिक  आजच्या काळात शिक्षणाची पातळी वाढवण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात हे सांगताना त्यांनी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण व त्याचे फायदे देखील विविध उदाहरणांतून विद्यार्थ्यांसमोर मांडले; तसेच करोना महामारी

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक

इमेज
महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतावर मागील अनेक शतकांत विविध परकीय शक्तींनी आक्रमण केले तरीही आपण कायमच देश म्हणून अखंड राहिलो. संस्कृती, आहार, विचारात विविधता असूनही एवढा मोठा खंडप्राय देश म्हणून कसा टिकला, याचे आश्चर्य वाटते, पण अनेक आक्रमणानंतरही भारताला काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत महाभारत आणि रामायण या दोन महाकाव्यांनी एकत्र जोडून ठेवले, ही साहित्याची ताकद असून ते अमोघ आहे, जोपर्यंत हे दोन ग्रंथ आहेत तोपर्यंत देशाच्या धर्माला धोका नाही. भारताचा एकच धर्म तो म्हणजे साने गुरुजींनी आम्हाला शिकवलेला मानवता धर्म. जगाला प्रेम अर्पावे, हाच आमचा धर्म, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.          यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण पुरस्कार त्यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर,

संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज (२६ नोव्हेंबर, २०२३) संविधान दिन साजरा करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील उद्देशिकेचे ऑनलाइन वाचन आणि प्रश्नमंजुषा याकरिता काल पोर्टल्सचा केला प्रारंभ !

इमेज
संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी  (२६ नोव्हेंबर, २०२३) संविधान दिन साजरा करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील उद्देशिकेचे  ऑनलाइन वाचन  आणि प्रश्नमंजुषा याकरिता काल पोर्टल्सचा केला प्रारंभ ! भारतीय राज्यघटना स्वीकारली गेल्याच्या दिवसाची आठवण  आणि राज्यघटनेच्या निर्मात्यांनी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.                                           यावर्षीही २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमातले सक्रिय सहभागी म्हणून संसदीय कामकाज मंत्रालयाने दोन डिजिटल पोर्टल्स  सुधारित आणि अद्ययावत केले आहेत. खास संविधान दिन, २०२२ साठी केलेल्या या पोर्टल्सपैकी एक राज्यघटनेची उद्देशिका इंग्रजी आणि आणि राज्यघटनेच्या ८ व्या अनुसूचीअंतर्गत नमूद केलेल्या २२ इतर भाषांमध्ये वाचण्यासाठी ( https://readpreamble.nic.in/  ) असून दुसरे  "भारतीय संविधानावरील ऑनलाइन प्रश्नमंजुषा" ( https://constitutionquiz.nic.in/  ) यासाठी आहे. संविधान दिनाच्या पूर