जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी फरशी साफ करतात ! तेव्हा "स्वच्छता ही सेवा" उपक्रमांतर्गत सर्व परिसर स्वच्छ होतो !! सहभागी सर्व खातेप्रमुख व अधिकारी यांचाही उत्स्फुर्त सहभाग !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!
नाशिक – केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आज श्रमदान मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह खातेप्रमुख व कर्मचार्यांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग घेवून स्वच्छता केली. तब्बत दोन तास चाललेल्या या मोहिमेत १५ पोती कचरा जमा करण्यात आला. देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा या मोहिमेस सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या मोहिमेत सहभागी होत अभियानाचा शुभारंभ केला. जिल्हा परिषदेने या अभियानाचे नियोजन केले असून यामध्ये जिल्हास्तरीय कार्यशाळा, सर्व तालुका स्तरावरील कार्यालयांची स्वच्छता, स्वच्छतेविषयक चित्ररथ, १७ सप्टेंबर रोजी सेवा दिवस पासून सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यत श्रमदान मोहीम राबविणे, २५ सप्टेंबर रोजी सर्वत्र स्वच्छता दिवस, तसेच स्वच्छतेची शपथ घेणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, कोरडा दिवस पाळणे, हातपंप स्वच्छता व दुरुस्ती, परिसर स्वच्छता, ग्राम स्तरावरील क