नासिकमध्ये मेट्रो होलसेल स्टोअर्सचे खासदार गोडसेंच्या हस्ते उद्घाटन,भारतातील २६ वे, महाराष्ट्रातील ३ रे, नासिकमधील पहिल्या दालनांस सुरूवात !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

भारतातील मेट्रो कॅश अॅण्ड कॅरीतर्फे नाशिकमध्ये पहिल्या मेट्रो होलसेल स्टोअरचे उद्घाटन.                    मुंबईमधील दोन स्टोअर्ससह मेट्रोचे नाशिकमधील स्टोअर हे महाराष्ट्रातील तिसरे स्टोअर.                                                                    नाशिक-पुणे महामार्गाजवळील तपोवन रोड येथे असलेल्या या नवीन स्टोअरमुळे नाशिक व आसपासच्या भागांमधील ५०० हून अधिक तरुणांना रोजगार मिळणार

नाशिक, १४  सप्टेंबर २०१८ : मेट्रो कॅश अॅण्ड कॅरी या भारतातील सर्वात मोठ्या संघटित होलसेलर आणि फूड स्पेशालिस्ट कंपनीने आज नाशिक-पुणे महामार्गाजवळील तपोवन रोड येथे त्यांच्या पहिल्या मेट्रो होलसेल स्टोअरचे उद्घाटन केले. श्री. हेमंत तुकाराम गोडसे, खासदार - नाशिक,महाराष्ट्र शासन आणि मेट्रो कॅश अॅण्ड कॅरी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरविंद मेदिरत्त यांच्या हस्ते या नवीन स्टोअरचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी,स्थानिक महत्त्वाच्या व्यक्ती आणि प्रमुख पुरवठादार भागीदार देखील उपस्थित होते.

नाशिकमधील नवीन स्टोअर हे मेट्रोसाठी भारतातील २६वे आणि महाराष्ट्रातील तिसरे होलसेल स्टोअर आहे. ४३,००० चौ. फूटांहून अधिक जागेवर विस्तृत पसरलेल्या या नवीन स्टोअरमध्ये पार्किंगसाठी व्यापक सुविधा आहे (१४० हून अधिक कार्स आणि १०० टूव्हिलर्स मावण्याची क्षमता). ज्यामुळे ग्राहकांना सोईस्कर शॉपिंग अनुभव मिळतो. नवीन मेट्रो स्टोअर नाशिक आणि कसारा,इगतपुरी, येवला, शिर्डी, वणी,संगमनेर, लोणी व त्र्यंबकेश्वर यासारख्या आसपासच्या भागांमधील ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासोबतच ५०० हून स्थानिकांसाठी रोजगार देखील निर्माण करेल.

देशातील स्थिर विकासासाठी कंपनीच्या कटिबद्धतेला सादर करतमेट्रो कॅश अॅण्ड कॅरीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरविंद मेदिरत्त म्हणाले, ''आम्हाला पश्चिम भागातील आमच्या उपस्थितीबाबत खूप आशा आहे. मुंबईमधील आमच्या दोन स्टोअर्सना भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आमची उपस्थिती निर्माण करण्याचे कार्य सुरू केले आहे. नाशिकमधील नवीन स्टोअर राज्याप्रती आमच्या कटिबद्धतेला दाखवते. आम्ही विविध प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कार्यसंचालनांमधून ५०० हून अधिक तरुणांसाठी रोजगार संधी निर्माण करत आहोत. नाशिक शहरामध्ये प्रचंड क्षमता आहे आणि आमचे नवीन स्टोअर पश्चिम भारतासाठी महाराष्ट्र व गुजरातमधील आमच्या प्रबळ वितरण नेटवर्कला सादर करते.आमची प्रबळ पुरवठा शृंखला आणि डिजिटल नाविन्यतेमधील सातत्यपूर्ण गुंतवणूकीसह आम्ही आमच्या वाढत्या ग्राहकवर्गाच्या मागण्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो.''

ते पुढे म्हणाले की, ''स्थानिक गरजांची जाण असल्यामुळे आम्ही ताजे पदार्थ, किराणा माल आणि इतर वस्तूंसाठी ग्राहकांचे पसंतीचे ठिकाण आहोत. आमच्या स्टोअरमध्ये अनेक जागतिक दर्जाच्या वस्तूंसोबतच स्थानिक वस्तू देखील आहेत. ज्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देतो.लहान व्यापारी व एमएसएमईंमध्ये आमची चर्चा अधिक होते. त्यांच्या यशावरच आमचा व्यवसाय अवलंबून आहे, यावर आमचा विश्वास आहे. नाशिकमधील स्टोअर हे देशातील आमचे २६वे होलसेल स्टोअर आहे. आम्ही अधिक स्टोअर्सचे निर्माण करत, आमच्या सेवांमध्ये अधिक सुधारणा करत आणि ग्राहकांच्या व्यवसायांवर सकारात्मक परिणाम करणारे उपक्रम राबवत आमची उपस्थिती वाढवण्याचे कार्य सुरूच ठेवू.''

मेट्रोचे नाशिकमधील स्टोअर फूड व नॉन-फूडमधील ६००० हून अधिक उत्पादने ऑफर करेल आणि शहरातील ४०,००० हून अधिक ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करेल. या स्टोअरमध्ये ५००० हून अधिक किराणा स्टोअर्ससोबतच हॉटेल व रेस्तरॉंचे मालक, कॅटरर्स (होरेका);सर्विसेस, कंपन्या व कार्यालये(एससीओ) आणि स्वयंरोजगारीत व्यावसायिक असणार आहेत.

'चॅम्पियन्स फॉर इंडिपेन्डन्ट बिझनेस'म्हणून ओळखले जाणारे मेट्रो सर्व स्थानिक व्यवसायांना मदत करते.मेट्रोमध्ये विक्री करण्यात येणारी ९९ टक्के उत्पादने एसएमई व स्थानिक पुरवठादारांकडून पुरवण्यात येतात.नाशिक स्टोअरमधील विशेष ऑफरिंग्जमध्ये १५ प्रकाराच्या डाळी,नाशिकमधील लोकप्रिय गोठी राइस मिलमधील तांदूळ, स्थानिक व विश्वसनीय राइस मिल्स, आयुर्वेदिक उत्पादनांची व्यापक रेंज, ऑर्गेनिक्स व वेलनेस उत्पादनांचा समर्पित विभाग, आकर्षक दरांमध्ये पोशाख,फूटवेअर, सामान व टेक्सटाइलमधील अव्वल ब्रॅण्ड्स,विविध दरांमधील ग्राहकोपयोगी वस्तू, मुरादाबाद व जयपूरमधील घरगुती सजावटी वस्तूंसारख्या प्रादेशिक स्पेशालिटीज आणि खुर्जामधील स्टोनवेअरचा आहे. या स्टोअरमध्ये काही लोकप्रिय प्रादेशिक ब्रॅण्ड्स देखील आहेत, जसे सपट चहा, रामबंधू मसाला, मुरली सोया बीन ऑईल, इंद्रायणी राइस, स्वदेशी ग्राऊण्ड ऑईल, कोंडाजी चिवडा,अन्नपूर्णा हिंग.

नवीन आऊटलेट 'आकर्षक दर व अद्वितीय दर्जामधील उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध' या मेट्रोच्या वचनाला पूर्ण करते. तसेच ग्राहकांना रोज ताजी फळे व भाज्यांची सुविधा देखील मिळेल.मेट्रो थेट स्थानिक शेतक-यांकडून या वस्तू मागवते. ज्यामुळे प्रांतातील कृषी इकोप्रणाली अधिक सक्षम होते.नाशिकमध्ये मेट्रो थेट पिंपळगाव व लासलगाव ओनियन फार्मर्स मार्केटमधून प्रतिवर्ष ६००० मेट्रिक टन कांदा खरेदी करते आणि भारतातील स्टोअर्समध्ये वितरित करते. ज्याचा फायदा १००० शेतक-यांना होतो. कंपनीचे मंचरमध्ये(आंबेगाव, पुणे) फार्मर कलेक्शन सेंटर आहे आणि ते सेंटर ५०० स्थानिक शेतक-यांकडून त्यांची उत्पादने मिळवते. ज्यामुळे मुंबईमधील त्यांच्या दोन स्टोअर्ससोबत नाशिकमधील स्टोअरच्या ताज्या उत्पादनांची गरज पूर्ण होईल.

उत्पादनांच्या व्यापक रेंजसोबतच व्यावसायिक ग्राहकांना ऑनलाइन/ऑफलाइन ऑर्डरिंग व पेमेण्ट,जीपीएस सक्षम ट्रक्सच्या माध्यमातून दरवाजांपर्यंत डिलिव्हरी, आमच्या कमोडिटी तज्ज्ञांकडून कौशल्य व सहाय्यता आणि खरेदी अनुभव अधिक कार्यक्षम व व्यावसायिक बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रबळ लॉयल्टी प्रोग्रामची देखील सुविधा मिळेल.

मेट्रो भारतातील जवळपास ३ दशलक्ष ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करते.आज कंपनी २६ होलसेल वितरण केंद्रांचे संचालन पाहते आणि ५००० हून अधिक पुरवठादारांच्या गरजांची पूर्तता करते. कंपनीने देशभरात १२,५०० हून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. महाराष्ट्रात मेट्रोचे मुंबईमधील भांडुप व बोरिवली येथे २ लाख चौ. फूटांवर पसरलेले २ होलसेल आऊटलेट्स आहेत. या आऊटलेट्सच्या माध्यमातून २००० हून अधिक कुटुंबांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळाले असून ते ९०,००० अधिक व्यावसायिक ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!