जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी फरशी साफ करतात ! तेव्हा "स्वच्छता ही सेवा" उपक्रमांतर्गत सर्व परिसर स्वच्छ होतो !! सहभागी सर्व खातेप्रमुख व अधिकारी यांचाही उत्स्फुर्त सहभाग !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

नाशिक – केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आज श्रमदान मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह खातेप्रमुख व कर्मचार्यांनी या  मोहिमेत सक्रीय सहभाग घेवून स्वच्छता केली. तब्बत दोन तास चाललेल्या या मोहिमेत १५ पोती कचरा जमा करण्यात आला.

देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा या मोहिमेस सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या मोहिमेत सहभागी होत अभियानाचा शुभारंभ केला. जिल्हा परिषदेने या अभियानाचे नियोजन केले असून यामध्ये जिल्हास्तरीय कार्यशाळा,  सर्व तालुका स्तरावरील कार्यालयांची स्वच्छता, स्वच्छतेविषयक चित्ररथ, १७ सप्टेंबर रोजी सेवा दिवस पासून सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यत श्रमदान मोहीम राबविणे, २५ सप्टेंबर रोजी सर्वत्र स्वच्छता दिवस, तसेच स्वच्छतेची शपथ घेणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, कोरडा दिवस पाळणे, हातपंप स्वच्छता व दुरुस्ती, परिसर स्वच्छता, ग्राम स्तरावरील कार्यालयांची स्वच्छता, शाळा व अंगणवाडीमधील स्वच्छता, पर्यटन स्थळांची स्वच्छता, नाले सफाई, २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्ताने स्वच्छ भारत दिवस पाळणे यासारख्या उपक्रमांचे आयोजन केले आहे.

आज अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व कर्मचारी यांनी हातात झाडू घेवून जिल्हा परिषद आवार, कार्यालय यांची स्वच्छता केली. यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, शिक्षण अधिकारी डॉ वैशाली झणकर, नितीन बच्छाव, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांच्यासह अन्य खातेप्रमुख सहभागी झाले. सकाळी ९ वाजेपासून सुरु झालेले हे अभियान ११ वाजेपर्यंत राबविण्यात आले. यासाठी सर्व विभागांना परिसराचे वाटप करण्यात आले होते. सर्व विभागातील कर्मचार्यांनी यामध्ये सहभागी होवून स्वच्छता केली.

              डॉ गिते फरशी पुसतात तेव्हा...         

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सुरुवातीपासूनच या मोहिमेत सहभागी होवून अडगळीच्या ठिकाणांची स्वच्छता केली. नवीन प्रशासकीय इमारतीमधील थुंकलेल्या जागांची स्वत: सफाई करून रंगलेल्या फरशांची स्वच्छता केली. इतकेच नाही तर प्रवेशद्वारा जवळील जिल्हा परिषद कॅनटीनवर चढून वर असलेल्या घाणीची स्वच्छता केली. स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दीड तास या मोहिमेत योगदान दिल्याने सर्व  अधिकारी व कर्मचारी यांनीही मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला.

--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !