पोस्ट्स

जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी फरशी साफ करतात ! तेव्हा "स्वच्छता ही सेवा" उपक्रमांतर्गत सर्व परिसर स्वच्छ होतो !! सहभागी सर्व खातेप्रमुख व अधिकारी यांचाही उत्स्फुर्त सहभाग !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
नाशिक – केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आज श्रमदान मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह खातेप्रमुख व कर्मचार्यांनी या  मोहिमेत सक्रीय सहभाग घेवून स्वच्छता केली. तब्बत दोन तास चाललेल्या या मोहिमेत १५ पोती कचरा जमा करण्यात आला. देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा या मोहिमेस सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या मोहिमेत सहभागी होत अभियानाचा शुभारंभ केला. जिल्हा परिषदेने या अभियानाचे नियोजन केले असून यामध्ये जिल्हास्तरीय कार्यशाळा,  सर्व तालुका स्तरावरील कार्यालयांची स्वच्छता, स्वच्छतेविषयक चित्ररथ, १७ सप्टेंबर रोजी सेवा दिवस पासून सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यत श्रमदान मोहीम राबविणे, २५ सप्टेंबर रोजी सर्वत्र स्वच्छता दिवस, तसेच स्वच्छतेची शपथ घेणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, कोरडा दिवस पाळणे, हातपंप स्वच्छता व दुरुस्ती, परिसर स्वच्छता, ग्राम स्तरावरील क

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक !! नाशिक(15)::-फ्युचर मेकर कंपनीबाबत सध्या जे अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे ते पोकळ असून कंपनीचे सर्व व्यवहार लवकरच सुरू होण्याचा दावा कंपनीचे वितरक करत आहेत. कंपनीविषयी देशभरांतील वितरकांकडून विश्वास व्यक्त केला जात असुन कुठल्याही प्रकारची तक्रार नसल्याचे सांगून ज्या व्यक्तीने सत्यता नसलेली खोटी तक्रार दाखल केली तो तक्रारदार आता समोर येत नसून लवकरच कंपनीचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत होत असल्याचे पत्रकार परिषदेत व्यावसायिक ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी, बापू ढोमसे यांनी सांगीतले. वस्तू आधारीत (प्राडक्ट बेस) व साखळी पद्धतीच्या नियमांप्रमाणे कंपनी काम करत असुन कुठल्याही वितरकाने कंपनीच्या प्राडक्टची खरेदी केल्यानंतर ते प्राँ डक्ट पसंत न पडल्यास तीस दिवसाच्या आत परत केल्यास कंपनीकडून स्वीकारण्यात आलेली रक्कम परत करण्यात येते यामुळे कोणताही वितरक स्वताहून जोडला जातो. जोडल्या गेलेल्या वितरकाने दिलेल्या रकमेचे प्राँ डक्ट घेणे व वापरणे यांत कुठलाही गैरव्यवहार नसल्याचे बापू ढोमसे यांनी सांगीतले.            काही कुटील प्रवृत्तीच्या स्पर्धक कंपन्यांनी हे षडय

नासिकमध्ये मेट्रो होलसेल स्टोअर्सचे खासदार गोडसेंच्या हस्ते उद्घाटन,भारतातील २६ वे, महाराष्ट्रातील ३ रे, नासिकमधील पहिल्या दालनांस सुरूवात !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
भारतातील मेट्रो कॅश अॅण्ड कॅरीतर्फे नाशिकमध्ये पहिल्या मेट्रो होलसेल स्टोअरचे उद्घाटन.                    मुंबईमधील दोन स्टोअर्ससह मेट्रोचे नाशिकमधील स्टोअर हे महाराष्ट्रातील तिसरे स्टोअर.                                                                    नाशिक-पुणे महामार्गाजवळील तपोवन रोड येथे असलेल्या या नवीन स्टोअरमुळे नाशिक व आसपासच्या भागांमधील ५०० हून अधिक तरुणांना रोजगार मिळणार नाशिक, १४  सप्टेंबर २०१८ : मेट्रो कॅश अॅण्ड कॅरी या भारतातील सर्वात मोठ्या संघटित होलसेलर आणि फूड स्पेशालिस्ट कंपनीने आज नाशिक-पुणे महामार्गाजवळील तपोवन रोड येथे त्यांच्या पहिल्या मेट्रो होलसेल स्टोअरचे उद्घाटन केले. श्री. हेमंत तुकाराम गोडसे, खासदार - नाशिक,महाराष्ट्र शासन आणि मेट्रो कॅश अॅण्ड कॅरी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरविंद मेदिरत्त यांच्या हस्ते या नवीन स्टोअरचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी,स्थानिक महत्त्वाच्या व्यक्ती आणि प्रमुख पुरवठादार भागीदार देखील उपस्थित होते. नाशिकमधील नवीन स्टोअर हे मेट्रोसाठी भारतातील २६वे आणि

तरूणांनी रोजगारस्मार्ट होण्याची गरज-आयुक्त तुकाराम मुंढे , पारंपारिक शिक्षणासोबत कौशल्य असल्यास संवयंरोजगार प्राप्त करून यशस्वी व्हावे !! ६ व ७ सप्टेंबरच्या कार्यशाळेबाबत सविस्तर माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
स्मार्ट सिटीत कौशल्य घेऊन तरूणांनी  रोजगार स्मार्ट होण्याची गरज -आयुक्त तुकाराम मुढे यांची तरुणाईला साद नासिक(५)::-पारंपारिक शिक्षणासोबत प्रत्येकाकडे कौशल्य असल्याच रोजगार किेंवा स्वयंरोजगार प्राप्त करता येईल. नाशिक शहर स्मार्ट होत असतांनाच येथील तरुणांचे जीवन स्मार्ट होणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीत तरुणांनी आपल्या आवडीचे क्षेत्रातील कौशल्य घेऊन रोजगार स्मार्ट होण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी “कौशल्य  विकास कार्यशाळेच्या” उदघाटन प्रसंगी केले. दिनांक 5 ते 7 सप्टेंबर 2018 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत दररोज महापालिका विभागनिहाय “कौशल्य विकास कार्यशाळा” कालिदास कलामंदीर येथे नाशिक स्मार्ट सिटी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांचे विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उदघाटन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नाशिक विभागाचे उपसंचालक सुनिल सैंदाणे, सहायक संचालक संपत चाटे यांचे हस्ते झाले. नाशिक स्मार्ट सिटीच्या कौशल्य विकास प्रकल्प

गुणवंत शिक्षक पुरस्काराने आज तीस शिक्षक गौरविले जाणार ! छायाचित्रात गुणवंत शिक्षकांची नांवे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक: जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण आज सकाळी ११ वाजता परशुराम सायखेडकर सभागृहात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली.                   जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शितल सांगळे यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती यतींद्र पगार तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित, अर्थ व बांधकाम विभागाच्या सभापती मनिषा पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर, समाजकल्याण समिती सभापती सुनिता चारोस्कर, गटनेते धनराज महाले, डॉ. आत्माराम कुंभार्डे, यशवंत गवळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदि उपस्थित राहणार आहेत.  कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी केले आहे.

"लोकांचा पैसा लोकांच्या हितासाठी" हे ब्रीदवाक्य अंगीकारून भारतीय आयुर्विमा महामंडळाची घोडदौड ! आजपासुन एलआयसी सप्ताहाची सुरूवात !! विमाधारकांनी विविध सुविधांचा लाभ घ्यावा- गडपायले, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
आज १ सप्टे . २०१८ , भारतीय आयुर्विमा महामंडळाचा ६२ वा वर्धापन दिन , नासिक::- आज भारतीय आयुर्विमा महामंडळ आपला ६२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असुन १ ते ७ सप्टें. हा एलआयसी सप्ताह महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्ये साजरा केला जाणार आहे अशी माहीती नासिक विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक तुलसीदास गडपायले यांंनी काल पत्रकार परिषदेत दिली.      सप्ताहात कर्मचाऱ्यांसहीत विमा धारकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम, गरजूंना वस्तूंचे वाटप, व्रुक्षलागवड, आरोग्य शिबिर इ..       कोट्यावधी भारतीयांचा विश्वास संपादन केलेली देशातील क्रमांक एकची वित्तीय संस्था असा नांवलौकीक प्राप्त असलेले आयुर्विमा महामंडळ आहे, २९ प्रकारच्या योजना सोबत घेऊन समाजांतील विविध घटकांची विम्याची गरज पूर्ण करीत आहे, पेन्शन, आरोग्य, मुलांसाठीच्या योजना व युलिप योजनांसह उच्चभ्रु ग्राहकांसाठी " जीवन शिरोमणी " ही किमान एक कोटी विमा रक्कम असलेली योजना आहे, " प्रधानमंत्री वय वंदना योजना " ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ % सुनिश्तित दराने दरमहा दहा वर्षांसा

९४ शिक्षकांना दणका ! खोटी माहीती सादर प्रकरणी आढळले दोषी !! एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद, बदली विकल्पही नाही !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
  ९४ शिक्षकांना डाँ.नरेश गितेंचा दणका, कायमस्वरूपी एक वेतनवाढ कायमची बंद तसेच बदली विकल्पही नाही,         नाशिक – शासनाने जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक यांची ऑनलाईन प्रकीयेद्वारे बद्लीप्रक्रिया पूर्ण केली मात्र यामध्ये ज्या शिक्षकांनी विशेष संवर्ग १ व २ मध्ये खोटी अथवा चुकीची माहिती भरून बदल्या करून घेतल्या आहेत अथवा बदलीतून सुट घेतली अशा १९४ शिक्षकांची सुनावणी घेण्यात आल्यानंतर खोटी माहिती भरून शासनाची दिशाभूल करणाऱ्या ९४ शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दणका दिला असून एक वेतनवाढ कायमची बंद करण्यात आली आहे. दोषी ठरल्यामुळे यापुढे त्यांना बदलीसाठी विकल्प भरता येणार नसून अवघड क्षेत्रात काम करावे लागणार आहे.         शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत जिल्ह्यातील १९४ शिक्षकांनी प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती दाखल करून सोयीची बदली पदरात पाडून घेतली होती. यामध्ये प्रामुख्याने चुकीचे अंतर, खोटे वैद्यकीय कारण, पती पत्नी एकत्रीकरण याबाबत  खोटी माहिती भरल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जुलै व ऑगस्ट