पोस्ट्स

गोडसे यांना समस्त बोहरी समाजाने दिला विजयाच्या शुभेच्छांसह आशिर्वाद ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
गोडसे यांना समस्त बोहरी समाजाने दिल्या विजयाच्या शुभेच्छा !           नाशिक- लोकसभा निवडणुकीतील प्रचारात चांगलीच रंगत वाढली असून शिवसेना-भाजप व रिपाई, रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांना विविध स्तरातून वाढणाऱ्या पाठिंब्यामुळे विरोधकांची डोकेदुःखी वाढू लागली आहे. मंगळवारी सकाळी येथील बोहरी व वाल्मिकी समाजातील मान्यवरांच्या गोडसे यांनी भेटी घेतल्या. यापूर्वी विविध समाज-संघटनांनी पाठिंबा जाहीर केला असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास समाजाच्या नेत्यांनी भेटीदरम्यान व्यक्त केला.          येथील बोहरी समाज संघटनेच्या बारुल इमारत येथे गोडसे यांना विजयीभवच्या शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उमेदवार गोडसे यांना समाजाचे धर्मगुरु मुस्ताली भाईसाहेब यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वस्तरातून गोडसे यांना मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे या निवडणुकीत आपले पारडे जड ठरेल असा विश्वास समाजाच्यावतीने व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार देवयानी फरांदे, प्रथमेश विसे, चंद्रकांत

ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचा समीर भुजबळ यांना पाठींबा जाहीर ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचा समीर भुजबळ यांना पाठींबा जाहीर नाशिक,दि.२२ एप्रिल :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना ओबीसी एनटीपार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष संजय कोकरे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांची भेट घेऊन आपला पाठींबा जाहीर केला आहे. यावेळी भरत सोनवणे उपस्थित होते, अशी माहिती भुजबळ यांच्या कडून देण्यात आली.              ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया कडून देण्यात आलेल्या पाठींबा पत्रात  म्हटले आहे की, भारतीय जनगणना आयोग भारत सरकारतर्फे ओ.बी. सी. समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी याचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच नाशिक जिल्ह्याचा सर्वागीण विकासासाठी भटक्या विमुक्त ओबीसी समाजाच प्रतिनिधित्व करणारी संघटना ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया नाशिक लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी पार्टी आघाडीचे उमदेवार समीर भुजबळ यांना जाहीर पाठींबा देत असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडणूक देण्याचा निर्धार करीत आहे.              

मुंबई,पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास करण्यासाठीसमीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी निवडणूक द्या- प्रेरणा बलकवडे ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
मुंबई,पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास करण्यासाठी समीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी निवडणूक द्या- प्रेरणा बलकवडे नाशिक,दि.२२ एप्रिल :- मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास आणि प्रगती साधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केले आहे. तसेच देवळाली भगूर येथून समीर भुजबळ यांना मोठी आघाडी मिळवून देऊ असे त्यांनी म्हटले आहे.              त्यांनी म्हटले आहे की, नाशिकच्या विकासासाठी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे मोठे योगदान आहे. जर्मन टेक्नोलॉजी असलेल्या फ्युनिक्युलर ट्रॉली ही देशात प्रथमच नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर  बसविली,  गंगापूर गावानजीक बचतगटाच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवुन देण्यासाठी दिल्ली हाट च्या धर्तीवर कलाग्राम उभारले.  मात्र युतीच्या खासदाराने केवळ भुजबळांचे नाव मोठे होईल म्हणून त्यांनी उद्घाटन देखिल केले नाही अशा या नाकर्त्या लोकप्रतिनिधीला नाशिककर घराचा रस्ता दाखविल्या

भगूर परिसरातून गोडसेंना विक्रमी मताधिक्य देणार – विजय करंजकर. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
भगूर परिसरातून गोडसेंना विक्रमी मताधिक्य देणार – करंजकर             नाशिक-   स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर शहर व परिसर हा भगव्याचा पाईक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागाने शिवसेनेची पाठराखण केली असून शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यातून लोकसभा निवडणुकीतही ही परंपरा कायम रहाणार आहे. महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांना भगूर पंचक्रोशीतून विक्रमी मते देणार आहे. त्यामुळे देवळाली विधानसभा मतदार संघ हा गोडसे यांना सर्वाधिक मताधिक्य देणारा मतदार संघ ठरणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी व्यक्त केला.                    भगूर येथे शिवसेना, भाजपा, रिपाई , रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खा. गोडसे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन सेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते  करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात करंजकर बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा अनिता करंजकर, भाजपा तालुकाध्यक्ष तानाजी करंजकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, विधानसभा प्रमुख केशव पोरजे, कॅन्टोन्मेंट नगरसेवक बाबुराव मोजाड, युवासेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपु

२४ एप्रिल रोजी गिरणारेत शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गिरणारेत शरद पवार यांची जाहीर सभा नाशिक,दि. २१ एप्रिल :- प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात नाशिक लोकसभा मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत दि.२४ एप्रिल रोजी महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गिरणारे येथे जाहीर सभा होणार आहे. त्याचबरोबर नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक, यांच्या जाहीर सभा होणार असून डॉ.अमोल कोल्हे यांची प्रचार रॅली होणार आहे.

सिडकोतील महिलांनी हेमंत गोडसे यांचे औक्षण करून दिल्या विजयीभव च्या शुभेच्छा !! तरुणांनी काढलेली मोटारसायकल रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सिडकोतील मोटारसायकल रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद शनिवारी सिडको, अंबड भागात मोटारसायकल प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी झालेले उमेदवार खा.गोडसे यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी यांचे औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. या प्रचार रॅलीचा माहोल एवढा उत्साही दिसून आल्याने गोडसे यांना विजयाकडे घेऊन जाणारा ठरणार असून सर्वाधिक मताधिक्य सिडकोतून मिळणार असल्याचा विश्वास आमदार सिमाताई हिरे, सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला.  सकाळी ९ वाजता खा. गोडसे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे लावलेल्या मोटारसायकली घेऊन प्रचार रॅली काढली.  सिडको विभागातील शिवाजी चौक, अंबड पोलीस ठाणे, गोविंदनगर, मोरवाडी, अंबड गाव, राणेनगर, पाथर्डी फाटा, खुटवटनगर आदी भागात ही रॅली काढण्यात आली. यावेळी शिवाजी चुंभळे, कल्पनाताई पांडे,  बंटी तिदमे, डी. जी. सुर्यवंशी, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, किरण गामणे, किरण दराडे, कल्पानाताई चुंभळे, मुकेश शहाणे, कावेरी घुगे, पुष्पा आव्हाड, दिलीप दातीर, अलका अहिरे, दीपक दातीर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गोडसेंच्या विजयात देवळालीचा सर्वोच्च वाटा असणार-बबनराव घोलप ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
गोडसेंच्या विजयात देवळालीचा सर्वोच्च वाटा-घोलप           नाशिक- नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ शनिवारी देवळाली मतदार संघात झंझावाती दौरा करण्यात आला. गोडसेंच्या विजय निश्चित असून त्यांच्या विजयात देवळाली मतदार संघाचा सर्वोच्च वाटा राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले.           एकलहरे गटात शनिवारी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी आयोजित दौऱ्यात घोलप यांनी ठिकठिकाणी मार्गदर्शन केले. सिद्ध पिंप्री, लाखलगाव, गंगापाडळी, कालवी, ओढा, शिलापूर, माडसांगवी, विंचूर गवळी, सुलतानपूर, जाखोरी, चांदगिरी, शिंदे, पळसे या गावांत घरोघरी तसेच मळे विभागात जाऊन गोडसे यांचा प्रचार केला. यावेळी गावागावांत युतीचे नेते व पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. खा. गोडसे व आ. योगेश घोलप यांनी केलेल्या कामांच्या जोरावर मतदारांनी गोडसे यांना दिल्लीत पाठविण्याचा निर्धार केल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखवले. दौऱ्यात उपनेते घोलप यांच्यासह आ. योगेश घोलप, जि.प. सदस्य शंकरराव धनवटे, उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ आग