गोडसेंच्या विजयात देवळालीचा सर्वोच्च वाटा असणार-बबनराव घोलप ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

गोडसेंच्या विजयात देवळालीचा सर्वोच्च वाटा-घोलप
          नाशिक- नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ शनिवारी देवळाली मतदार संघात झंझावाती दौरा करण्यात आला. गोडसेंच्या विजय निश्चित असून त्यांच्या विजयात देवळाली मतदार संघाचा सर्वोच्च वाटा राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले.           एकलहरे गटात शनिवारी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी आयोजित दौऱ्यात घोलप यांनी ठिकठिकाणी मार्गदर्शन केले. सिद्ध पिंप्री, लाखलगाव, गंगापाडळी, कालवी, ओढा, शिलापूर, माडसांगवी, विंचूर गवळी, सुलतानपूर, जाखोरी, चांदगिरी, शिंदे, पळसे या गावांत घरोघरी तसेच मळे विभागात जाऊन गोडसे यांचा प्रचार केला. यावेळी गावागावांत युतीचे नेते व पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. खा. गोडसे व आ. योगेश घोलप यांनी केलेल्या कामांच्या जोरावर मतदारांनी गोडसे यांना दिल्लीत पाठविण्याचा निर्धार केल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखवले. दौऱ्यात उपनेते घोलप यांच्यासह आ. योगेश घोलप, जि.प. सदस्य शंकरराव धनवटे, उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ आगळे, अनिल ढिकले, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, विधानसभाप्रमुख केशव पोरजे, सुभाष ढिकले, हरिभाऊ गायकर, बहिरू जाधव, प्रमोद आडके, पं.स. सदस्य अनिल जगताप, डॉ. मंगेश सोनवणे, उज्वला जाधव, वंदना जाधव, समाधान कातोरे, लिलाबाई गायधनी, नवनाथ गायधनी, आकाश म्हस्के, राजू धात्रक, लकी ढोकणे, प्रकाश बर्वे, भास्कर गोडसे, दिलीप गोडसे, अशोक फडोळ, तुकाराम दाते, बाजीराव जाधव, चंद्रभान तुंगार, सोमनाथ बागुल, नंदू कटाळे, शिवाजी मोराडे, अनिल ढेरिंगे, सुधाकर जाधव, निखिल टिळे, सुरेश टिळे, पांडुरंग पवार, मीराबाई पेखळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।