पोस्ट्स

कामगार चळवळ एकजूट करण्याचा निर्धार- अमर जित कौर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल- संपादक नरेंद्र पाटील !!!!!

इमेज
आयटक च्या शताब्दी वर्षात कामगार चळवळ एकजूट करण्याचा निर्धार- अमर जित कौर              मुंबई: ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) भारतातील पहिली कामगार संघटना आयटक ची स्थापना मुंबई येथे ३१ ऑक्टोबर १९२० रोजी तत्कालीन न्यू एम्पायर थिएटर व्ही.टी. जवळ झाली. लोकमान्य टिळक हे  नियोजित अद्यक्ष होते मात्र ते दिवंगत झाल्या मुळे लाला लजपतराय पहिले अद्यक्ष झाले. त्यांनी पहिल्या स्थापना अधिवेशनात भारताला  संपूर्ण स्वातंत्र्या ची मागणी केली. कामगारांनी स्वताच्या विकासासाठी  संघटित होण्याचे आवाहन केले. देशभरातील वेगवेगळ्या विचाराचे लोक कामगार एकत्र येत होते. देशातील सार्वजनिक उद्योग उभारण्यासाठी कामगार चळवळीचे योगदान तेव्हापासून आजतागायत आहे. एम्पाइज  कॉम्पेजेशन ऍक्ट १९२३ कायदा, ट्रेड युनियन ऍक्ट १९२६, पेमेंट वेजेस ऍक्ट १९३६, इंडट्रीयल डिस्फुट ऍक्ट १९४७, फॅक्टरी ऍक्ट १९४८, पेमेंट बोनस ऍक्ट १९६५, महागाई भत्ता कायदा १९३४,  करण्यासाठी आयटक चे योगदान आहे. आज हे कामगार चळवळीने मिळविलेले कायदे मोडून काढले जात आहेत. यामुळे आज पुन्हा कामगार एकजुटीची गरज निर्माण झाली आहे. आयटक च्या शताब्दी वर्षात त्य

आरोग्य सेवेतील महामेरु दिलीप वैद्य यांचे निधन ! आज पहाटे पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, न्यूज मसाला परीवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली !!!

इमेज
आरोग्य सेवेतील महामेरु दिलीप वैद्य यांचे निधन ! नाशिक जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवेतील कुष्ठरोग तंत्रज्ञ ते  सहाय्यक प्रशासन अधिकारी या पदावरुन सेवानिवृत्त झालेले श्री. दिलीपजी वैद्य उर्फ काका यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी दीपाली, मुले अनुक्रमे मयुर, रोहित, मुलगी अश्विनी, सुन, जावई असा परिवार आहे. दिलीप वैद्य हे नांव नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कर्मचारी यांचेसाठी परिचित असे नाव. नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या हजारो बेरोजगार युवकांना शासकीय सेवेची संधी दिलीप वैद्य यांनी उपलब्ध करुन दिली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवकांना शासकीय नोकरीच्या संधी दिलीप वैद्य यांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या नव्हे गरीब कष्टकरी मुलांचे संसार उभे करण्याचे मोठे काम दिलीप वैद्य यांनी उभे केले असे अभिमानाने नमुद करावे लागेल. श्री. बाळासाहेब ठाकरे, श्री. महेश पैठणकर, श्री. सुभाष कंकरेज,  श्री.राजु निकुंभ व श्री. मधुकर आढाव, श्री.दिपक अहिरे, श्री.श्रीकांत अहिरे, श्री. राजेंद्र बैरागी यासारखे नेतृत्व गुण असणारे आरोग्य सेवेत

तालुक्याच्या इतिहासात सर्वात तरुण आणि अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड नक्की होईल यात शंका नाही ! उमेदवारी मागणीची मुलाखत दिल्यानंतर व्यक्त केला विश्वास !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
तुळजापूर विधानसभा परत एकदा उमेदवारी ची दावेदारी               तुळजापूर (दि.२६)::- भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी साठी योगेश केदार यांनी मुलाखत दिली. पक्षाच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची माहिती वरिष्ठ पातळीवर पाठवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शेखर चर्हेगावकर यांच्यावर असून पक्षाची ही प्रक्रिया आहे. ती पूर्ण करण्याचे काम केदार यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी विश्वासपूर्वक सांगितले की, वरिष्ठ नेतृत्व आणि पक्षावर माझा विश्वास आहे. तालुक्याच्या इतिहासात सर्वात तरुण आणि अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड नक्की होईल यात शंका नाही. मी छत्रपतींचा एक मावळा आहे याचा मला अभिमान आहे, त्यानुसार शासनस्तरावर माझ्या संबंधांच्या जोरावर कोणतेही राजकीय पद नसताना मतदार संघाचे विकासासाठी योगदान देत आहे, अनेक योजनांना मंजूरी मिळवून आणली, काही पूर्णत्वास आल्यात तर काही प्रगतीपथावर आहेत, तुळजापूर मतदार संघाचा विकास हा ध्यास उराशी बाळगून मी सतत कार्यरत आहे व राहील असे त्यांनी पक्षाचा उमेदवारी मागणी अर्ज दाखल केल्यानंतर सांगितले.

बाळ प्रमाणापेक्षा जास्त रडतं ! जुन्या काळातील फंडे क्रमांक-१,. माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा व आपल्या मित्रांना शेअर करा !!!

साप्ताहीक न्यूज मसाला, नासिक, जुन्या काळातील फंडे, क्रमांक-१ "बाळ प्रमाणापेक्षा जास्त रडतं !"                बाळ प्रमाणापेक्षा जास्त रडत असेल व रडणे थांबवायचे असेल तर काही उपाय तुम्हाला ऐनवेळी मदत करु शकतात ! लहान मुलांना आपल्याला काय होत आहे हे सांगता येत नाही. ती फक्त रडून आणि चिडून आपला त्रास व्यक्त करण्यापलीकडे काही करू शकत नाही. यामुळे बाळाचा स्वभाव चिडका होत जातो व बाळ जसजसे मोठे होते तेव्हा त्याच्या मेंदूवर ताण पडत जातो व एका विशिष्ट बुद्ध्यांकाजवळ बाळ येऊन ठेपते. बाळाने दिवसात काही प्रमाणात रडणे हेही शारीरिक बळकटी साठी गरजेचे आहे. मग प्रश्र्न निर्माण होतो की बाळाला रडू द्यावे की नाही ? यावर मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करून पालकांनीच ठरवावे की नक्की बाळ का रडत आहे ? त्याची रडणे हि एकमेव भाषा असून तिचा अर्थ पालकांनी समजून घेतला तर कधी कधी बाळाच्या रडण्याकडे दुर्लक्ष करणेही उचित ठरते. मात्र कारणमीमांसा करताना गल्लत होऊ शकते असं वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बाळाचे पाय उलटे धरुन हलविल्यास (याला ग्रामीण भाषेत "हासली भरणे" म्हणतात), काही सेकंदात ब

जेव्हा झोपडीतील गरीबाच्या मुलाची आमदारकीसाठी मान्यवरांकडून शिफारस केली जाते ! तिकीट घोषित करायला अजून थोडा अवकाश असला तरी मी तरी आनंदाने या मुलासाठी सकारात्मक असेल-चंद्रकांत पाटील !! खालील लिंकवर क्लिक करून सविस्तर वाचा, त्याच कर्तृत्ववान , जिगरबाज मुलाच्या शब्दांत !!!

इमेज
तुळजापूर विधानसभा एक पाऊल अजून पुढे! योगेश केदार यांच्याच शब्दांत ! ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,                चंद्रकांत दादांची आज मुंबईमध्ये भेट झाली. छत्रपती संभाजीराजेंनी माझ्या उमेदवारीसाठी मोहीमच उघडली आहे. श्रीमंतासाठी तर कुणीही शिफारस करेल, पण एक झोपडीत राहणाऱ्या गरीबाच्या मुलासाठी आमदारकीची शिफारस मी करतोय. दादा महाराष्ट्रामध्ये हक्काने मी योगेश केदार चीच सीट मागतोय. मुख्यमंत्री देवेंद्रजीना सुद्धा मी बोललोय. आज पर्यंत मी भाजप कडे काहीच मागितलं नाही, यापुढेही मागणार नाही. अश्याप्रकारे,  माझ्या विषयी राजे आणि दादा जवळपास अर्धा तास चर्चा करत होते.           राजेंनी दादांना सांगितलं की, दिल्लीमध्ये राहून खूप मोठमोठी कामे योगेश नी केली आहेत. जिल्ह्यासाठी सुद्धा अनेक मोठे प्रकल्प घेऊन जाण्यासाठी त्याची धडपड चालू असते. रेल्वे , पासपोर्ट कार्यालय, पाईपलाईन ने गॅस पुरवठा योजना, २१ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, तुळजाभवानी मंदिरासाठी १.५० कोटी रुपये केंद्रशासनाकडून मंजूर(तत्वतः) केले आहेत.          अनेक देशांच्या राजदूतांसोबत वैयक्तिक संबंध प्रस्थापित याने केले आहेत. प्रशासकीय अनुभव

नावाच्या अध्यक्षपदी सचिन गीते तर सरचिटणीसपदी दिलीप निकम ! जाहिरात संस्थांच्या संघटनेची बिनविरोध निवडणूक पार पडली !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नावाच्या अध्यक्षपदी सचिन गीते  तर सरचिटणीसपदी दिलीप निकम नाशिक- दि .25- येथील जाहिरात संस्थांची संघटना नाशिक ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा )च्या नूतन कार्यकारिणिची निवड करण्यात आली असून , अध्यक्षपदी  श्री   ऍडव्हर्टायझिंगचे संचालक सचिन गीते पाटील  यांची तर सरचिटणीसपदी वत्सदा ऍडव्हर्टायझिंगचे संचालक दिलीप निकम  यांची बिनविरोध  निवड करण्यात आली. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल राजभोज येथे संपन्न झाली. मागील कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्याने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली .  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. भाऊसाहेब  गंभीरे  यांनी काम पाहिले. त्यांना संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे व अमोल कुलकर्णी यांनी साह्य केले.  अध्यक्षपदासाठी सचिन गीते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली . त्यावर कोणीही विरोध न दर्शवता गीते यांच्या निवडीला एकमताने  संमती देण्यात आल्याने त्यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी घोषित केले तर दिलीप निकम यांचे सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आले . उपाध्यक्ष पदासाठी श्रीशुभ अँड चे महेश कलंत्री यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली . नूतन अध्यक्

राजलक्ष्मी अर्बन को. आॅप. बॅंक लि. नासिक ची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात बॅंकेचे अध्यक्ष आम. डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ! आमदार डॉ राहुल आहेर यांनी वाढदिवस साजरा न करता होणा-या सर्व खर्चाची रक्कम कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in.

इमेज
नासिक (दि.२४)::- राजलक्ष्मी अर्बन को.आॅप. बॅंक लि.नासिक ची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात बॅंकेचे अध्यक्ष आम. डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.               २२ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या मागील सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तास कायम करून ३१ मार्च २०१९ अखेर संपलेल्या आर्थिक अहवालास मंजूरी देण्यात आली. नफा वाटणीस व लाभांश वाटप, मागीलवर्षी झालेला जादा खर्च व पुढील खर्चाचे अंदाजपत्रक, तसेच एकरकमी परतफेड करणे योजना स्विकारलेल्या व त्याअंतर्गत बंद झालेल्या थकीत कर्ज खात्यांची माहिती ची नोंद घेऊन मंजूरी देण्यात आली, आयत्या वेळी आलेल्या विषयांवर   चर्चा करण्यात आली.            सभा सुरू होण्यापूर्वी आजच भारताचे माजी अर्थमंत्री अरुण जेटलींचे निधन व मागील वर्षभरात बॅंकेशी निगडित, हितचिंतक, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, ज्ञात-अज्ञात व्यक्तिंचे निधन व सीमेवरील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून सभेच्या कामकाजास सुरूवात करण्यात आली.            बॅंकेचे अध्यक्ष आम. डॉ. राहुल आहेर यांचा १६ आॅगस्ट रोजी असलेला वाढदिवस साजरा न करता होणाऱ्या सर्व खर्चाची रक्क