आरोग्य सेवेतील महामेरु दिलीप वैद्य यांचे निधन ! आज पहाटे पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, न्यूज मसाला परीवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली !!!

आरोग्य सेवेतील महामेरु दिलीप वैद्य यांचे निधन !
नाशिक जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवेतील कुष्ठरोग तंत्रज्ञ ते  सहाय्यक प्रशासन अधिकारी या पदावरुन सेवानिवृत्त झालेले श्री. दिलीपजी वैद्य उर्फ काका यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी दीपाली, मुले अनुक्रमे मयुर, रोहित, मुलगी अश्विनी, सुन, जावई असा परिवार आहे.
दिलीप वैद्य हे नांव नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कर्मचारी यांचेसाठी परिचित असे नाव. नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या हजारो बेरोजगार युवकांना शासकीय सेवेची संधी दिलीप वैद्य यांनी उपलब्ध करुन दिली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवकांना शासकीय नोकरीच्या संधी दिलीप वैद्य यांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या नव्हे गरीब कष्टकरी मुलांचे संसार उभे करण्याचे मोठे काम दिलीप वैद्य यांनी उभे केले असे अभिमानाने नमुद करावे लागेल.
श्री. बाळासाहेब ठाकरे, श्री. महेश पैठणकर, श्री. सुभाष कंकरेज,  श्री.राजु निकुंभ व श्री. मधुकर आढाव, श्री.दिपक अहिरे, श्री.श्रीकांत अहिरे, श्री. राजेंद्र बैरागी यासारखे नेतृत्व गुण असणारे आरोग्य सेवेतील बुजुर्ग नेतृत्व दिलीप वैद्य यांचे मार्गदर्शनाखाली घडले हे प्राधान्याने नमुद करावे लागेल.
दिलीप वैद्य शासकीय सेवेत कार्यरत असतांना त्यांनी आरोग्य कर्मचारी संघटन, जिल्हा परिषद विविध संवर्ग कर्मचारी संघटन याबाबत कायम कार्यरत राहुन कर्मचारी हिताच्या दृष्टीने काम करत राहिले. शासकीय पटलावर काम करत असताना नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांचेशी सलोख्याचे संबंध ठेऊन गरजु घटकासाठी आपल्या ओळखीचा वापर करुन दिन दुबळ्यांची सेवा करणे तथा त्यांना आधार देण्याचे काम दिलीप वैद्य यांनी केले हे अभिमानाने नमुद करावे लागेल.
त्यामुळेच सन १९८० ते २००० या दोन दशकात दिलीप वैद्य हे नांव नाशिक जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार यांना मोठ्या प्रमाणात परिचित होते, नव्हे नुसते परिचितच नव्हते तर त्यांनी या काळात अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेच्या संधी उपलब्ध झाल्या असतील त्या ठिकाणी शासकीय सेवेत पात्र होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळेच सन १९८० ते २००० या वीस वर्षाच्या कालखंडात हजारो तरुण पिढीस  शासकीय सेवेत दाखल होण्याची संधी दिलीप वैद्य यांच्यामुळे मिळाली हे प्राधान्याने नमुद करावे लागेल.
दिलीप वैद्य यांचे शरीरयष्टी मध्यम बांधा, उंच शरीर यष्ठी, गोरेपान, लांबनाक व एखाद्या मोठ्या उत्तुंग  शासकीय अधिकारी यासारखा रुबाबदार असा त्यांचा पेहराव होता. नाशिक जिल्हा परिषदेत कुठलेही शासकीय काम कुणाचे अडले असेल तर त्यावेळी दिलीप वैद्य या नावाचा आधार घेऊन अडचणीतून मार्ग काढण्याचे माध्यम म्हणुन ते काम करत असत.
श्री.दिलीप वैद्य यांच्या अकाली जाण्याने नाशिक जिल्ह्यातील समस्त आरोग्य कर्मचारी यांचेसह सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दुःख झालेले आहे. स्वर्गवासी दिलीप वैद्य यांच्या जाण्याने वैद्य कुटुंबांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून सावरण्याची देव त्यांना शक्ती देवो ही प्रार्थना !
लेखन:- जी.पी. खैरनार, नाशिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात शिक्षकांना पदस्थापना ! शून्य शिक्षक शाळांना मिळाले २० शिक्षक !!