बाळ प्रमाणापेक्षा जास्त रडतं ! जुन्या काळातील फंडे क्रमांक-१,. माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा व आपल्या मित्रांना शेअर करा !!!

साप्ताहीक न्यूज मसाला, नासिक,

जुन्या काळातील फंडे, क्रमांक-१

"बाळ प्रमाणापेक्षा जास्त रडतं !"

               बाळ प्रमाणापेक्षा जास्त रडत असेल व रडणे थांबवायचे असेल तर काही उपाय तुम्हाला ऐनवेळी मदत करु शकतात !
लहान मुलांना आपल्याला काय होत आहे हे सांगता येत नाही.
ती फक्त रडून आणि चिडून आपला त्रास व्यक्त करण्यापलीकडे काही करू शकत नाही. यामुळे बाळाचा स्वभाव चिडका होत जातो व बाळ जसजसे मोठे होते तेव्हा त्याच्या मेंदूवर ताण पडत जातो व एका विशिष्ट बुद्ध्यांकाजवळ बाळ येऊन ठेपते. बाळाने दिवसात काही प्रमाणात रडणे हेही शारीरिक बळकटी साठी गरजेचे आहे. मग प्रश्र्न निर्माण होतो की बाळाला रडू द्यावे की नाही ? यावर मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करून पालकांनीच ठरवावे की नक्की बाळ का रडत आहे ? त्याची रडणे हि एकमेव भाषा असून तिचा अर्थ पालकांनी समजून घेतला तर कधी कधी बाळाच्या रडण्याकडे दुर्लक्ष करणेही उचित ठरते. मात्र कारणमीमांसा करताना गल्लत होऊ शकते असं वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
बाळाचे पाय उलटे धरुन हलविल्यास (याला ग्रामीण भाषेत "हासली भरणे" म्हणतात), काही सेकंदात बाळाचे रडणे थांबते व बाळाच्या चेहऱ्यावर हसू येते, हा उपाय आमचे आजी-आजोबा करीत हे मी बघीतले आहे म्हणून आपल्याशी जुन्या काळातील फंडे मधून शेअर करीत आहे.
    दुसरा उपाय बाळाच्या तळपायाला केस विंचरण्याच्या कंगव्याने वा तत्सम वस्तूने किंवा आपल्या हाताच्या बोटांनी काही सेकंद मसाज केला (दोन तीन मिनिटांत पाच-सहा वेळा) तर बाळाचे रडणे थांबवता येईल.
बाळाचे रडण्याला वैद्यकीय भाषेत रिफ्लेक्सोलॉजी असं म्हणतात.
यावर एक हिलिंग पद्धती आहे. चिनी वैद्यक शास्त्रामध्ये पूर्वापार तीचा वापर दिसतो. तळपायावरील काही बिंदूवर दाब दिल्यास अनेक व्याधीही दूर होतात असं या शास्त्रातून दिसून येते. शरीरात सकारात्मक परिवर्तन घडतं आणि वेदना कमी होतात. पोटातील अतिरिक्त गॅस, गुब्बारा कमी होतो व बाळ शांतपणे झोपी जाते किंवा खेळण्यात दंग होते.
बाळ रडण्यामागे अनेक कारणे असतात, मात्र नाक चोंदणे, श्र्वास घ्यायला त्रास होणे, किंवा कारण लक्षात येत नसेल तर तत्काळ डॉक्टरांकडे घेऊन जावे.
सूचना::- जुन्या काळातील फंडे या सदराखाली सदर माहिती दिलेली आहे, ती स्वानुभवावर आधारित आहे, वापरकर्त्याला हा सल्ला, संदेश आहे असे समजू नये, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यात यावा ही विनंती,
डॉक्टरांनी सदर उपाय योग्य आहे असे सांगीतले तर ऐनवेळी डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नसतील तर आपल्या परीने प्राथमिक प्रयत्न कराता येऊ शकतो,

शब्दांकन-नरेंद्र पाटील,
संपादक-न्यूज मसाला, नासिक,
+९१ ७३८७३३३८०१
+91 7387333801

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात शिक्षकांना पदस्थापना ! शून्य शिक्षक शाळांना मिळाले २० शिक्षक !!