५ जून, जागतिक पर्यावरण दिवस, निसर्गाच्या लयतत्वाशी इमान राखणारी आदिवासी वारली जीवनशैली व कलासंस्कृती !! निसर्गाच्या वरदानाविषयी कृतज्ञभाव व्यक्त करणे काळाची गरज !!! आपणही करुया जपणूक !!!
पर्यावरणपूरक वारली कलासंस्कृती दरवर्षी दि.५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. आदिवासी वारली जीवनशैली व कलासंस्कृती पर्यावरणाशी कमालीचा समतोल साधते. निसर्गाच्या लयतत्त्वाशी इमान राखते. ही जमात निसर्गस्नेही असून पर्यावरण संरक्षण, संवर्धन हा त्यांच्या साध्यासुध्या व अत्यंत कमी गरजा असलेल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. दुर्गम भागात निसर्गाच्या सान्निध्यात रममाण झालेल्या वारली लोकांना कसलाही हव्यास नसतो. निसर्गाच्या जीवनचक्राला ते खीळ घालत नाहीत. वारली चित्रशैलीत निसर्गातील झाडे, वेली, पशुधन, पक्षिजगत,माणसाचे दैनंदिन जीवन यांना महत्त्वाचे स्थान आहे.म्हणूनच आदिवासींना जल, जमीन, जंगलांचे अधिकार मिळायला हवेत. वारली ही प्राचीन काळापासून दुर्गम अशा जंगल, डोंगराळ प्रदेशात वास्तव्य करून राहणारी प्रमुख आदिवासी जमात आहे. 'वारलं' म्हणजे जमिनीचा तुकडा ! त्यावर उदरनिर्वाह करणारे म्हणून त्यांना 'वारली' संबोधले जाते. सह्याद्रीच्या डोंगररांगांत असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील वरच्या भागात मोठ्या प्रमाणावर वस्ती असणारे म्हणूनही 'वरले'- 'व