क्यूआर कोड स्कॅन करा आणि चित्रफीती बघा ! कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांचे डांगी आणि अहीराणी भाषेत आवाहन ! जनजागृती साठी आंतरराष्ट्रीय धावपटूही करणार प्रबोधन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!






आदिवासी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्हा परिषदेची जनजागृती
मोहीम !

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे डांगी व अहिराणी भाषेतून आवाहन तर आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत देखील करणार प्रबोधन

         नाशिक - जिल्ह्यातील आदिवासी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसिकरणाबाबत मोठ्या प्रमाणात अफवा आहेत, यामुळे आदिवासी भागातील नागरिक लसिकरणासाठी पुढे येतांना दिसत नव्हते त्याचबरोबर कोरोना उपचारांबाबत या भागात अनेक गैरसमज पसरले असल्याने कोरोना उपचार घेण्यास टाळा-टाळ करतांना काही ठिकाणी आढळले, यावर जनजागृती करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण व कोरोना उपचार जनजागृती ही विशेष मोहीम जिल्हा परिषदेच्या वतीने आमलात आणली गेली असुन यामार्फत लसीकरण झालेल्या नागरिक त्याचबरोबर कोरोना वैद्यकीय उपचार घेतलेल्या नागरिकांचे अनुभव, जिल्हा परिषद शाळा उंबरपाडा ता.सुरगाणा येथील शिक्षक रतन चौधरी यांचे लस घेण्याबाबतचे आवाहन याविषयी चित्रफिती तयार करण्यात आल्या असुन समाजमाध्यमांद्वारे या जनजागृतीपर चित्रफितींची प्रचार प्रसिद्ध केली जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर या सर्व चित्रफिती प्रकाशित करण्यात आल्या असुन आदिवासी भागातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेचे कर्मचारी व नागरिकांना देखील या चित्रफिती सोप्या पद्धतीने बघता याव्यात आणि त्यांची प्रसिद्धी आपापल्या स्तरावर करता यावी यासाठी QR कोड देण्यात आला आहे, हा कोड स्कॅन केल्यास अथवा लिंकद्वारे या सर्व चित्रफिती बघता येणार आहेत.
लिंक - https://youtube.com/playlist?list=PLn_9lNt7gDxQ43FS5MBzPa6Z7fMrWZDu9

सीईओंचे डांगी, अहिराणीतुन नागरिकांना आवाहन

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सुरगाणा व पेठ यातील काही भागात बोलल्या जाणा-या 'डांगी' आणि कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या भागात बोलल्या जाणा-या 'अहिराणी' भाषेतून नागरिकांना कोरोना लस घेण्याबाबत आवाहन केले आहे, मी स्वतः लशीचे दोन्ही डोस घेतले मला काहीही झाले नाही तुम्ही देखील लस घ्या आणि सुरक्षित रहा असे आवाहन त्यांनी याद्वारे केले.

जिल्हा परिषदेच्या लसीकरण जनजागृती मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतांचा पुढाकार !

जिल्ह्यातील आदिवासी भागात कोरोना लसिकरणाच्या जनजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या आवाहनास प्रतिसाद देत स्वत: चित्रफितीद्वारे नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मोहिमेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत थेट आदिवासी भागात जाऊन जनजागृती करणार असल्याचे सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।