पोस्ट्स

ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याची समाजाला गरज आहे -पोलीस निरिक्षक सीताराम कोल्हे. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याची समाजाला गरज आहे -पोलीस निरिक्षक सीताराम कोल्हे पंचवटी (दि.२० सप्टेंबर) - या आध्यात्मिक वातावरणात येऊन मला खूप छान वाटले.  बाहेर समाजात फिरताना ताण-तणावाला सामोरे जावे लागते. मात्र येथे दहा मिनिटातच मला सुख शांतीची अनुभूती झाली. ब्रह्माकुमारी संस्थेचे कार्य महान आहे.   या कार्याची समाजाला गरज आहे. समाजात फोफावत चाललेली गुंड प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अध्यात्मिक ज्ञान गरजेचे आहे, हे ब्रह्मकुमारी संस्थेने अधोरेखित केले आहे.  समाजसुधारणेचे हे महान कार्य ब्रह्माकुमारी संस्था करीत आहे असे प्रतिपादन पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी केले.  दिनांक १९ सप्टेंबर रोजी  ब्रह्माकुमारी संस्थेच्या पंचवटी सेवाकेंद्रात  राजयोग शिबीराच्या समापन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक रोड सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी प्रा. सुरेश साळुंखे, ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी, सप्तशृंगी मित्रमंडळाचे सतनाम राज

आरोग्य कर्मचारी यांच्यावरील मारहाणीच्या निषेधार्थ सर्व संघटना एकवटल्या, दोषी व्यक्तींवर ३५३ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन दिले ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
सिन्नर तालुक्यातील पास्ते येथील आरोग्य कर्मचारी यांच्यावरील मारहाणीच्या निषेधार्थ सर्व संघटना एकवटल्या .दोषी व्यक्तींवर 353 कलमान्वये गुन्हा दाखल  !          सिन्नर::-तालुक्यातील पास्ते येथे कोविड लसीकरण सत्राच्या कामकाजात हस्तक्षेप करुन महिला व पुरुष आरोग्य कर्मचारी यांच्यावर जीवघेणा हल्ला करुन मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कलम ३५३  लावावा व दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व संवर्ग संघटना एकत्र झाल्या व त्यांनी जिल्हा परिषद आवारात सदर घटनेचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.       संबंधित दोषी व्यक्तींवर ३५३ कलम लावण्यासंदर्भात तसेच लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळावे, सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन संघटनांची बोलणीसाठी सर्व खाते प्रमुख यांनी वेळ द्यावा अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर दोषी व्यक्तींवर ३५३ कलम लावण्यासंदर्भात सिन्नर पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा व तेथे सदर केस दाखल करणे संदर्भात दुजोरा दिल

अनंतरूपी वारली चित्रकला ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
अनंतरूपी वारली चित्रकला !     आदिवासी वारली चित्रकला अनंत रूपांतून बघायला मिळते. काही ठिपके, सरळ, आडव्या, तिरप्या व लयदार रेषा आणि त्रिकोण, वर्तुळ, चौकोन या मूलभूत आकारांचा वारली चित्रे रेखाटण्यासाठी वापर केला जातो. तांदळाच्या पिठाचा पांढराशुभ्र रंग गडद पार्श्वभूमीवर उठून दिसतो. अतिशय अल्प सामग्री वापरूनही सुंदर दिसणारी वारली चित्रांमधली आशय-विषयांची विविधता थक्क करते.अनंत अज्ञात वारली कलाकारांनी ११ शतके योगदान देऊन हे आदिम कलेचे दालन समृद्ध केले आहे. आज अनंत चतुर्दशी आहे, त्या निमित्त हा धांडोळा...    डोंगरदऱ्यांमध्ये, रानावनात दुर्गम पाड्यांवर निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासी वारली जमात राहाते. निसर्गाच्या बरोबरीने आपल्या परंपरा जोपासणारे निरागस वारली स्त्रीपुरुष झोपडीची भिंत चित्रांनी सजवून आनंद व्यक्त करतात. एका प्रकारे ते आदर्श डिझाइनर आहेत! अबोल आदिवासी वारली कलावंत आपल्या अनोख्या व साध्यासोप्या चित्रशैलीद्वारे आकारांमधून बोलतात, मनापासून व्यक्त होतात. त्यांच्या डोळ्यांना जसं दिसतं, जाणवतं तसं ते रेखाटतात. आकाशात विहार करताना पक्ष्यांना जशी सृष्टी दिसते तशाच प्रकारचे हे वै

सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेतील ‘नो हायपर टेन्शन’ पुस्तक ठरणार उपयुक्त मार्गदर्शक सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
‘नो हायपर टेन्शन’ पुस्तक ठरणार उपयुक्त मार्गदर्शक नाशिक । प्रतिनिधी आज ३० ते ५० उमेदीच्या वयोगटातील युवापिढी हृदयरोगाचा विळखा पडत आहे. या आजाराची भीषणता लक्षात घेता हृदयरोगासबंधी प्रबोधन व्हावे, याची लक्षणे, कारणे समजावित आणि तो होऊ नये याकरिता आहार, व्यायाम, जीवनशैली यासह याविषयीचे गैरसमज दूर व्हावे या उद्देशाने  सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करण्यासाठी ‘नो हायपर टेन्शन’ पुस्तक लिहले आहे, अशी माहिती प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अतुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. अतुल पाटील यांनी बंंगळुरू येथून कार्डिऑलॉजीचे शिक्षण घेतले आहे. नाशिकमध्ये ते सध्या आशा हार्ट केअर क्लिनिकच्या माध्यमातून रूग्णसेवा देत आहेत. या दरम्यान त्यांनी अनुभवले की कमी वयात कारकीर्द घडवण्याच्या काळात यूवापिढी हृदयरोगाने ग्रासते आहे, हे वास्तव त्यांना अस्वस्थ करत होते आणि हे कुठेतरी थांबायला हवे या उद्देशाने ‘नो हायपर टेन्शन पुस्तक लिहण्याचे त्यांनी ठरवले.   उच्च रक्तदाब असणार्‍या रुग्णांचे प्रमाण देशात २५ ते ३० टक्के आहे अशी माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्यां लॅनसेट या वैद्यकीय पत्रिकेत प्रसिद्ध

खामखेडा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात सुरुवात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
खामखेडा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात सुरुवात महेश शिरोरे यांजकडून-       देवळा::- तालुक्यातील खामखेडा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रँथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच किर्तन महोत्सव सोहळ्यास सुरुवात करण्यात आली असून आठ दिवस हा सोहळा असून  या अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे खामखेडा गावातील एक विस्मरणीय असा एक नावीन्यमय सप्ताह म्हणून कसमादे परिसरात नावारूपास आला असून तरुण मंडळाच्या या कार्याला यश आले असून कसमादे परिसरातील आलेल्या श्रोत्यांनी तर मंडळाचे गोड कौतुक ही केले. या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दैनंदिनी कार्यक्रम पहाटे ५ वाजता  काकडा आरती , सकाळी ८ ते १० व दुपारी ३ ते ५ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण , सायंकाळी ६ ते  ७ हरिपाठ ,व रात्री ९ ते ११ या वेळेत हरिकीर्तन  अशी कार्यक्रमाची रुपरेषा आहे.ह भ प समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरिकर, ह भ प . प्रेममुर्ती अनिल महाराज वाळके, , ह भ प ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर , ह भ प वेंदांतचार्य रामेश्वर महाराज भोजने,  ह भ प भागवताचार्य समाधान महाराज भोजेकर,  ह भ प धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते, ह भ प रामकृष्ण महार

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वातंत्र्य दिनाचेअमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वातंत्र्य दिनाचेअमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन नाशिक - भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन शाश्वत स्वच्छतेसाठी काम करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.          नाशिक जिल्हा मार्च २०१८ मध्ये हागणदारी मुक्त घोषित झाला असून पायाभूत सर्वेक्षणानुसा कुटुंबांकडे शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत शौचालयांचा नियमित वापर व्हावा, नादुरुस्त शौचालय दुरुस्त व्हावीत, गावातील व परिसराची स्वच्छता राहावी यासाठी सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनासह शाश्वत स्वच्छतेवर काम करण्यात येत आहे. याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात १ सप्टेंबर २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ यादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.        सत्याग्रह से

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
स्त्री आत्मनिर्भर  बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा महेश शिरोरे यांजकडून         कळवण(१३)::-पद्मश्री नीलिमा मिश्रा यांनी स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल . कोणत्याही क्षेत्रात संघटित होऊन काम केल्यावर निश्चित पणे आपल्याला यशस्वी होता येते. बचत गटांमार्फत ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी रोटरी क्लब ने पुढाकार घ्यावा असे सांगितले. रोटरी क्लब ऑफ कळवण तर्फे राष्ट्र निर्मितीसाठी शिक्षणक्षेत्रात सेवाभावी समाजाभिमुख कामगिरी केल्याबद्दल दरवर्षी दिला जाणारा नेशन बिल्डर टीचर्स अवार्ड या मानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री निलिमा मिश्रा बोलत होत्या. याप्रसंगी श्री गुरुदत्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.जे.डी.पवार, गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव, विस्ताराधिकारी शितल कोठावदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश भामरे, सचिव संभाजी पवार, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा नयना पगार, सचिव निर्मला संचिती रोटरॅक्ट अध्यक्ष केतकी पगार, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश भामरे यांनी केले तसेच विलास शिरोरे यांनी रोटरी कार्याची माहिती दिली

गंभीर आजाराशी लढणाऱ्या 'राजाभाऊं' च्या जखमांवर कोणी फुंकर घालणार का? दिलेल्या फोन नंबरवर व्हिडिओ काॅल करून खात्री पटली तरच मदत करा अशी आर्त विनवणी !! दानशूर संस्था, नागरिकांकडून औषधोपचारासाठी मदतीची अपेक्षा !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि बोडकेंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊया- संपादक न्यूज मसाला !!

इमेज
गंभीर आजाराशी लढणाऱ्या 'राजाभाऊं' च्या जखमांवर कोणी फुंकर घालणार का? दानशूर संस्था, नागरिकांकडून औषधोपचारासाठी मदतीची अपेक्षा नाशिक : प्रतिनिधी ::- तब्बल आठ वर्षांपासून एका गंभीर आजाराशी मोठ्या धैर्याने लढा देणाऱ्या सिडकोतील  'राजाभाऊ' म्हणून सुपरिचित असणाऱ्या राजेंद्र बोडके यांच्या जखमांवर कोणी फुंकर घालणार का? अशी आर्त हाक त्यांच्या कुटुंबीयांनी घातली आहे. अत्यंत दुर्मिळ आणि खर्चिक आजारावर मात करण्यासाठी बोडके कुटुंबीयांनी आजपर्यंत  २० लाखांहून अधिक खर्च केला आहे. मात्र आता त्यांचे वेतनही बंद केल्याने हा खर्च त्यांना पेलवत नसल्याने दानशूर व्यक्ती, संस्था आणि नागरिकांकडून औषधोपचारासाठी मदतीचे आवाहन त्यांनी केले आहे. सिडकोतील राणाप्रताप चौक येथील रहिवासी असलेले  राजेंद्र रघुनाथ बोडके हे  पंचायत समिती कर्मचारी असून, त्यांना सन २०१३ पासून 'हिड्राडेनिटिस सुपराटिव्हा' या त्वचेच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे. आधी बरेच दिवस या आजाराचे गांभीर्य लक्षात आले नाही. जेव्हा लक्षात आले तेव्हा या आजाराने गंभीर रूप धारण केले होते. आता तर दोन वर्षांपासून या आजाराचा गंभीर त्रा

कोरोना साथरोग काळात आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी यांचे कार्य जनतेस जीवदान देणारे ठरत आहे ! - रवींद्र परदेशी ! ५ टक्के नफा वाटणीसह आकस्मित निधन झालेल्या सभासदाच्या वारसास चार लाखाचा विमा देणार- मधुकर आढाव. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कोरोना साथरोग काळात आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचारी यांचे कार्य जनतेस जीवदान देणारे ठरत आहे ! - रवींद्र परदेशी !                                                               नाशिक::- जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेच्या ५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे चेअरमन मधुकर आढाव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमित्ताने निवृत्त आरोग्य कर्मचारी सन्मान सोहळा व सभासद पाल्य गुणगौरव सोहळा गुगुल मिट ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे प्रातिनिधिक स्वरुपात नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्रसिंह परदेशी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.           मुख्य अतिथी म्हणुन उपस्थितांना संबोधित करतांना नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी नमूद केले की आरोग्य कर्मचारी पतसंस्था सभासदांना सहा लक्ष रुपये तात्काळ कर्ज व  विमा सुरक्षा कवच योजना प्रभावीपणे राबवत आहेत ही अभिनंदनीय बाब आहे. कोरोना साथरोग काळात ग्रामीण भा

पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट         मंचर जि. पुणे (प्रतिनिधी)::- पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी आणि पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यापुर्वी त्याची सत्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपासावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली. एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या शिष्टमंडळाने आज दिलीप वळसे पाटील यांची मंचर येथे भेट घेतली. शिष्टमंडळात परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील लोणकर आणि परिषदेचे माजी विभागीय चिटणीस डी. के. वळसे पाटील यांचा समावेश होता. गृहमंत्र्यांशी चर्चा करताना एस. एम. देशमुख यांनी राज्यात पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगितले. गेल्या दोन दिवसांत मुंबई, चाकुर, श्रीगोंदा आदि ठिकाणी पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. या प़करणील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचा मागणी एस.एम.देशमुख यांनी केली. राज्यात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांची कोंडी करण्याच्या घटना वाढीस लागल्