खामखेडा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात सुरुवात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!




खामखेडा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात
सुरुवात

महेश शिरोरे यांजकडून-
      देवळा::- तालुक्यातील खामखेडा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रँथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच किर्तन महोत्सव सोहळ्यास सुरुवात करण्यात आली असून आठ दिवस हा सोहळा असून  या अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे खामखेडा गावातील एक विस्मरणीय असा एक नावीन्यमय सप्ताह म्हणून कसमादे परिसरात नावारूपास आला असून तरुण मंडळाच्या या कार्याला यश आले असून कसमादे परिसरातील आलेल्या श्रोत्यांनी तर मंडळाचे गोड कौतुक ही केले.
या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दैनंदिनी कार्यक्रम पहाटे ५ वाजता  काकडा आरती , सकाळी ८ ते १० व दुपारी ३ ते ५ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण , सायंकाळी ६ ते  ७ हरिपाठ ,व रात्री ९ ते ११ या वेळेत हरिकीर्तन  अशी कार्यक्रमाची रुपरेषा आहे.ह भ प समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरिकर, ह भ प . प्रेममुर्ती अनिल महाराज वाळके, , ह भ प ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर , ह भ प वेंदांतचार्य रामेश्वर महाराज भोजने,  ह भ प भागवताचार्य समाधान महाराज भोजेकर,  ह भ प धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते, ह भ प रामकृष्ण महाराज, ह भ प प्रकाश महाराज बोधले, ह भ प नागेश्वरी ताई झाडे  यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता करण्यात येणार असून,या किर्तना मध्ये कीर्तनकार महाराजांच्या मधुर वाणीतून झाडे वाचवा, पाणी ,देश संस्कृती , लेक व माता , धर्म ,नीती, न्याय ,पर्यावरण, जगाचा अन्नदाता, पोशिंदा शेतकरी, व देशांचे रक्षण करणारे जवान वाचवा, आणि दहशतवाद ,भ्रष्टाचार, व्यसने ,गर्व, स्वार्थ, भ्रूणहत्या, वृद्धाश्रम हटवा म्हणजेच आपल्या आई वडिलांना सांभाळा, घरात माय व गोठ्यात गाय हवीच तर राजे संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सर्व जीवनपट कीर्तनाच्या माध्यमातून ह भ प ज्ञानेश्वर महाराज यांनी सर्व श्रोते गणना समजेल अशा पद्धतीने सांगितला तर  या मूल्यांवर आधारित महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांनी दररोज होणाऱ्या कीर्तनात हरी भक्तीत श्रोत्यांना तल्लीन करून या विषयी मार्गदर्शन करून भाविक भक्तांना  मंत्रमुग्ध केले.जणू काही सर्वच गोष्टी या कीर्तनातून प्रत्येकाला शिकावयास   मिळाल्या आशा चर्चा मात्र या परिसरात श्रोत्यांच्या बोलण्यातून ऐकावयास मिळत आहेत.या अखंड हरिनाम सप्ताह साठी विणेकरी ह भ प बाळू मोरे, ह भ प गोरख शेवाळे,ह भ प भास्कर बापू शिंदे ह भ प बापू वाघ, ह भ प नामदेव नाना, ,  सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक,राहुलजी देशपांडे पुणे,याचे शिष्य वारकरी संप्रदायातील एक ख्यातनाम व महाराष्ट्रातील नामवंत उत्कृष्ट गायक नारायण महाराज खिल्लारी गुरुजी वैजापूरकर पुणे, माधव महाराज पैठणकर, ऋषिकेश महाराज येवला, विनोद महाराज चांदवड, बबलू महाराज, रमन महाराज, गोरख महाराज,  मच्छिन्नद्र महाराज, , तसेच हार्मोनियम साठी ह भ प मोरे महाराज,  प्रवीण शेवाळे, मुन्ना मोरे,  मृदुनगाचार्य ह भ प माऊली महाराज, ओंकार महाराज आळंदी, गोरख महाराज, साउंड सिस्टीम शंकर महाराज गुरुदत्त  साऊंड सिस्टीम ठानगाव, पत्रिका छपाईसाठी  नितीन शेवाळे व प्रवीण शेवाळे यांनी सहकार्य केले तसेच   चोपदार  मन्नसाराम जाधव , हिरामण बच्छाव, दीपक मोरे, तर कीर्तनकाराची सेवा पंढरीनाथ शेवाळे,दादाजी बोरसे,  जे डी मिस्तरी, दत्तू हिरे,गोकुळ मोरे, निंबा पुंडलिक पवार, अरुण शेवाळे, साहेबराव शेवाळे, काशिनाथ शेवाळे,दुपारचे अन्नदान बारकू शेवाळे मंथन शेवाळे, , कौतिक शेवाळे, बाळू भावराव, कारभारी  शेवाळे, नामदेव शेवाळे, आप्पाजी शेवाळे, सायंकाळचे अन्नदानासाठी भाऊसाहेब बोरसे, नितीन शेवाळे, सुनील शेवाळे, सुभाष बिरारी, बारकू शेवाळे, नानाजी शेवाळे, सुरेश शिरोरे, कडू आहेर, कारभारी शेवाळे, विश्वास शेवाळे, दादाजी मोरे, यादव शेवाळे या गावातील अन्नदात्यांनी सेवा दिली.तसेच या अखंड हरिनाम सप्ताह साठी जयराम शेवाळे, आण्णा पाटील, गोरख महाराज शेवाळे, भास्कर बापू , संतोष भाऊ मोरे,  जिभाऊ बोरसे, आप्पाजी शेवाळे, नितीन शेवाळे, अरुण शेवाळे, दीपक जगताप, महेश शिरोरे ,प्रवीण शेवाळे, दत्तू हिरे, भारत पवार, गणेश चिमनपुरे, गुलाब पानपाटील,विश्वास शेवाळे ,अरुण शेवाळे, अमोल बिरारी ,भाऊसाहेब बोरसे, शांताराम शेवाळे,  विजय देवरे, मंथन भामरे, सर्व खामखेडा ग्रामस्थ व श्रीराम भजनी मंडळाच्या अथक परिश्रमातून हा ३५ वर्षांनंतर होणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसर्या  वर्षाच्या सप्ताहास  उत्सहात सुरुवात झालेली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!