सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेतील ‘नो हायपर टेन्शन’ पुस्तक ठरणार उपयुक्त मार्गदर्शक सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!‘नो हायपर टेन्शन’ पुस्तक ठरणार उपयुक्त
मार्गदर्शक
नाशिक । प्रतिनिधी
आज ३० ते ५० उमेदीच्या वयोगटातील युवापिढी हृदयरोगाचा विळखा पडत आहे. या आजाराची भीषणता लक्षात घेता हृदयरोगासबंधी प्रबोधन व्हावे, याची लक्षणे, कारणे समजावित आणि तो होऊ नये याकरिता आहार, व्यायाम, जीवनशैली यासह याविषयीचे गैरसमज दूर व्हावे या उद्देशाने  सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करण्यासाठी ‘नो हायपर टेन्शन’ पुस्तक लिहले आहे, अशी माहिती प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अतुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. अतुल पाटील यांनी बंंगळुरू येथून कार्डिऑलॉजीचे शिक्षण घेतले आहे. नाशिकमध्ये ते सध्या आशा हार्ट केअर क्लिनिकच्या माध्यमातून रूग्णसेवा देत आहेत. या दरम्यान त्यांनी अनुभवले की कमी वयात कारकीर्द घडवण्याच्या काळात यूवापिढी हृदयरोगाने ग्रासते आहे, हे वास्तव त्यांना अस्वस्थ करत होते आणि हे कुठेतरी थांबायला हवे या उद्देशाने ‘नो हायपर टेन्शन पुस्तक लिहण्याचे त्यांनी ठरवले.
  उच्च रक्तदाब असणार्‍या रुग्णांचे प्रमाण देशात २५ ते ३० टक्के आहे अशी माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्यां लॅनसेट या वैद्यकीय पत्रिकेत प्रसिद्ध झाली, याचा संदर्भ घेऊन डॉ.  अतुल पाटील म्हणाले, कमी वयात हृदयासंबंधी आजाराचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. उच्च रक्तदाबाविषयी म्हणावी तशी जागृती नाही. अयोग्य आहार, व्यायाम तसेच योगाचा अभाव, लठ्ठपणा, घातक पदार्थाचे व्यसन यासह मधुमेह या मुळे हृदयरोगींचे प्रमाण वाढले. आधुनिक वैद्यकीय विज्ञानाने अ‍ॅजिंओप्लास्टी, बायपास हे जोखिमविरहीत पर्याय दिले, मात्र एकदा कमजोर झालेल्या हृदयाला पूर्वकार्यक्षमतेवर आणणे कठिण असते. रोगी अायुष्यभर आजारासह जगतो आणि अडचणी निर्माण होतात. हे टाळता यावे आणि यानंतर  हृदयरोग, उच्चरक्तदाब यासंंबंधी जागृती आणि प्रबोधन गरजेचे वाटले म्हणून पुस्तक लिहिण्यास घेतले, असेही त्यांनी नमूद केले.
गेल्या दीड वर्षांपासून कोविडच्या भितीने ह्रदयरोगी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यास टाळाटाळ करत आहेत. कोरोना काळात हृदयरोग अनियंत्रित होण्याचे प्रमाण वाढले आहे, असेही निरीक्षण पाटील यांनी अभ्यासाअंती नोंदवले. ते म्हणाले, कोविड काळात अनियंत्रित रक्तदाब आणि हृदयरुग्णांच्या प्रमाणात मोठया प्रमाणात वाढ झाली. कोविडपेक्षाही अनियंत्रित रक्तदाब आणि हृदयरोगामुळे मृत्यू होणार्‍याचे प्रमाण वाढले आहे. नेमके या काळात ‘नो हायपर टेंशन’ पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
 नजीकचा भविष्यात भारत हृदयरोगासाठी राजधानी ठरणार आहे. त्यासाठी प्रत्येकानेच आपल्या हृदयाची काळजी घेण्यासह  उच्चरक्तदाब होऊ नये म्हणून निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करावा.  ३० वर्षावरील व्यक्ती आणि ज्यांच्या कुटुंबात उच्च रक्तदाबाचे पेशंट असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक एकदा वाचणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती, प्रबोधन करून  पुस्तक वाचकांच्या मनातील हृदयासंबंधीचे गैरसमज दूर करतील आणि निरायम जीवनासाठी गुरूकिल्ली ठरेल असेही डॉ. पाटील यांनी शेवटी नमूद केेले.अमेझॉनवर हे पुस्तक ऑनलाईन मागवता येईल शिवाय पुस्तकासाठी डॉ. अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधावा.
************************************
Live  100 year अ‍ॅप
आधुनिक तंत्रज्ञान नागरिकांच्या जीवनशैलीचा अत्यावश्यक भाग झाला आहे. निरोगी आयुष्यासाठी स्मार्टफोन उपयुक्त ठरू पाहत आहे. याच पार्श्‍वभूमीवर डॉ. अतुल पाटील यांनी नव्या तंत्रज्ञानाला हातीशी धरुन उच्च रक्तदाबाचे निदान, नियंत्रण करण्यासाठी यूजर्स फ्रेंडली मोबाईल अ‍ॅप तयार केले असून हे रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अ‍ॅपमध्ये रुग्णांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके यासह निदान आणि वाढत्या रक्तदाबाचे नियंत्रण करण्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. हे अँप गूगल प्ले स्टोवर वर मोफत उपलब्ध आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !