पोस्ट्स

१५ डिसेंबर आंतरराष्ट्रीय चहा दिन ! बेवफा सनम से चाय अच्छी है | ये दिल तो जलाती है, मगर होठों को चुम लेती है | चहा महात्म्य जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
१५ डिसेंबर आंतरराष्ट्रीय चहा दिन !          "चहा महात्म्य"          चहा हा आपल्या जीवनातील प्रत्येक घटना आणि भावनात्मक प्रसंगांशी जोडलेला आहे. सकाळची सुरुवात चहाने होते तर चहा मुळे सायंकाळचा आनंद द्विगुणीत होतो. जगभरात १५ डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन’ म्हणून साजरा केला जातो. चहांच्या मळ्यामध्ये आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या श्रमिकांच्या स्थितीकडे लक्ष वेधणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. जगात दररोज सुमारे तीनशे कोटी कप चहा पिला जातो. भारत सुमारे एक शतक चहा उत्पादनात आघाडीवर होता. भारत हा जगातील सर्वात जास्त चहा उपभोक्ता देश असून भारतातील एकूण चहा उत्पादनापैकी ७० टक्के चहा देशातच वापरला जातो.             बेवफा सनम से अच्छी ‘चाय’ !             किंवा                                                      चहा : एक अमृत तुल्य पेय ! किंवा चहा : एक लोकप्रिय पेय !      जगातील पाण्याखालोखाल लोकप्रिय असलेल्या चहा या पेयाचे अनेक प्रकार,  फायदे, उपयोग असल्याने चहा शिवाय राहू न शकणाऱ्या तसेच चहा म्हणजे  ‘अ‍ॅसिडिटी’  किंवा  ‘निद्रानाश’ असा समज करून चहाला  दूर ठेवणाऱ्यानाही ‘च

भिंत नव्हे कॅनव्हास ! वारली चित्रकलाशैली जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
भिंत नव्हे कॅनव्हास !     आदिवासी वारली चित्रकला प्रामुख्याने झोपडीच्या भिंतीवर रेखाटली जाते. ही परंपरा ११०० वर्षे जीवंत आहे. झोपडीतील भिंत हाच त्यांचा कॅनव्हास ! शेणाने सारवलेल्या भिंतीवर गेरुच्या गडद रंगाने चौकोन आखला जातो. त्यावर तांदळाच्या पिठाने चित्रे रेखाटली जातात.बांबूच्या काडीचा ब्रश तयार केला जातो. पूर्णपणे पर्यावरणपूरक अशी ही चित्रशैली निसर्गस्नेही आहे. झोपडीची भिंत पुन्हा पुन्हा सारवावी लागते. भिंत सारवल्यावर त्यावर परत नवी चित्रे काढली जातात. त्यामुळेच या कलेचे स्वरुप नीत्यनूतन असे आहे. चित्राखेरीज भिंत म्हणजे कपड्याविना मनुष्य अशी वारली जमातीची समजूत आहे. त्यांच्या झोपड्याही अतिशय कलात्मक असतात. अनेक वारली चित्रांमध्येही त्यांचे सुंदर दर्शन घडते.       वारली जमातीत शेतांजवळ घरे बांधून राहण्याची पद्धत आहे.एखादी मोठी विहीर, ओढा, नदी जवळ आहे असे बघूनच पाडा वसविला जातो. पंधरा -वीस झोपड्यांच्या वस्तीला पाडा असे म्हणतात. तीनचार ते दहा-बारा पाडे मिळून एक गाव तयार होते.सर्वसाधारणपणे खेड्यांत रस्त्यांवर व घरांजवळ जी अस्वच्छता दिसते तशी ती वारल्यांच्या पाड्यांवर नसते.घर व पाडा त

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त, दिव्यांग बांधवांसाठी विशेष कोविड १९ लसीकरणाचे भव्य शिबीर संपन्न ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त, दिव्यांग बांधवांसाठी विशेष कोविड १९ लसीकरणाचे भव्य शिबीर ! शिंदे. ता. जि. नाशिक      दिनांक १० डिसेंबर रोजी शिंदे गाव, तुळजाभवानी लान्स, नाशिक पूना हायवे, टोल नाक्या जवळ, नाशिक येथे आमदार सरोजताई आहेर यांच्या अध्येक्षतेखाली दिव्यांग बांधवांसाठी विशेष कोविड १९ लसीकरण आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी पंचक्रोषीतील दिव्यांग बंधू -भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन शिबिरामध्ये कोविड १९ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदे येथील नाशिक तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी कोविड १९ लसीकरणाचा पहिला तसेच दुसरा डोसचे लसीकरण करून घेतले. सदर दिव्यांग कोविड १९ लसीकरणासाठी तालुक्यातील मान्यवर पंचक्रोषीतील सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपस्थित होते, तसेच तालुका स्तरावरील अधिकारी तहसीलदार अनिल दौंड, नासिक पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी, सहा. गटविकास अधिकारी विनोद मेठे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश निकम, विस्तार अधिकारी सानप, अबू नाना शेख, प्रा. आ. केंद्र. शिंदे येथील आरोग्य अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

एलन करिअर इन्स्टिटयूट आता नाशिक मध्ये ! २८ डिसेंबरपासून सुरु होतील नीट व आयआयटी, जेईई च्या बॅचेस ! आता नाशिकमध्ये मिळेल ३३ वर्षाच्या कोटा कोचिंगचा लाभ ! आयआयटी, जेईई, नीट, एमएचटी -सीईटी ची होणार तयारी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
एलन करिअर इन्स्टिटयूट आता नाशिक मध्ये !                 २८ डिसेंबरपासून सुरु होतील नीट व आयआयटी, जेईई च्या बॅचेस ! आता नाशिकमध्ये मिळेल ३३ वर्षाच्या कोटा कोचिंगचा लाभ !                 आयआयटी, जेईई, नीट, एमएचटी -सीईटी ची होणार तयारी ! नाशिक - दि . ११: मेडिकल आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या एलन करिअर इन्स्टिट्यूटने आता नाशिकमध्ये आपले केंद्र सुरु केले असून, नाशिकच्या प्रेरणादायी वक्त्या व योग गुरु छोट्या गुरु माँ , एलन करिअर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष जीवनज्योती अग्रवाल व एलन च्या मुंबई शाखेचे मार्गदर्शक  अमित मोहन अग्रवाल यांनी विधिवत पूजन आणि फित कापून अनौपचारिक शुभारंभ केला. नीट आणि आयआयटी, जेईई  च्या विद्यार्थ्यांसाठी दि २८ डिसेंबर पासून कॅनडा कॉर्नर स्थित बिजिनेस स्क्वेअर येथे नवीन बॅचेस सुरु होणार असून, त्याची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. छोटी गुरु माँ यांनी यावेळी बोलताना सांगितले की , शिक्षणाबरोबरच संस्कार सुद्धा फार महत्वाचे आहेत. घरातील मोठी माणसं असतील किंवा शिक्षक यासर्वांनी विद्यार्थ्यांवर योग्य त्या संस्कारासाठ

वसईत एकाच दिवशी २० ठिकाणी होणार महारक्तदान ! वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
वसईत एकाच दिवशी २० ठिकाणी होणार महारक्तदान ! वसई चा राजा गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम !!               वसई (गुरुदत्त वाकदेकर) : रक्तदान म्हणजे जीवनदान. रक्ताचं नातं हेच जिव्हाळ्याचं नातं असतं. कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई विरार रक्तदान महोत्सवाच्या अंतर्गत वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या   वतीने १२ डिसेंबर २०२१ रोजी द्वितीय महारक्तदान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच दिवशी विविध २० ठिकाणी विविध सामाजिक संस्थांतर्फे वसई तालुक्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीदत्त मंदिर, रमेदी, वसई येथे महारक्तदानाची सुरूवात होईल. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात वसई विरार तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहान वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे निलेश भानुशे यांनी केले आहे. द्वितीय महारक्तदान महोत्सवासाठी योगेश भानुशे (वसईचा राजा), जितेंद्र पोतदार (रमेदी आळी), स्वप्नील परुळेकर (रूद्र तांडव), प्रशांत कदम (भास्कर आळी), मंगेश म्हस्के (स्वराज्य यूथ फ

पवारांच्या वाढदिवशी शिवडी तालुक्यात रक्तदान ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पवारांच्या वाढदिवशी शिवडी तालुक्यात रक्तदान !    (गुरुदत्त वाकदेकर यांजकडून)            मुंबई :: रक्तदान म्हणजे जीवनदान. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने १२ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अभ्युदय एज्युकेशन सोसायटीज् हायस्कूल, काळाचौकी येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शिवडी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहान शिवडी तालुका अध्यक्ष उमेश येवले यांनी केले आहे. १८ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती रक्तदान करू शकतात. कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते. कोविड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसाने तर दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसाने रक्तदान करता येते.  कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते असे थॅलेसीमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह अपघातग्रस्तांना

इंडिया फर्स्ट नीडल फ्री व्हॅक्सिन भारतात पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक जिल्ह्यामध्ये केंद्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार covid-19 लसीकरण अधिक सुलभतेने होणे कामी तसेच शंभर टक्के लसीकरण यशस्वी होणे कामी इंडिया फर्स्ट नीडल फ्री व्हॅक्सिन भारतात पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहे यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत त्याची पूर्वतयारी म्हणून मा. जिल्हाधिकारी सुरज मांढरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांचे मार्गदर्शनानुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयामार्फत जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये ग्रामीण भागातील आरोग्य सेविकांचे इन्स्ट्रुमेंट हाताळणीचे  एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यामध्ये covid-19 प्रतिबंधात्मक झायडस कंपनीची लस आता शासनामार्फत दिली जाणार आहे यासाठी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात covid-19 लसीकरणाचे काम करणाऱ्या आरोग्य सेविका यांचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर घेण्यात आले यामध्ये झायडस कंपनीचे फार्माजेट हे इन्स्ट्रुमेंट तयार केले असून या इंस्ट्रूमेंट द्वारे लस दिली जाणार आहे हे नीडल फ्री वॅक्सिंग असून आत्तापर्यंत  एकही लस न घेतलेल्या व्यक्तींना ती दिली जाणार आहे त्यासाठी जिल्हास्तरा