वसईत एकाच दिवशी २० ठिकाणी होणार महारक्तदान ! वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


वसईत एकाच दिवशी २० ठिकाणी होणार
महारक्तदान !
वसई चा राजा गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम !!

              वसई (गुरुदत्त वाकदेकर) : रक्तदान म्हणजे जीवनदान. रक्ताचं नातं हेच जिव्हाळ्याचं नातं असतं. कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई विरार रक्तदान महोत्सवाच्या अंतर्गत वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या   वतीने १२ डिसेंबर २०२१ रोजी द्वितीय महारक्तदान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच दिवशी विविध २० ठिकाणी विविध सामाजिक संस्थांतर्फे वसई तालुक्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीदत्त मंदिर, रमेदी, वसई येथे महारक्तदानाची सुरूवात होईल. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात वसई विरार तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहान वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे निलेश भानुशे यांनी केले आहे.
द्वितीय महारक्तदान महोत्सवासाठी योगेश भानुशे (वसईचा राजा), जितेंद्र पोतदार (रमेदी आळी), स्वप्नील परुळेकर (रूद्र तांडव), प्रशांत कदम (भास्कर आळी), मंगेश म्हस्के (स्वराज्य यूथ फाउंडेशन) यांच्यासह रूद्र तांडव ढोल ताशा पथक, वसई फर्स्ट, वसईचा राजा आणि ओमकार गणेशोत्सव मंडळ, भास्कर आळी, वसई यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.
१८ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती रक्तदान करू शकतात. कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते. कोविड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसाने तर दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसाने रक्तदान करता येते. 
कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते असे थॅलेसीमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह अपघातग्रस्तांना आपतकालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. या स्थितीत वेळेत रक्तदाता शोधणे व त्याचा रक्तगट जुळवणे हे अतिशय जिकरीचे काम आहे. या सर्वांना जीवनदान देण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे, तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनदान देऊ करू शकतो. शासकीय रक्तपेढीत आज रक्ताचा ठणठणाट आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करतानाही अडचणी येत आहे. कोरोना महामारी व लसीकरणामुळे अनेकांना रक्तदानाची इच्छा असूनही मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वसई विरार रक्तदान महोत्सवाच्या अंतर्गत वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक दायित्व म्हणून महारक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. यात सक्रिय सहभाग घेण्यासाठी आवाहनही करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।