पोस्ट्स

अमास सेवा ग्रूपच्या सेवाभावी उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ !

इमेज
अमास सेवा ग्रूपच्या सेवाभावी   उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ !          नाशिक ( प्रतिनिधी ) आदिवासी भागातील पत्र्याचापाडा येथील विद्यार्थ्यांना मुंबईच्या अमास सेवा ग्रूप या सेवाभावी संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अनेक दानशूर व्यक्तींच्या वाढदिवसाच्या औचित्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. सन २०१६ पासून आदिवासी भागातील मुलांच्या, समाजाच्या समस्या ओळखून विविध मदत मिळवून  देण्यासाठी  'अमास सेवा ग्रुप ' सतत प्रयत्नशील असतो. सामाजिक बांधिलकीचे हे नाते आता घट्ट झाले आहे.     शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ मध्ये अमास सेवा ग्रुपचे अध्यक्ष चंद्रकांतभाई देढीया, विजय भगत यांच्या नेतृत्वाखाली विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पेठ, सुरगाणा, भंडारदरा, वैतरणा, दिंडोरी परिसरातील ९० जिल्हा परिषद शाळांमधील जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ( स्कूल बॅग, वही, पेन्सिल बाॅक्स, रेनकोट, पाटी, वाॅटर बॅग, चित्रकला वही, पेन, स्केल व गिफ्ट सेट) वाटप करून समाजामध्ये एक नवीन आदर्श निर्माण करीत आहे. वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील एक सुखद क्षण असत

संजय चव्हाण उपाध्यक्ष पदी तर जाॅ. सेक्रेटरी पदी गोरखनाथ बलकवडे बिनविरोध !

इमेज
संजय चव्हाण उपाध्यक्ष पदी तर जाॅ. सेक्रेटरी पदी गोरखनाथ बलकवडे बिनविरोध !      नासिक (प्रतिनिधी)::-गत महिन्यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करून नविन पदाधिकारी व कार्यकारिणी निवडणूक प्रक्रिया जाहिर झाली त्यात अध्यक्षपदी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची तर उपाध्यक्ष पदी नाशिक शहर तालीम संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांची व त्यांच्यासह ५ उपाध्यक्षांची व जॉ.सेक्रेटरी पदी नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित कार्यकारिणी ३१ जुलै २०२२ रोजी जाहीर करण्यात येणार आहे . नाशिक शहराला प्रथमच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले असून या निवडीमुळे नाशिक शहर व जिल्ह्यात सर्व कुस्ती प्रेमी व पहिलवानांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नविन कार्यकारणी व पदाधिकारी यांचे नाशिक शहर तालीम संघ प्रांतिक प्रतिनिधी हिरामण वाघ यांचे कडून व शहर तालीम संघातर्फे व सर्व पहिलवान व कुस्तीप्रेमी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे...

घरगुती उत्पादनांना शास्त्रोक्त विपणनाची जोड हवी : प्रा. दिलीप फडके

इमेज
घरगुती उत्पादनांना शास्त्रोक्त विपणनाची जोड हवी : प्रा. दिलीप फडके स्वयंसिध्दा आयोजित प्रदर्शनाचा थाटात शुभारंभ      नाशिक::- महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणामध्ये आर्थिक अंग अत्यंत महत्वाचे असून कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी ते निर्णायक आहे. यासाठी चांगल्या घरगुती उत्पादनांना शास्त्रोक्त विपणनाची जोड देऊन व्यवसायवृध्दीचे समीकरण यशस्वी करणे गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत तथा सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी व्यक्त केले.           स्वयंसिध्दा समूहाच्या वतीने गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. फडके बोलत होते. माजी उपमहापौर अजय बोरस्ते, अर्चना बोरस्ते, योग विदुषी प्रज्ञा पाटील, माजी नगरसेविका प्रा. डॉ. वर्षा भालेराव या अतिथींसह आयोजक रूक्मिणी जोशी व मानसी सजगुरे यावेळी उपस्थित होत्या. कोरोना काळातील अनपेक्षित आर्थिक अस्थैर्याचा उल्लेख करत प्रा. फडके यांनी महिलांनी लहान व्यवसायातून स्वयंसिध्दता साधायचे आवाहन केले. अजय बोरस्ते यांनी, महिलांमधील उद्योजिका विकसित होणे काळाची गरज असल्याचे सांगताना नाशिकमध्ये खास महिलांसाठी प्रदर्शन स्थळे विक

६३ मित्रांच्या उपस्थितीत अनोखा ६३ वा वाढदिवस साजरा !

इमेज
६३ मित्रांच्या उपस्थितीत अनोखा ६३ वा वाढदिवस साजरा !           नाशिक ( प्रतिनिधी )::- आपला वाढदिवस अनेकांच्या साक्षीने साजरा व्हावा अशी सर्वांचीच इच्छा असते. कुटुंबीय, नातेवाईक यांच्या उपस्थितीत उत्साहात वाढदिवस साजरे केले जातात. काल ( दि.२०) आपल्या मित्राचा ६३ वा वाढदिवस तब्बल ६३ शालेय मित्रांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा सुंदर योग जुळून आला.         पेठे विद्यालयातून १९७५ साली एसएससी झालेल्या बॅचची दरमहा मिसळपार्टी होत असते. काल संजय देवधर, उदय वाईकर, राजगोपाल धूत, प्रफुल्ल साखला, हेमंत जोशी, श्रीहरी कर्पे, विवेक आंबेकर, गिरीश परांडकर, श्याम कुलकर्णी, विश्वनाथ भुतडा यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ६३ मित्र उपस्थित राहिले. बहुतेकांचे जन्म १९५९ सालचे असल्याने त्यांनी वयाची ६३ वर्षे या महिन्यात पूर्ण केली. त्यामुळे हा विलक्षण योगायोग जुळून आला याचा सर्वांनाच आनंद झाला. गंगापूर नाक्यावरील हॉटेल विहारमध्ये हा झकास वाढदिवस साजरा झाला.            वर्गमित्र अभय बोरा याने २०१९ मध्ये परिश्रमपूर्वक आपल्या शालेय मित्रांचा  व्हॉट्सअप ग्रूप तयार करून सर्वांना एकत्र आणले. त्यामुळे अनेक वर्षे सर्वत्र

भूलशास्त्र संघटनेतर्फे नासिकमध्ये राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद !

इमेज
भूलशास्त्र संघटनेतर्फे नासिकमध्ये राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद !             नाशिक ( प्रतिनिधी )भारतीय भुलशास्त्र संघटना (आयएसए) नाशिक या संघटनेच्यावतीने युवा महाकॉन २०२२ या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.२३ आणि रविवार दि.२४ जुलै या कालावधीत हॉटेल एक्सप्रेस इन येथे ही राज्यस्तरीय परिषद होणार असल्याची माहिती डॉ. अनिता नेहेते व सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.             आयएसए नाशिक ही संघटना भूलतज्ज्ञांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांसाठी देखील संघटनेद्वारे उपक्रम राबविले जातात. यंदा पंचेचाळीस वयाच्या आतील भूलतज्ज्ञांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद आयोजीत करण्यात आली आहे. आरोग्य सुविधांमध्ये आधुनिकता येत असतानाच भूलशास्त्रही प्रगत होते आहे. आरोग्य सेवेत भुलशास्त्र आणि भूल तज्ज्ञांचे महत्व अनन्य साधारण आहे. या शास्त्रात अंतर्भाव होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची, उपचार प्रणालीची सर्वांना माहिती व्हावी, विशेषतः वयाच्या पंचेचाळीशीच्या आतील भूल तज्ज्ञांच्या ज्ञानाचा अन्य सहकाऱ्यांना ही लाभ मिळावा, त्