६३ मित्रांच्या उपस्थितीत अनोखा ६३ वा वाढदिवस साजरा !


६३ मित्रांच्या उपस्थितीत अनोखा ६३ वा वाढदिवस साजरा !
          नाशिक ( प्रतिनिधी )::- आपला वाढदिवस अनेकांच्या साक्षीने साजरा व्हावा अशी सर्वांचीच इच्छा असते. कुटुंबीय, नातेवाईक यांच्या उपस्थितीत उत्साहात वाढदिवस साजरे केले जातात. काल ( दि.२०) आपल्या मित्राचा ६३ वा वाढदिवस तब्बल ६३ शालेय मित्रांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा सुंदर योग जुळून आला.

        पेठे विद्यालयातून १९७५ साली एसएससी झालेल्या बॅचची दरमहा मिसळपार्टी होत असते. काल संजय देवधर, उदय वाईकर, राजगोपाल धूत, प्रफुल्ल साखला, हेमंत जोशी, श्रीहरी कर्पे, विवेक आंबेकर, गिरीश परांडकर, श्याम कुलकर्णी, विश्वनाथ भुतडा यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ६३ मित्र उपस्थित राहिले. बहुतेकांचे जन्म १९५९ सालचे असल्याने त्यांनी वयाची ६३ वर्षे या महिन्यात पूर्ण केली. त्यामुळे हा विलक्षण योगायोग जुळून आला याचा सर्वांनाच आनंद झाला. गंगापूर नाक्यावरील हॉटेल विहारमध्ये हा झकास वाढदिवस साजरा झाला.
           वर्गमित्र अभय बोरा याने २०१९ मध्ये परिश्रमपूर्वक आपल्या शालेय मित्रांचा 
व्हॉट्सअप ग्रूप तयार करून सर्वांना एकत्र आणले. त्यामुळे अनेक वर्षे सर्वत्र विखुरलेले सारेजण एका मैत्रीसूत्रात गुंफले गेले. व्यावसायिक वगळता बहुतेकजण आता सेवानिवृत्त झालेले आहेत. मध्यंतरी दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष भेटीगाठी होत नव्हत्या. पण ग्रुपमुळे सर्वजण परस्परांच्या संपर्कात होते. एकमेकांना अडीअडचणीच्या वेळी जमेल तशी मदत करीत होते. कोरोनाच्या संकटातून बाहेर आल्यावर बंधने शिथिल झाली. त्यानंतर दरमहा मिसळपार्टी पुन्हा सुरू झाली. कालच्या कार्यक्रमाने सर्वांना मित्रभेटीचे समाधान दिले. हेमंत वाड व सहकाऱ्यांनी नेहमीप्रमाणेच उत्तम नियोजन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !