संजय चव्हाण उपाध्यक्ष पदी तर जाॅ. सेक्रेटरी पदी गोरखनाथ बलकवडे बिनविरोध !

संजय चव्हाण उपाध्यक्ष पदी तर जाॅ. सेक्रेटरी पदी गोरखनाथ बलकवडे बिनविरोध !

     नासिक (प्रतिनिधी)::-गत महिन्यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करून नविन पदाधिकारी व कार्यकारिणी निवडणूक प्रक्रिया जाहिर झाली त्यात अध्यक्षपदी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची तर उपाध्यक्ष पदी नाशिक शहर तालीम संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांची व त्यांच्यासह ५ उपाध्यक्षांची व जॉ.सेक्रेटरी पदी नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित कार्यकारिणी ३१ जुलै २०२२ रोजी जाहीर करण्यात येणार आहे .

नाशिक शहराला प्रथमच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले असून या निवडीमुळे नाशिक शहर व जिल्ह्यात सर्व कुस्ती प्रेमी व पहिलवानांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नविन कार्यकारणी व पदाधिकारी यांचे नाशिक शहर तालीम संघ प्रांतिक प्रतिनिधी हिरामण वाघ यांचे कडून व शहर तालीम संघातर्फे व सर्व पहिलवान व कुस्तीप्रेमी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !