पोस्ट्स

मराठा विद्यालयाची आदिती शिरोडे प्रथम क्रमांकावर !

इमेज
मराठा विद्यालयाची आदिती शिरोडे प्रथम क्रमांकावर !    नासिक::- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या ३१ जुलै २०२२ च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा काल जाहीर झालेल्या आठवी स्काॅलरशिप (शिष्यवृत्ती) परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार कु. आदिती उदय शिरोडे हिने मराठा विद्यालयातून प्रथम तर  नाशिक जिल्ह्यातून पाचवा, नाशिक मनपा क्षेत्रातून तिसरा क्रमांक मिळवला. याबद्दल तिचे सर्व थरांतून अभिनंदन करण्यात येत.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावा- मुख्य कार्यकारी अधिकारी !

इमेज
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावा- मुख्य कार्यकारी अधिकारी !         नाशिक : देशातील प्रतिभावंत आणि हुशार विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण देण्यासाठी १९८६ सालच्या शैक्षणिक धोरणामध्ये नवोदय विद्यालय स्थापनेची तरतूद करण्यात आली, या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पात्रता परीक्षेची आयोजन हे दरवर्षी करण्यात येते. यावर्षी देखील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालयासाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता परीक्षेसाठी जास्तीत जास्त संख्येने फॉर्म भरावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.          जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी ३१ जानेवारी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याबत माहिती पोहचवण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला दिले आहेत. जे विद्यार्थी, विद्यार्थिनी २०२२-२३ या शैक्षणिक सत्रामध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे, ज्यांची

६ जानेवारी रोजी होणार सह आयुक्त लिखित 'गोष्टीपलीकडचे महाभारत' चे प्रकाशन !

इमेज
६ जानेवारी रोजी होणार सह आयुक्त लिखित 'गोष्टीपलीकडचे महाभारत' चे प्रकाशन !        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भरारी प्रकाशन आणि कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाती काळे (सहआयुक्त, वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई) लिखित 'गोष्टीपलीकडचे महाभारत' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि 'विश्वातील १० आदर्श शिक्षिका' या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता मिनी थिएटर, (रवींद्र नाट्यमंदिर), तिसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. 'गोष्टीपलीकडचे महाभारत' या स्वाती काळे लिखित पुस्तकाचे प्रकाशन शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तसेच मुंबई शहर व कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसिद्ध लेखक व साहित्यिक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, धर्मशास्त्र, पुराभिलेख विद्या, भारतीय स्त्रीवाद व सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासक डॉ. प्राची अमोघ मोघे, लोकसाहित्य व लोककला अभ्यासक प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे, कोकण मराठी साहित्य पर

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याचे सरासरी वार्षिक उत्पन्न तब्बल पाच कोटींच्या आसपास !

इमेज
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याचे सरासरी वार्षिक उत्पन्न तब्बल पाच कोटींच्या आसपास !       सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी एका शिक्षण संस्था चालकाकडे ५० हजार रुपयांची मागणी केली असता २५ हजार रुपये तडजोडी अंती ठरलेली रक्कम स्विकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पकडण्यात आले होते, या प्रकरणाची चौकशी सुरू असताना काही बाबी समोर आल्या. या शिक्षणाधिकाऱ्यांची एकूण कारकीर्द फक्त ९ वर्षांची आहे, कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक म्हणून दुहेरी जबाबदारी होती. मात्र तेथून त्यांना २०१८ मध्ये पदमुक्त करण्यात आल्यानंतर न्यायालयातून त्यांनी पदनियुक्ती करून आणली होती, १३ महीन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदावर रुजू झाले होते. इथेच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले व चौकशीत त्यांच्याकडे ५० कोटींच्या आसपास मालमत्ता आढळून आली असल्याचे सांगितले जात आहे. लोहार यांच्याकडे पाच चारचाकी वाहने, सात दुचाकी, कोल्हापूरात दोन फ्लॅट, कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा, राजारामपुरी, पाचगाव, शा

मतदार असलेल्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर !

इमेज
मतदार असलेल्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर ! नाशिक::- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०८:०० ते दु. ०४:०० वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्याचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी कळविले आहे.  

सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व संवर्गांच्या ज्येष्ठता यादी प्रसिद्ध !

इमेज
सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व संवर्गांच्या ज्येष्ठता यादी प्रसिद्ध ! सलग तिसऱ्या वर्षी १ जानेवारी रोजी ५२ संवर्गांच्या ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध !!             नाशिक : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या या १ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. सलग तिसऱ्या वर्षी सेवा ज्येष्ठता याद्या या १ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सेवा ज्येष्ठतेसंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठतेसंबधी सूची हि प्रत्येक वर्षी ३१ डिसेंबर रोजी तयार करण्यात येऊन १ जानेवारी रोजी प्रसिद्ध  करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने यावर्षी देखील गट क व गट ड संवर्गातील सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ५२ संवर्गाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या ह्या प्रसिद्ध झाल्या आहेत. जिल्हा परिषद अधिनस्त कार्यरत असलेल्या गट क व ड मधील १६००० कर्मचाऱ्यांच्य

पिंपळगाव येथे महायज्ञ व संस्कार महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ ! सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन !!

इमेज
पिंपळगाव येथे महायज्ञ व संस्कार महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ ! सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन !!        पिंपळगाव ( प्रतिनिधी ):- नवनर्षाच्या प्रारंभी आज दि. १ जानेवारीपासून पिंपळगाव बसवंत येथे २४ कुंडीय गायत्री महायज्ञ व संस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि.१ ) दुपारी २ ते ५ या वेळेत स्वामी समर्थ केंद्रापासून ते उमियाधाम या कार्यस्थळा पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली व उत्साहात प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन झाले. विज्ञान व आध्यात्मिक शक्ती यांचा समन्वय घडविणारे सर्व कार्यक्रम आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ उमिया धाम येथे होतील.      उद्या पासून दि.२ ते ४ च्या दरम्यान दररोज सकाळी ६ ते ७.३० या वेळेमध्ये सामूहिक जप, ध्यान व व्यायाम होतील. ९ ते १२ या वेळेत गायत्री महायज्ञ केला जाईल. उद्या दि.२ रोजी सकाळी ९ ते १२ देवपूजन होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ संगीतमय प्रवचन होईल. दि.३ रोजी दुपारी ५ ते ७ या वेळेत विराट गायत्री दीप महायज्ञ होईल. दि.४ रोजी सकाळी ९ ते १२ दीक्षा संस्कार, पूर्णाहुती व महाप्रसादाचे वितरण होणार आहे. सर्व बंधुभगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक समस्