प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याचे सरासरी वार्षिक उत्पन्न तब्बल पाच कोटींच्या आसपास !

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याचे सरासरी वार्षिक उत्पन्न तब्बल पाच कोटींच्या आसपास !

      सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी एका शिक्षण संस्था चालकाकडे ५० हजार रुपयांची मागणी केली असता २५ हजार रुपये तडजोडी अंती ठरलेली रक्कम स्विकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पकडण्यात आले होते, या प्रकरणाची चौकशी सुरू असताना काही बाबी समोर आल्या. या शिक्षणाधिकाऱ्यांची एकूण कारकीर्द फक्त ९ वर्षांची आहे,

कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक म्हणून दुहेरी जबाबदारी होती. मात्र तेथून त्यांना २०१८ मध्ये पदमुक्त करण्यात आल्यानंतर न्यायालयातून त्यांनी पदनियुक्ती करून आणली होती, १३ महीन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदावर रुजू झाले होते. इथेच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले व चौकशीत त्यांच्याकडे ५० कोटींच्या आसपास मालमत्ता आढळून आली असल्याचे सांगितले जात आहे. लोहार यांच्याकडे पाच चारचाकी वाहने, सात दुचाकी, कोल्हापूरात दोन फ्लॅट, कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा, राजारामपुरी, पाचगाव, शाहूवाडी येथे देखील त्यांची मालमत्ता असल्याचे सांगितले जाते. तसेच पुण्यातील हवेली, मुंबई आणि सोलापूर या ठिकाणीही मालमत्ता आहेत. शेअर व म्युच्युअल फंडातही मोठी गुंतवणूक असल्याने त्याचीही खातरजमा केली जात आहे, सोने खरेदीच्या कोट्यवधी रुपयांच्या पावत्या आढळून आल्यात मात्र अद्याप सोने मिळून आले नाही, सध्या ते जामीनावर आहेत मात्र शासनाकडून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच लोहारांचा कारवाईच्या आधी काही तास (२९ आक्टोबर २०२२) एका संघटनेच्या वतीने पुस्तकांचे गांव भिलार येथे अनेक सामाजिक, राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षणाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।