आदर्श समाजनिर्मितीसाठी पत्रकारांनी कटिबद्ध रहावे तालुका पत्रकार संघ कार्यक्रमाप्रसंगी लीना बनसोड यांचे प्रतिपादन ! साप्ताहिक न्यूज मसाला चे प्रतिनिधी करण बिडवे यांचा सन्मान !
आदर्श समाजनिर्मितीसाठी पत्रकारांनी कटिबद्ध रहावे तालुका पत्रकार संघ कार्यक्रमाप्रसंगी लीना बनसोड यांचे प्रतिपादन ! साप्ताहिक न्यूज मसाला चे प्रतिनिधी करण बिडवे यांचा सन्मान ! देवळाली कॅम्प :- पत्रकारिता क्षेत्रात निष्पक्षपणे काम करण्याबरोबर आदर्श समाजनिर्मितीसाठी पत्रकारांनी कटिबद्ध राहणे आवश्यक असतांना सामाजिक जबाबदारीचे भान राखत तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा घटकांचा नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ करीत असलेल्या गौरव लाखमोलाचा असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी केले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,(मुंबई) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्यगौरव पुरस्कार येथील डॉ गुजर सुभाष हायस्कूलच्या सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव घोलप, तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार जयंत महाजन, अभिनेते डॉ. चैतन्य बागुल, दिग्दर्शकी विनोद लवेकर,अभिनेत्री रसिका वाघाराकर,कृष्णा मरकड,शंकर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नवीन गुरुनानी, सेक्रेटरी रतन चावला,संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, गणेश गायधनी,नाशिकरोड बार असो