पोस्ट्स

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार !माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषांनुसार पात्र पत्रकार व त्यांचे कुटुंब ! योजनेचा लाभ कुणाला, कसा यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार ! माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषांनुसार पात्र पत्रकार व त्यांचे कुटुंब ! महात्मा ज्योतिराब फुले जनारोग्य योजेनेतील विमा संरक्षण मर्यादा १.५० लाखांहून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली. या योजनेचा लाभ अशा प्रकारे घ्यावा. मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महात्मा ज्योतिराब फुले जनारोग्य योजेनेतील विमा संरक्षण मर्यादा १.५० लाखांहून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली.         त्याशिवाय नवीन २०० रुग्णालयांचा यात समावेश करण्यात येणार आहे. तर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ २.५० लाखांहून ४ लाखांपर्यंत मर्यादा वाढवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यभरात ७०० दवाखाने उघडण्यात येण्याची शक्यता आहे. महात्मा ज्योतिराब फुले जनारोग्य योजना राज्यातील दारिद्ररेषेखालील विशेषकरुन पिवळी शिधापत्रिका धारकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारने २ जूलै २०१२ रोजी रा

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये पोस्टर प्रेझेन्टेशनला उत्तम प्रतिसाद !

इमेज
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये पोस्टर प्रेझेन्टेशनला उत्तम प्रतिसाद ! न्यूज मसाला वृत्तसेवा::- मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. यात ३२ गटांमधून १४८ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान कल्पनांनी अप्रतिम पोस्टर्स तयार केले होते. स्पर्धेत रस्त्यावर खड्डे शोधणे आणि प्लास्टिक कचरा वापरून भरणे, फळ प्रतवारी प्रणाली यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, दुसरे पारितोषिक भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या सुरक्षेसाठी व्हिजिटर ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग सिस्टमने जिंकले आणि तिसरे पारितोषिक विजेते सोलनम ट्यूबरोसम डिसीज क्लासिफिकेशन युजिंग डीप लर्निंग होते.          प्रा. विनोद सपकाळ यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले. स्पर्धेला कॅम्पस संचालक प्रा. अशोक चव्हाण, प्राचार्य डॉ. आलम एन. शेख सर यांनी भेट दिली. डॉ. रईस मुल्ला,  डॉ. प्रमोद भावार्थे, प्रा. स्वप्नील देसाई आणि डॉ. महेंद्र पवार यांनी पोस्टर्सचे मूल्यमापन केले. अशाप्रकारे व

स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्षाचे आज उद्घाटन !

इमेज
स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्षाचे आज उद्घाटन ! मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयामध्ये स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाचे उद्घाटन आज (बुधवारी) सकाळी ९ वा. कामा व आल्ब्लेस रुग्णालय येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.        वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या या कक्षाच्या माध्यमातून पुढील काळात स्तन कर्करोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. हा कक्ष प्रत्येक बुधवारी दुपारी १२ ते २ या वेळेत कार्यरत असेल.

दर्जेदार मराठी चित्रपटांना आज अनुदान वाटप !

इमेज
दर्जेदार मराठी चित्रपटांना आज अनुदान वाटप ! मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :  मराठी चित्रपटाना प्रोत्साहन देण्यासाठी, राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. यावर्षीच्या चित्रपट अनुदानाचे वाटप सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज बुधवार दि.८ मार्च रोजी मंत्रालयातील समिती सभागृहात करण्यात येणार आहे.        शासनाने नियुक्त केलेल्या चित्रपट परीक्षण समितीने यंदाच्या अनुदानासाठी ४१ चित्रपटांना पात्र ठरवले आहे. यातील ४  चित्रपटांना “अ” दर्जा तर ३३  चित्रपटांना “ब” दर्जा प्राप्त झाला आहे. तर ४ चित्रपट विविध राज्य, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असल्याने त्यांना शासन धोरणानुसार "अ" दर्जा देऊन अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनुदानप्राप्त चित्रपटाचा चमू उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाने दिली आहे.

पाच हजारांची लाच घेतांना तलाठी ताब्यात !

इमेज
पाच हजारांची लाच घेतांना तलाठी ताब्यात !        नाशिक(वार्ताहर)::- अतिरिक्त कारभार असलेल्या तलाठीस ५ हजाराची लाच घेतांना लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडत कारवाई केली.   तक्रारदार यांची आत्या हिने तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे असलेली मौजे नागापूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील गट नंबर ३३७ अन्वये एक हेक्टर तीन आर तसेच गट नंबर ३३९ अन्वये एक हेक्टर पाच आर अशी शेती मृत्युपत्र करून लिहून दिली होती. त्या बाबत  दुय्यम निबंधक निफाड यांचेकडे दस्त नोंदणी केला होता. त्या अनुषंगाने तक्रारदार यांच्याकडे केलेल्या अर्जाअन्वये तक्रारदार व त्यांचे वडील यांचे नाव सदरील जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद घेणे कामी महेश सहदेव गायकवाड ( वय- ४३ वर्ष, धंदा- नोकरी , तलाठी दावचवाडी अतिरिक्त कार्यभार चितेगाव, तालुका, निफाड, जिल्हा नाशिक ) पाच हजारांची लाच स्विकारताना ताब्यात घेण्यात आले. लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संदिप घुगे, 

संजय चव्हाण यांची स्विकृत संचालकपदी निवड !

इमेज
संजय चव्हाण यांची स्विकृत संचालकपदी निवड ! नाशिक, न्यूज मसाला वृत्तसेवा::- नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या स्विकृत संचालकपदी आज संजय यादवराव चव्हाण यांची निवड झाली.  "चव्हाणांच्या निवडीने संस्थेच्या तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातूनही अभिनंदनाचा वर्षाव !"      चव्हाण हे बरेच वर्ष संंचालक होते. गत पंचवार्षिक मध्ये त्यांच्या पत्नी सौ. आशा चव्हाण या उपाध्यक्षा होत्या. चव्हाण हे जनलक्षमी बँकेचे माजी संंचांलक असून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा फेडरेशनला व्हावा या उदात्त हेतुने आज फेडरेशनच्या संंचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या स्विकृत संचालकपदाला एकमुखाने मान्यता देण्यात आली. अध्यक्ष प्रमोद भाबड यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी उपाध्यक्षा शर्मीला कुसारे, राजेंद्र भोसले, संपतराव सकाळे, शिवाजी रौंदळ, प्रमोद मुळाणे, सतीश सोमवंंशी, सुरेश भोेये, भारत कोकाटे, अमोल थोरेे, रोहीत पगार, ज्ञानेेश्वर लहाणे, सविता धनवटे, राजेंद्र गावीत, राजाभाऊ खेमनार, शशिकांत उबाळे, अर्जुन चुंंबळे, दिप्ती पाटील, कविता शिंदे, सचीव सुनील वारुंगसे उपस्थित होते.

शासकीय वाहनचालक तब्बल दिड लाखांची लाच स्वीकारताना !

इमेज
शासकीय वाहनचालक तब्बल दिड लाखांची लाच स्वीकारताना ! नाशिक : त्रंबकेश्वर तहसील कार्यालयातील वाहनचालकाला तब्बल दीड लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले, विशेष म्हणजे यापूर्वी या वाहन चालकाने ५० हजारांची लाच घेतली होती,          तक्रारदाराने मौजे शिरसाठे तालुका इगतपुरी येथे गट क्रमांक १७६ मधील शेतजमीन विकत घेण्यासाठी विसारपावती नोटरी केली होती, शेतजमीन संदर्भात तत्कालीन उपविभागीय अधिकारी इगतपुरी, त्रंबकेश्वर येथे वाद चालू होता. या वादाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने करून दिल्याच्या मोबदल्यात2 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ५० हजार दिले होते. राहिलेलं दीड लाख घेताना चालक अनिल बाबुराव आगीवले नेमणूक वाहनचालक त्र्यंबकेश्वर यांना पथकाने रंगेहाथ पकडले. अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, प्रकाश महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली