वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये पोस्टर प्रेझेन्टेशनला उत्तम प्रतिसाद !

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये पोस्टर प्रेझेन्टेशनला उत्तम प्रतिसाद !
न्यूज मसाला वृत्तसेवा::-
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. यात ३२ गटांमधून १४८ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान कल्पनांनी अप्रतिम पोस्टर्स तयार केले होते.

स्पर्धेत रस्त्यावर खड्डे शोधणे आणि प्लास्टिक कचरा वापरून भरणे, फळ प्रतवारी प्रणाली यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, दुसरे पारितोषिक भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या सुरक्षेसाठी व्हिजिटर ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग सिस्टमने जिंकले आणि तिसरे पारितोषिक विजेते सोलनम ट्यूबरोसम डिसीज क्लासिफिकेशन युजिंग डीप लर्निंग होते.

         प्रा. विनोद सपकाळ यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले. स्पर्धेला कॅम्पस संचालक प्रा. अशोक चव्हाण, प्राचार्य डॉ. आलम एन. शेख सर यांनी भेट दिली. डॉ. रईस मुल्ला,  डॉ. प्रमोद भावार्थे, प्रा. स्वप्नील देसाई आणि डॉ. महेंद्र पवार यांनी पोस्टर्सचे मूल्यमापन केले. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याची चाचणी घेण्याची आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची संधी मिळाली. ह्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या समारोपासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदिप माने यांनी आभार मानले. एकूणच ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।