शासकीय वाहनचालक तब्बल दिड लाखांची लाच स्वीकारताना !

शासकीय वाहनचालक तब्बल दिड लाखांची लाच स्वीकारताना !
नाशिक: त्रंबकेश्वर तहसील कार्यालयातील वाहनचालकाला तब्बल दीड लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले, विशेष म्हणजे यापूर्वी या वाहन चालकाने ५० हजारांची लाच घेतली होती,

         तक्रारदाराने मौजे शिरसाठे तालुका इगतपुरी येथे गट क्रमांक १७६ मधील शेतजमीन विकत घेण्यासाठी विसारपावती नोटरी केली होती, शेतजमीन संदर्भात तत्कालीन उपविभागीय अधिकारी इगतपुरी, त्रंबकेश्वर येथे वाद चालू होता. या वादाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने करून दिल्याच्या मोबदल्यात2 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ५० हजार दिले होते. राहिलेलं दीड लाख घेताना चालक अनिल बाबुराव आगीवले नेमणूक वाहनचालक त्र्यंबकेश्वर यांना पथकाने रंगेहाथ पकडले. अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, प्रकाश महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।