पोस्ट्स

याचिका फेटाळली असेल तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत !

इमेज
याचिका फेटाळली असेल तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत !  शिंदे- फडणवीस सरकार मराठा समाजाला न्याय मिळवून देतील - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास         नाशिक - मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन सोडवायला हवा. शिंदे-फडणवीस सरकार योग्य पद्धतीने काम करून मराठा समाजाला न्याय मिळवून देतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी  व्यक्त केला.           मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने बोलावलेल्या बैठकीतून मराठा समाजाबाबत सरकारची आत्मियता दिसून येत, असेही त्यांनी नमुद केले. बावनकुळे म्हणाले, मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्य

कृषी अधिकारी ५०,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
कृषी अधिकारी ५०,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !          नासिक::- तालुका कृषी अधिकारी वर्ग (२ राजपत्रित) आलोसे अण्णासाहेब हेमंत गागरे, वय ४२ वर्ष, सिन्नर तालुका (अतिरिक्त कार्यभार निफाड तालुका) जिल्हा नाशिक याने ४,००,०००/-₹ लाचेची मागणी केली होती, तडजोडी अंती २,००,०००/- रूपये देण्याचे ठरले त्याचा पहिला हप्ता म्हणून ५००००/- रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.              लाचेचे कारण यातील तक्रारदार हे सिन्नर एमआयडीसी या ठिकाणी शेती यंत्रे व अवजारांचे उत्पादन करतात. त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रे व अवजारांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदान वितरित करण्यात येत असते. परंतु आलोसे यांनी तक्रारदाराकडून उत्पादित केलेली यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे भासवून तक्रारदार यांना त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याकरिता आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडून रू ४,००,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती रू २,००,०००/- लाच घेण्याचे निश्चित केले व त्यातील लाचेचा पहिला हफ्ता रू

हिवताप / डेंगी नागरिकांनी काय काळजी घ्यावी !

इमेज
हिवताप / डेंगी नागरिकांनी काय काळजी घ्यावी ! जागतिक हिवताप दिनानिमित्त २५ एप्रिल रोजी विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन-वैशाली पाटील #न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.   नाशिक (जिमाका वृत्तसेवा)::- दरवर्षी जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. त्यानुसार या वर्षीही  जिल्ह्यात व मनपा कार्यक्षेत्रात विशेष जनजागृतीपर मोहिम आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी यात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन  जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे.          या मोहिमेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. त्यात प्रभात फेरी, सायकल-दुचाकी रॅली, हिवताप माहिती विषयी प्रदर्शन, गर्दीची ठिकाणे जसे बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे फ्लेक्सद्वारे जाहिराती यांचा समावेश आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप आजार व त्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील आरोग्य सेवक, सेविका, आशा वर्कर्स यांच्यामार्फत डास अळी सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण, अबेटिंग, जलद ताप सर्वेक्षण, गप्पीमासे सोडणे मोहिम, व्हेंट पाईपला जाळ्या लावणे, आरोग्य शिक्

विद्यार्थिनींची सलग १८ तास अभ्यास स्पर्धा संपन्न !

इमेज
विद्यार्थिनींची सलग १८ तास अभ्यास स्पर्धा संपन्न ! सामाजिक न्याय पर्व, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींची १८ तास अभ्यासाची स्पर्धा संपन्न !       नाशिक (दि.२१)::- समाज कल्याण विभागाच्या वतीने सामाजिक न्याय पर्व हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिनांक १ एप्रिल ते दिनांक १ मे २०२३ या महिनाभराच्या कालावधीत त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात येत आहे.            येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (जुने), मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह युनिट-४ व गुणवंत मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह येथील विद्यार्थिनींनी १८ तास अभ्यास स्पर्धा आयोजित केली होती. डॉ.बाबासाहेब  आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तिन्ही वसतिगृहातील ५५ विद्यार्थ्यीनी या १८ तास अभ्यास स्पर्धत सहभागी होऊन अभिनव पद्धतीने जयंती कार्यक्रम साजरा केला. सकाळी ६ वाजता सुरू झालेली स्पर्धा रात्री दीड वाजता संपन्न झाली. वसतिगृहाच्या वाचनालयात या स्पर्धेची सोय करण्यात आली होती. सदर विद्यार्थिनींनी आपापल्या विषयाच्या पाठ्यक्रम अभ्यासक्रमाचे अध्ययन केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना प्रेरणा मिळावी म्हणून श्रीमती हर्ष

२८ ते ३० एप्रिल कालावधीत संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन !

इमेज
२८ ते ३० एप्रिल कालावधीत संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन ! दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा 'संगीत नाट्य महोत्सव २०२३' ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)::- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने २८ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत संगीत नाट्य महोत्सव आयोजित केला असून नाट्यरसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. दररोज संध्याकाळी ५.३० वाजता त्याचे आय़ोजन संस्थेच्या वा. वा. गोखले (वातानुकूलित) सभागृहात होणार आहे.               गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत शारदा हे संगीत नाटक शुक्रवार दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी सादर होईल. पुणे येथील भरत नाट्य संशोधन मंदिर ही नाट्यसंस्था त्याचे सादरीकरण करेल. शनिवार दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित आणि संगीत दिग्दर्शक कै. भास्करबुवा बखले यांचे संगीत स्वयंवर हे संगीत नाटक पुणे येथील कलाद्वयी ही संस्था सादर करेल. रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी विद्याधर गोखले लिखित संगीत मदनाची मंजिरी हे नाटक पुणे येथील कलाद्वयी संस्थेचे कलाकार सादर करणार असून त्याचे संगीत दिग्दर्शन प्रभाकर भालेकर आणि संगी

सावधान, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्न करताय ? प्रशासकीय कारवाई पासून सावध रहा !!

इमेज
सावधान, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्न करताय ? प्रशासकीय कारवाई पासून सावध रहा !! बालविवाह प्रतिबंधासाठी धडक मोहीम ! जि.प. महिला व बालकल्याण विभाग करणार कारवाई ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.        नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अक्षय तृतीयेच्या मुहूर्त साधत मोठ्या प्रमाणावर विवाह केले जातात यामध्ये बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे अशा प्रकारचे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने धडक मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यासंबधी महिला व बालकल्याण विभागाला निर्देश दिले असून त्यानुषंगाने महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी गुरुवारी सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक घेवून संपूर्ण जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी विशेष धडक मोहीम राबवण्याचा सूचना दिल्या.           ग्रामीण भागात लहान वयात मुलामुलींची लग्न लावून दिली जातात, शासनाने विवाह योग्य वय हे मुलाचे २१ व मुलीचे १८ ठरवून दिले आहे तरीसुद्धा अनिष्ठ रूढी परंपरांच्या विळख्यात व चुकीच्या धारण

अक्षय तृतीयेचा सकारात्मक संदेश !शुभमुहूर्ताचा दिवस व पुजेची वेळ खालील लिंकवर क्लिक करून जाणून घ्या !!

इमेज
अक्षय तृतीयेचा सकारात्मक संदेश ! शुभमुहूर्ताचा दिवस व पुजेची वेळ खालील लिंकवर क्लिक करून जाणून घ्या !! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.          वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला (तिसरा चंद्रदिवस) साजरा केला जाणारा अक्षय तृतीया हा हिंदू सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. अक्षय तृतीयेला अखाजी असेही  म्हणतात. ‘अक्षय’ म्हणजे ज्याचा कधीही क्षय म्हणजेच नाश होत नाही. या दिवशी केले जाणारे कोणतेही कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न समाप्त होणारे फळ देते  म्हणूनच या तिथीला जेवढे पुण्य कार्य व दान धर्म केले जाते त्याचे शुभ फळ निश्‍चितच मिळते.             अक्षय तृतीया विवाहासाठी शुभ दिवस मानला जातो. ह्या दिवशी विवाह केल्याने विवाहित जोड्याचे बंधन कायम टिकते. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. याच दिवशी आकाशगंगेत निवास करणारी पवित्र गंगा नदी राजा भगीरथांच्या तपामुळे भगवान शंकरांनी पृथ्वीवर पाठवली होती तर देवी अन्नपूर्णेचा जन्म अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी झाला होता, असे मानतात. या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करून गरिबांना दान दिले जाते.  दक्ष

जागतिक बौद्ध परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन !

इमेज
जागतिक बौद्ध परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन ! “बुद्ध तत्वज्ञानातील सदसद्विवेकबुद्धी शाश्वत आहे” “भगवान बुद्धांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत,भारताने जागतिक कल्याणासाठी नवे उपक्रम हाती घेतले आहेत.” “आम्ही भगवान बुद्धांचा संदेश आणि मूल्ये यांचा सातत्याने प्रचार-प्रसार करतो आहोत” “भारतीय तत्वज्ञानानुसार, प्रत्येक मानवाचे दु:ख हे आपले स्वतःचेच दु:ख आहे, असे इथले लोक मानतात’ “आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेसारख्या व्यासपीठांमुळे समविचारी आणि समभावना असलेल्या देशांमध्ये बौद्ध धम्म आणि शांततेचा प्रसार करण्याची संधी मिळते.” “आता प्रत्येक व्यक्तीचे आणि देशाचे प्राधान्य जगाच्या हिताचे तसेच, देशाच्या हिताचे असले पाहिजे, अशी आज काळाची गरज आहे.” “समस्यांवर उपाय शोधण्याचा मार्ग म्हणजे बुद्धाचा मार्ग” “आज जगाला भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येवर गौतम बुद्धांनी उपाय सांगितले आहेत.” “बुद्धांचा मार्ग म्हणजे,भविष्याचा मार्ग आणि शाश्वततेचा मार्ग” “मिशन लाईफ वर देखील बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव असून,बुद्धांचेच विचार पुढे नेणारे आहे हे मिशन ” न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333

बांधकाम क्षेत्रातील मोठी खळबळ !

इमेज
बांधकाम क्षेत्रातील मोठी खळबळ ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801, शहरात आयकर विभागाचे छापे !     नाशिक(प्रतिनिधी)::- शहरात दहा पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालय, घरामध्ये आयकर विभागाने छापे टाकत कारवाईला सुरुवात केल्याने शहरातील बांधकाम क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळीच आयकर विभागाच्या विविध पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकत कारवाई करत आहेत.        शहराच्या  बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालये, त्यांच्या मॅनेजरसह महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने याठिकाणी आयकरचे पथक दाखल झाले आहेत. या छाप्यांमध्ये नामांकीत बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.      आयकर विभागाचे अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील या पथकांनी एकाचवेळी बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, फार्म हाऊस आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकला आहे. ७४ ठिकाणांवर जवळपास १५० पेक्षा अधिक आयकर अधिकारी व कर्मचारी दाखल असल्याचे सांगितले जाते. हे सर्व अधिकारी नाशिक, औरंगाबाद , पुणे , मुंबई येथील असल्याचे सांगितले जा

२१ एप्रिल रोजी प्रतिनिधी निवड !

इमेज
२१ एप्रिल रोजी प्रतिनिधी निवड ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801 विद्यार्थी प्रतिनिधी निवडीकरीता दि. २१ एप्रिल रोजी निवडणूक         नाशिक (दि.१९) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेतून अधिसभेकरीता विद्यार्थी प्रतिनिधी निवडीबाबत शुक्रवार, दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी निवडणूक जाहिर करण्यात आली आहे. याबाबत निवडणुक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठ अधिनियम १९९८ मधील कलम २३(२) (टी) नुसार विद्यापीठ अधिसभेकरीता तीन विद्यार्थी प्रतिनिधींची निवड निवडणूक प्रक्रियेव्दारे करण्यात येते. याअनुषंगाने संलग्नित महाविद्यालयांकडून विद्यापीठास प्राप्त झालेल्या विद्यार्थी सचिवांच्या यादीतून विद्यार्थी परिषद गठित करण्यात आली आहे. सदर नवनियुक्त विद्यार्थी परिषदेतील सदस्यांमधून विद्यापीठ अधिसभेवर तसेच कार्यकारी समितीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.           विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेतून अधिसभेसाठी प्रतिनिधी निवडीबाबत निवडणूक कार्यक्रमपत्रिका व विद्यार्थी सचिवांची यादी विद्याप