कृषी अधिकारी ५०,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

कृषी अधिकारी ५०,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
 
       नासिक::- तालुका कृषी अधिकारी वर्ग (२ राजपत्रित) आलोसे अण्णासाहेब हेमंत गागरे, वय ४२ वर्ष, सिन्नर तालुका (अतिरिक्त कार्यभार निफाड तालुका) जिल्हा नाशिक याने ४,००,०००/-₹ लाचेची मागणी केली होती, तडजोडी अंती २,००,०००/- रूपये देण्याचे ठरले त्याचा पहिला हप्ता म्हणून ५००००/- रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

             लाचेचे कारण यातील तक्रारदार हे सिन्नर एमआयडीसी या ठिकाणी शेती यंत्रे व अवजारांचे उत्पादन करतात. त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रे व अवजारांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदान वितरित करण्यात येत असते. परंतु आलोसे यांनी तक्रारदाराकडून उत्पादित केलेली यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे भासवून तक्रारदार यांना त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याकरिता आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडून रू ४,००,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती रू २,००,०००/- लाच घेण्याचे निश्चित केले व त्यातील लाचेचा पहिला हफ्ता रू ५०,०००/- आलोसे यांनी पंचासमक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
             कारवाईतील सापळा अधिकारी पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील, सापळा पथक एएसआय सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नारायण न्याहाळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

त्र्यंबकेश्वरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई सुरू; कुंभमेळ्यापूर्वी दर्शन मार्ग मोकळा करण्यास गती

राष्ट्रीय मतदार दिन, राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक घटना. 'ग्रेट व्हाइट पेलिकन (रोजी पेलिकनचे) नांदूर मध्यमेश्वरमध्ये आगमन !