बांधकाम क्षेत्रातील मोठी खळबळ !

बांधकाम क्षेत्रातील मोठी खळबळ !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801,

शहरात आयकर विभागाचे छापे !

    नाशिक(प्रतिनिधी)::- शहरात दहा पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालय, घरामध्ये आयकर विभागाने छापे टाकत कारवाईला सुरुवात केल्याने शहरातील बांधकाम क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळीच आयकर विभागाच्या विविध पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकत कारवाई करत आहेत.
       शहराच्या  बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालये, त्यांच्या मॅनेजरसह महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने याठिकाणी आयकरचे पथक दाखल झाले आहेत. या छाप्यांमध्ये नामांकीत बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

     आयकर विभागाचे अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील या पथकांनी एकाचवेळी बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, फार्म हाऊस आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकला आहे. ७४ ठिकाणांवर जवळपास १५० पेक्षा अधिक आयकर अधिकारी व कर्मचारी दाखल असल्याचे सांगितले जाते. हे सर्व अधिकारी नाशिक, औरंगाबाद , पुणे , मुंबई येथील असल्याचे सांगितले जाते.
       आयकर विभागाच्या छाप्यांनी नाशिकच्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठीच खळबळ उडाली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।