पोस्ट्स

रविवारी मोहम्मद रफींच्या स्मृतीदिनी तेरी आँखो के सीवा... संगीत मैफल

इमेज
रविवारी मोहम्मद रफींच्या स्मृतीदिनी  तेरी आँखो के सीवा... संगीत मैफल         नाशिक ( प्रतिनिधी )::-लोकप्रिय गायक मोहम्मद रफी यांची रविवारी (दि. ३०) ४३ वी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त सूर शारदा म्युझिकल फाउंडेशनतर्फे गायक घनश्याम पटेल यांनी 'तेरी आँखो के सीवा' या संगीत मैफलीचे आयोजन केले आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता ही विनामूल्य मैफल होईल.          मोहम्मद रफींनी हजारो सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांना बहाल केला आहे. त्यातील निवडक गाणी प्रमुख गायक घनश्याम पटेल यांच्यासह संजय डेरे, प्रकाश रत्नाकर, मनोहर देवरे, अमित गुरव सादर करणार आहेत. त्यांना गायिका स्मिता पांडे, उर्मिला शिंदे, नीता पवार स्वरसाथ करतील. संगीत संयोजन गायक नंदकुमार देशपांडे यांचे आहे. संगीतसाथ अमोल पाळेकर व सहकारी करतील. पवन वंजारी तांत्रिक बाजू सांभाळणार असून उस्मान पटणी‌  निवेदनाद्वारे रफींच्या सुरेल कारकिर्दीचा आढावा घेतील. सर्व रसिकांनी उपस्थित राहून सुवर्णमयी काळातील सुमधूर गाण्यांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर ! उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान !

इमेज
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर ! उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान ! जिल्हाध्यक्षपदी रवींद्र पगार, शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्षपदी विष्णूपंत म्हैसधुणे, गोरख बोडके तर महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी बाळासाहेब कर्डक यांची नियुक्ती !             मुंबई,नाशिक::- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून नाशिक शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी रवींद्र पगार, नाशिक शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे,जिल्हा कार्याध्यक्षपदी विष्णूपंत म्हैसधुणे व गोरख बोडके यांची तर महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी बाळासाहेब कर्डक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

संशयास्पद लाखो रुपयांचा निम कोटेड युरीया पकडला, संशयितासह दोघांवर गुन्हा दाखल !

इमेज
संशयास्पद लाखो रुपयांचा निम कोटेड युरीया पकडला, संशयितासह दोघांवर गुन्हा दाखल !           नासिक::- स्थानिक गुन्हे अन्वेषण नाशिक शाखेने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रुद्राय हाॅटेल, निफाड येथे ट्रक क्रमांक एम. एच. १८ बी. एच. १७८६ मध्ये रक्कम रुपये ३५ लाख मुल्य असलेले संशयास्पद निम कोटेड युरीयाच्या ५० कि. ग्रॅ. च्या ४९३ गोण्या, निमकोटेड युरीयाच्या ४५ कि. ग्रॅमच्या ९ गोण्या, स्टीचींंग मशिन, चंबल फर्टीलायझस, कृभको व झुआरी या ५२९ रिकाम्या गोण्या, ट्रक असा मुद्देमाल जप्त करून निफाड पोलिस स्टेशन येथे जगन सुर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक यांनी संशयीत व इतर २  विरोधात खत नियंत्रण आदेश १९८५,  जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ व भादंवि ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.          निफाड पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण व कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईमध्ये मोहन वाघ सर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक व शहाजी उमप, पोलिस अधीक्षक, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली जगन सुर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी सागर कोते, सहायक पोलिस निरीक्षक, नितेंद्र पानपाटील, विभागीय गुण

३५० वा राज्याभिषेक बोधचिन्हाचे लोकार्पण !

इमेज
३५० वा राज्याभिषेक बोधचिन्हाचे लोकार्पण !          मुंबई -नासिक::- “३५० वा शिवराज्याशिषेक” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचे पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनामनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा या मागील उद्देश आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार प्रसिद्धित शासकीय पत्रव्यवहारात सदर बोधचिन्हाचा वापर करण्याचा शासन निर्णय राज्यपालांच्या आदेशानुसार काढण्यात आला.           बोधचिन्हाचा सर्व शासकीय पत्रव्यवहारात, प्रचार- प्रसिद्धित कटाक्षाने वापर करण्यात यावा. शासकीय कार्यालयात दर्शनी भागात बोधचिन्ह चित्रित करण्यात यावे अशा सूचना सर्व क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

शास्त्रीय गायक, मार्गदर्शक पं. शशिकांत मुजुमदार यांचे निधन, संगीतक्षेत्रात शोक व्यक्त !

इमेज
शास्त्रीय गायक, मार्गदर्शक पं. शशिकांत मुजुमदार यांचे निधन, संगीतक्षेत्रात शोक व्यक्त !                    नाशिक ( प्रतिनिधी ) पंडित शशिकांत मुजुमदार ( ८७) यांचे अल्पश्या आजाराने शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, दोन बंधू असा मोठा परिवार आहे. काल  रविवारी सकाळी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्रात शोक व्यक्त होत आहे.         त्यांचा अल्प परिचय - शशिकांत मुजुमदार यांचा जन्म १९३७ साली नाशिक येथे झाला. वयाच्या सातव्या वर्षापासून संगीताची आवड असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी विष्णू संगीत विद्यालयामध्ये स्व. त्रिवेदी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास पाठवले. शालेय शिक्षण चालू असताना संगीताचे शिक्षण पण सुरु होते. इच्छा असूनही आर्थिकदृष्ट्या परिस्थिती नसल्याने मोठ्या गायकाकडे गुरुकुल पध्दतीने शिक्षण घेता आले नाही. मुंबईला पंडित फिरोज दस्तुर यांच्याकडे त्यांनी काही काळ मार्गदर्शन घेतले. पण तेही पुढे जास्ती दिवस जमले नाही. नंतर स्वतः कठोर रियाज करून किराणा घराण्याचे संगीत आत्मसात केले.  सुरवातीला जिल्हाधिकारी कार्यालयात

डॉ. ज्योती कदम यांना शिक्षण, साहित्य व संशोधनातील योगदानाबद्दल गुरुरत्न सन्मान २०२३ प्रदान !

इमेज
डॉ. ज्योती कदम यांना शिक्षण, साहित्य व संशोधनातील योगदानाबद्दल गुरुरत्न सन्मान २०२३ प्रदान ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक,                  बृजलोक साहित्य कला संस्कृती अकादमी आग्रा यांच्यावतीने शिक्षण, साहित्य आणि संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी नुकतेच डॉ. ज्योती कदम यांना 'गुरुरत्न सन्मान २०२३' या पुरस्काराने गौरविण्यात आले. बृजलोक साहित्य कला संस्कृती अकादमीचे अध्यक्ष मुकेशकुमार वर्मा, कार्याध्यक्ष राहुल परिहार, प्रीतम निषाद, रामसुरत बिंद, प्रकाश जडे, प्रशांत असनारे, आसावरी काकडे, मारुती कटकधोंड, अशोक तेरकर, विजया नेरकर, कृष्णा शेवडीकर, नागेश शेवाळकर, ऋचा थत्ते, प्रल्हाद लुलेकर, विशाल इंगोले, भास्कर बडे, दिनकर जोशी, मारुती सावंत, उर्मिला चाकुरकर, माधुरी चौधरी यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. ज्योती कदम या मराठी, हिंदी भाषेच्या साहित्यिक असून त्यांची आठ पुस्तके प्रकाशित आहेत. यापूर्वीही त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

स्वयंप्रेरणा चित्रप्रदर्शन प्रेरणादायी-नीलिमाताई पवार

इमेज
स्वयंप्रेरणा चित्रप्रदर्शन प्रेरणादायी-नीलिमाताई पवार             नाशिक ( प्रतिनिधी )::-  करणने आपल्या कलेचा छंद जिवंत ठेवला. त्याने सातत्याने चित्रे रंगवून चित्रकलेत प्राविण्य मिळवले. त्याच्या पहिल्याच चित्रप्रदर्शनात याचा प्रत्यय येतो. त्याचा हा प्रयत्न इतर युवकांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी केले. स्वयंप्रेरणा चित्रप्रदर्शनाच्या उदघाट्नप्रसंगी त्या बोलत होत्या.    चित्रकलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता करण धोंडगे या युवकाने स्वयंप्रेरणेने कलासाधाना सुरु ठेवली. कृषी अभ्यासक्रम शिकताना तो आपला छंद जपतो आहे. त्याचे पहिलेच  'स्वयंप्रेरणा' हे चित्रप्रदर्शन नाशिकरोडच्या पीएनजी कलादालनात भरविण्यात आले आहे. करण विलास धोंडगे सध्या नाशिकच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषीमहाविद्यालयात बीएससी ऍग्रीकल्चरच्या तिसऱ्या वर्गात शिकत आहे. तो सातत्याने चित्रे रंगविण्यात रमून जातो. त्याचे स्वयंप्रेरणा चित्रप्रदर्शन नाशिकरोडला पासपोर्ट ऑफिस शेजारी पु.ना. गाडगीळ कलादालनात दि. ३० जुलै पर्यंत दररोज सुरु राहील. सकाळी ११ ते रात्री ८ या

जिल्हा सरकारी व परिषद बॅंकेच्या निवडणूक वचननाम्यात दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करणार- नवनिर्वचित चेअरमन बाळासाहेब ठाकरे यांची घाेषणा !

इमेज
जिल्हा सरकारी व परिषद बॅंकेच्या निवडणूक वचननाम्यात दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करणार- नवनिर्वचित चेअरमन बाळासाहेब ठाकरे यांची घाेषणा !       नासिक( प्रतिनिधी)::- नाशिक  जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅंकेच्या सभासदांनी सहकार पॅनेलला २१-० अशी आघाडी देत निवडणूकीतील वचननाम्यावर जो विश्वास व्यक्त केला तो १०० टक्के पूर्ण करण्यात येणार आहे. बॅंकेच्या व सभासदांच्या हितासाठी आम्ही सर्व समविचारी असून नवनिर्वाचित संचालकांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे प्रतिपादन चेअरमन बाळासाहेब ठाकरे -पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.          सभासदांच्या मुलींसाठी बॅंकेमार्फत ‘सुकन्या विवाह याेजना’ हाती घेण्यात आली असून मसूदा तयार करण्यात येत आहे. या याेजनेंतर्गत सभासद कन्येच्या विवाहानिमित्त ११ हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे.               जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बॅंकेच्या निवडणूकीनंतर प्रथमच संचालक मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. सभासदांनी जाे विश्वास  दाखवला त्यास कधीही तडा जाऊ दिला जाणार नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. कर्जाचा व्याजदर कम

जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. अभयकुमार धानोरकरांची नियुक्ती !

इमेज
जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. अभयकुमार धानोरकरांची नियुक्ती !     छत्रपती संभाजीनगर : येथील जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभयकुमार धानोरकर यांची जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नुकतीच बढतीवर नियुक्ती झाली आहे.             डॉ. अभयकुमार धानोरकर हे छत्रपती संभाजीनगर येथील उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांचे पती असून ज्येष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ यांचे ते जावई आहेत.

अहिरे यांना राज्यशासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर ! सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव !!

इमेज
अहिरे यांना राज्यशासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर ! सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव !! ग्रामविकास विभागाच्या वतीने २०२० -२१ गुणवंत कर्मचारी पुरस्काराची घोषणा          नाशिक : ग्राम विकास विभागांतर्गत राज्य शासनाच्या तसेच पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात, अशा काही योजना प्रकल्प राबवितांना संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्याचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य पणाला लागते. असे प्रकल्प पूर्ण करताना अधिकारी / कर्मचाऱ्यामधील विशेष वैयक्तिक कौशल्य व गुणवत्ता आढळून येते. अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची योजना शासनाने ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय, दिनांक २ सप्टेंबर २००५ अन्वये सन २००५-२००६ पासून सुरु केली आहे. त्यानुषंगाने सन २०२० २०२१ यावर्षी ग्राम विकास विभागातील मंत्रालयातील (खुद) व क्षेत्रिय स्तरावरील गुणवंत अधिकारी कर्मचारी पुरस्काराची घोषणा ग्रामविकास विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक प्रदीप अहिरे यांची निवड गुणवंत कर्मचारी म्हणून करण्यात आली आहे.         नाशिक जिल्हा परिषदेत कार्यरत असताना त्यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेत