पोस्ट्स

"श्री साखर व श्री मोदक महानैवेद्य" अर्पण सोहळा !!

इमेज
"श्री साखर व श्री मोदक महानैवेद्य" अर्पण सोहळा !!           नासिक (प्रतिनिधी)::- नासिक महानगर क्षेत्रातील श्री गजानन महाराजांचे भक्त मंडळे व संस्थेच्या वतीने सोमवार दि. २४ जुलै २०२३ रोजी श्री क्षेत्र शेगांव येथे साखर व मोदक महानैवेद्य अर्पण सोहळा संपन्न होणार आहे.         या पूर्वी ६ ऑगस्ट २०१९ साली नाशिक महानगर क्षेत्रातील सर्व भक्तांनी मिळून सुमारे साडेतीन लाख मोदकाचा महानैवेद्य अर्पण सोहळा शेगांव येथून पंढरपूर येथे जाणारी व परत येणारी पायदळवारीच्या वेळी श्री मोदक व त्यानंतर २०२० मध्ये झुणका-भाकरी महानैवेद्य अर्पण सोहळा संपन्न झाला होता.              साखरेबरोबरच मोदक महानैवेद्यही अर्पण करण्याचा संकल्प केलेला असून प्रत्येक भक्ताने किमान २१ मोदक, भक्तांनी संपुर्ण नांव व मो. नंबर ची यादी दि. २१ जुलै २०२३ पावेतो द्वारा- रविंद्र जोशी, ३ वेरोनिका सोसायटी, माधव काॅलनी, जनरल वैद्य नगर पोस्ट ऑफिस समोर, पौर्णिमा स्टाॅप, नासिक, येथे जमा करावे असे आवाहन रविंद्र जोशी, मिलिंद नाईक, अमोल शेळके, सौ. सुजाता करजगीकर, सतीश वावीकर, सतीश करजगीकर, सुमती जोशी, सौ. भाग्यश्री नाईक, विजय उदगीरकर, सं

Thanks Google, धन्यवाद गुगल, न्यूज मसालाच्या बातम्यांना गुगल रॅंकींग !

इमेज
धन्यवाद गुगल ! मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्या सामाजिक कार्याच्या बातमीला गुगलकडून प्रथम क्रमांकावर रॅंकींग करण्यात आले, न्यूज मसालाच्या अनेक बातम्यांचा समावेश गुगल रॅंकींग वर करण्यात आला आहे त्याबद्दल गुगलचे अभिनंदन व आभार ! बातमी बघण्यासाठी गुगलवर मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था किंवा इतर रॅंकींग झालेल्या बातम्यांसाठी न्यूज मसाला किंवा News Masala  टाईप करा ! संपादक न्यूज मसाला, संपादक लोकराजा दिवाळी विशेषांक नासिक Thanks Google! News of the social work of Marathi patrkar sahitya Sanskritik sanstha  Google was ranked first,  News Masala's news has been included on Google Ranking and thank you for Google Ranking ! Type News Masala for News for News मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था or for other rankings on Google!  Editor News Masala Editor Lokraja Diwali Issue  Nashik 

तक्रारदाराच्या घरी जाऊन लाच मागितली, पोलिस ठाण्यात महिला तलाठीसह तिघांवर गुन्हा दाखल !

इमेज
तक्रारदाराच्या घरी जाऊन लाच मागितली, पोलिस ठाण्यात महिला तलाठीसह तिघांवर गुन्हा दाखल !      नासिक::- साक्री तालुक्यातील रोजगांव येथील तलाठी श्रीमती ज्योती के. पवार, (वर्ग-3) सध्या नेमणूक-मंडळ अधिकारी, तामथरे मंडळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे, तसेच संगणक आॅपरेटर योगेश कैलास सावडे, व कोतवाल छोटू जाधव यांनी तक्रारदाराच्या घरी लाचेची रक्कम घेण्याकरिता गेले व पंच साक्षीदारांसमोर पुन्हा मागणी केल्याने सदर तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           तक्रारदार यांचे वडिलांचे व भावाचे नावाने रोजगाव ता.साक्री जि.धुळे येथील शिवारात सर्वे क्र.155/62 व 155/63 या शेतीचे खातेफोड करून तीन्ही भावांचे नावाने सातबारा तयार करून देण्याचे मोबदल्यात एकूण ४००००/- रू. लाचेची मागणी करून स्वतः तक्रारदार यांचेकडून १००००/- व मार्च-२०२३ मध्ये तक्रारदार यांचे वडिलांकडून १००००/- असे एकूण २००००/- रूपये काम करून देण्याचे मोबदल्यात अगोदरच घेतले.       त्यानंतर दि. १८ एप्रिल रोजी तक्रारदार यांनी ला.प्र.वि. नंदुरबार कार्यालयात तक्रार दिलेनंतर पंच साक्षीदारासमक्ष पडताळणी केली असता आलोसे तलाठी श्रीमती ज्योती पवार यांन

लेखक रवींद्र भयवाल यांना कादंबरी लेखनाचा प्रथम पुरस्कार !

इमेज
लेखक रवींद्र भयवाल यांना कादंबरी लेखनाचा प्रथम पुरस्कार !                संभाजीनगर (प्रतिनिधी)::- प्रसिद्ध लेखक कै. सुहास शिरवळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुहास शिरवळकर परिवारातर्फे आयोजित आणि स्टोरीटेल इंडिया प्रायोजित कादंबरी लेखन स्पर्धेत लेखक रवींद्र भयवाल लिखित "मिशन गोल्डन कॅट्स" या कादंबरीची निवड परीक्षकांनी 'विजेती कादंबरी' म्हणून केली आहे. या कादंबरी लेखन स्पर्धेत एकूण एकवीस लेखक सहभागी झाले होते. रवींद्र भयवाल यांच्या या यशामुळे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच समाजातील सर्व स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.                रवींद्र भयवाल यांची आतापर्यंत साहित्यातील विविध प्रकारात एकूण सहा पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांना राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.            रवींद्र भयवाल हे छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ यांचे सुपुत्र असून चेन्नई येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत विभागप्रमुख आहेत.

लंडन पॅलेस बॅंक्वेट हॉलमध्ये सनातन वैदिक धर्मसभेतर्फे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन !Srimad Bhagwat story organized by Sanatan Vedic Dharma Sabha at London Palace Hall !

इमेज
लंडन पॅलेस बॅंक्वेट हॉलमध्ये सनातन वैदिक धर्मसभेतर्फे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन ! Srimad Bhagwat story organized by Sanatan Vedic Dharma Sabha at London Palace Hall !          नाशिक ( प्रतिनिधी ) : सनातन वैदिक धर्मसभा, नाशिक तर्फे पुरुषोत्तम अधिक मासात सर्व भागवत भक्तांना उत्तम फलप्राप्ती व्हावी, या उद्देशाने शनिवार दि. ५  ते १५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ४ ते ७ या दरम्यान श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचे प्रमुख कथाकार विश्वविख्यात आचार्य महामण्डलेश्वर स्वामी विद्यानंद सरस्वती हे आहेत. तपोवनातील लंडन पॅलेस बॅक्वेट हॉलमध्ये हा सोहळा होणार आहे.               याप्रसंगी पत्रकार परिषदेत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी सांगितले की, धर्म शास्त्रानुसार प्रत्येक तीन संवत्सरांनंतर (तीन वर्षांनंतर)  पुरुषोत्तम मास येतो. या पुण्यप्रद महिन्यात जप, तपश्चर्या आणि दान केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते. या महिन्यात श्री कृष्ण स्मरण , श्रीमद भागवत कथा श्रवण  तसेच श्रीराम कथा श्रवण याचे विशेष महत्त्व आहे. या महिन्यास लोकपरंपरेनुसार अधिकमास, पुरुषोत्तम मास असे संबोधले जाते, पुरुषोत्तम म

पाच हजारांची लाच स्वीकारताना महीला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
पाच हजारांची लाच स्वीकारताना महीला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक::- सिन्नर येथील  उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सिन्नर येथील परीरक्षण भूमापक आलोसे प्रतिभा दत्तात्रय करंजे यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.              तक्रारदार यांनी मनेगाव ता. सिन्नर येथे सिटी सर्वे नंबर १९७, १९८, १९९ असे तिन प्लॉट पत्नीचे नावे खरेदी केले होते. त्यावरील जुने मालकाचे नाव कमी करून तक्रारदार यांचे पत्नीचे नवीन नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय सिन्नर येथे अर्ज केला होता. सदर नवीन नावाची नोंदणी व जुने नाव कमी करण्यासाठी आलोसे प्रतिभा करंजे यांनी रुपये ५०००/- लाचेची मागणी करून ती स्विकारली असता त्यांना त्यांचे कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.           सापळा अधिकारी, विश्वजीत जाधव पोलीस उप अधिक्षक, सहाय्यक सापळा अधिकारी परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. हवा. प्रकाश डोंगरे, पो हवा. संतोष गांगुर्डे, पो. हवा. प्रणय इंगळे, म पो. कॉन्स्टेबल श्रीमती शितल सूर्

नाशिकमध्ये राष्ट्रीय वेदशास्त्र महापरिषद, वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार वितरण !

इमेज
नाशिकमध्ये राष्ट्रीय वेदशास्त्र महापरिषद, वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार वितरण !            नाशिक ( प्रतिनिधी )- येथील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान, दक्षिणाम्नाय श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थान शृंगेरी, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्यातर्फे नाशिकमध्ये राष्ट्रीय वेदशास्त्र महापरिषद आयोजित करण्यात आली आहे.                        कुलगुरू प्रो. डॉ. हरे राम त्रिपाठी     दि.१३ जुलै रोजी पंचवटीतील सरदार चौकातून गोपाल मंगल कार्यालयात दुपारी १२.३० वाजता महापरिषदेला प्रारंभ होईल. दि.१४ रोजी महापरिषदेचे उद्घाटन प्रो. डॉ. हरे राम त्रिपाठी ( कुलगुरू, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, नागपूर) यांच्या हस्ते होईल. गंगापूररोडवरील शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कूर्तकोटी सभागृहात वेदशास्त्र संस्कृत पुरस्कार प्रदान सोहळा होईल. प्रतिष्ठानचे सचिव व प्रधानाचार्य वेदाचार्य रवींद्र पैठणे निमंत्रक आहेत. दि.१३ रोजी दुपारी १२.३० वाजता गोपाल मंगल कार्यालयात महापरिषदेचे उदघाट्न सत्र होईल. त्यानंतर वैदिक संहिता, जन संज्ञापन व संतांची वेदनिष्ठा या विषयावर परिसंवाद

साप्ताहिक न्यूज मसाला, दि.०६ जुलै २०२३ चा नियमित अंक ! Weekly News Masala, Regular issue of 6 July 2023.

इमेज
साप्ताहिक न्यूज मसाला, दि.०६ जुलै २०२३ चा नियमित अंक ! Weekly News Masala, Regular issue of 6 July 2023.

तलाठ्यासह कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
तलाठ्यासह कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !      नासिक::- त्र्यंबकेश्वर येथील तलाठी संतोष शशिकांत जोशी, कोतवाल रतन सोनाजी भालेराव कोतवाल यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           तक्रारदार यांनी जमीन खरेदी केली असून त्यांची सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करून दिल्याच्या मोबदल्यात वरील दोन्ही आलोसे यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम दोन हजार रुपये आलोसे क्रमांक एक यांनी तलाठी कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे पंच साक्षीदारास समक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले  असुन याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .              सापळा अधिकारी मीरा आदमाने, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक, सापळा पथक पो. ना. प्रवीण महाजन, पो. ना. नितीन कराड, पो. ना. प्रमोद चव्हाणके चालक पोहवा संतोष गांगुर्डे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

बॅंकेच्या नवनिर्वाचित संचालकांच्या वतीने खासदार गोडसेंचा सत्कार !

इमेज
बॅंकेच्या नवनिर्वाचित संचालकांच्या वतीने खासदार गोडसेंचा सत्कार !           नासिक::- नासिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक लि.नासिक च्या झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलने एकवीस-शून्य असे घवघवीत यश संपादन केले. या यशाचे श्रेय विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना देत त्यांचा सत्कार करण्यात आला.       सत्कार प्रसंगी चर्चा करताना संचालकांनी बॅंकेच्या सर्वांगिण प्रगतीसाठी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून उत्पन्नाच्या स्रोतावर कर वजावट केली जाते तर त्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्याच ठेवींवर मिळत असलेल्या व्याजावर पुन्हा कर कपात होते. ती होऊ नये यासाठी खासदार गोडसे यांनी प्रयत्न करावेत असे साकडे घालण्यात आले.        गोडसेंच्या सत्कार प्रसंगी पॅनेलच्या वतीने नवनिर्वाचित सदस्य प्रमोद निरगुडे, रविंद्र आंधळे, बाळासाहेब ठाकरेपाटील, विक्रम पिंगळे, अजित आव्हाड, विजय देवरे आदी उपस्थित होते.