पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला !      सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती                नासिक (प्रतिनिधी )::- प्रेक्षकांच्या उत्सुकतेचं कारण बनलेला मराठी चित्रपट 'गुलाबी' उद्या २२ नोव्हेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. अभ्यंग कुवळेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला आणि व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत हा चित्रपट मैत्री, स्वप्नं, आणि स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास रंगवतो. यात प्रमुख भूमिकांमध्ये अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे या तीन अभिनेत्रींच्या अभिनयाचा खास नजराणा प्रेक्षकांना पाहायला मिळेल असे आज झालेल्या पत्रकार परिषदेत अभ्यंग कुवळेकर यांनी सांगितले.                      'गुलाबी' चित्रपट जयपूर या गुलाबी नगरीत तीन स्त्रियांच्या अनोख्या प्रवासाची कहाणी सांगतो. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील या तिघींच्या आयुष्यातील मैत्री, स्...

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

इमेज
स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४   नाशिक  ( जिमाका वृत्तसेवा ):     महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्तीत संख्येने मतदान करावे यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजता  ‘ वोटोथॉन’ चे आयोजन केले आहे. या ‘वोटोथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्येक नागरिकांनी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.                जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात काल सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ.गेडाम बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालि...

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

इमेज
मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात  आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही              नाशिक ( प्रतिनिधी )  समाजातील सर्व घटकांसाठी काम केलेल्या मध्य नाशिक विधानसभेतील आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांचा विजय निश्चित‌ होणार. अशी ग्वाही मंगळवार ( दि.१२) सकाळ- सायंकाळच्या सत्रात भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली.     भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या  ‌‌पस्थितीत प्रभाग क्र.१२ मधील गायकवाड नगर, प्रथमेश नगर, मातोश्री नगर व गणेश कॉलनी या परिसरात  घरोघरी प्रचार संपर्क साधला. मध्य नाशिक विधानसभेतील महायुतीच्या उमेदवार प्रा. सौ. देवयानीताई फरांदे यांना आपले बहुमुल्य मत देऊन विजयी करावे असे आवाहन करण्यात आले. परिसरातील रहिवाशी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व आपले अमूल्य मत विकासपर्वाला असेल असे निक्षून सांगितले.    घरोघरी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते अभय छल्लाणी, नंदकुमार देसाई, नरेंद्र सोनवणे, प्रदीप पाटी...