विश्व मराठी संमेलन नासिकला होणार ! संमेलनात पुस्तक आदान-प्रदान उपक्रम राबविणार !

विश्व मराठी संमेलन नासिक मध्ये होणार ! संमेलनात पुस्तक आदान-प्रदान उपक्रम राबविणार ! मराठी भाषा मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्व तयारीची बैठक नाशिक::- नाशिक येथे २६ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत विश्व मराठी संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या पूर्व तयारीसाठी कार्यालय सुरू करून नियोजनाचा नियमितपणे आढावा घ्यावा, अशा सूचना उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी विश्व मराठी संमेलनाच्या नियोजनसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकुमार देवरे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, मराठी भाषा विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, समीक्षक डॉ. रमेश वरखेडे, उद्योजक धनंजय बेळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, साहित्यिक उपस्थित होत...