पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उल्लेखनीय::- सगळीकडे उन्हाची तीव्रता जाणवत असतानाही तालुक्यात आजपर्यंत एकही टँकर चालू नाही, तालुक्यात कुठल्याही ग्रामपंचायतचा पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव आलेला नाही.

इमेज
उल्लेखनीय::- सगळीकडे उन्हाची तीव्रता जाणवत असतानाही तालुक्यात आजपर्यंत एकही टँकर चालू नाही, तालुक्यात कुठल्याही ग्रामपंचायतचा पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव आलेला नाही. निफाड तालुक्यासाठी एकूण ९५ योजना मंजूर, त्यापैकी ९० योजनांचा पाणीपुरवठा सुरू, अपूर्ण ५  योजना पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू        निफाड::- शासकीय विभागाच्या वतीने गाव पातळीवरची विकास कामे करताना अधिकाऱ्यांनी जर तळमळीने, प्रामाणिकपणे लक्ष देऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर या योजनांना नक्कीच यश येते, या तत्वाने प्रशासनाच्या वतीने  प्रयत्न केल्यामुळे निफाड तालुक्यात जलजीवन मिशनच्या  मंजूर ९५ कामापैकी जवळजवळ ९० योजना सुरू झालेल्या आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी, पंचायत समिती निफाड, यांच्याकडून देण्यात आली. पाच गावांमध्ये जलस्रोत कोरडा जाणे किंवा पाणी क्षारयुक्त  लागणे, जलस्रोताचे  ठिकाण बदलणे, जागेची राहिलेली मोजणी अशा तांत्रिक कारणांमुळे अपूर्ण आहेत त्याही लवकरच पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत .      जलजीवन मिशन ही यो...

कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे व किटकनाशके पुरवावी- सुनिल बोरकर, गुण नियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय.

इमेज
कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन  शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे व किटकनाशके पुरवावी- सुनिल बोरकर, गुण नियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय.           नाशिक : जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांची खरिप हंगाम पूर्व प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करताना सुनिल बोरकर यांनी बियाणे, खते आणि किटकनाशके यांची विक्री करताना ऑनलाईन प्रक्रिया आत्मसात करुन कायद्यातील तरतुदींप्रमाणे कृषी निविष्ठांचे उत्पादन व विक्री करावी. जेणेकरुन शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे कृषी उत्पादन घेता येईल. याबाबत बोलताना, त्यांनी बियाणे विक्रीसाठी बनविलेल्या ‘साथी’ या पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन केले. बियाण्याचे उत्पादन ते विक्रीपर्यंत संपूर्ण माहिती मिळू शकते. आणि शेतकऱ्याला दर्जेदार बियाणे पुरवठा शक्य होतो. तसेच रासायनिक खतांची विक्री करताना ई-पॉस प्रणालीचा वापर करावा. तसेच ई-पॉस ऑनलाईन साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष उपलब्ध खतसाठा याची दररोज पडताळणी करावी. केंद्र शासनाच्या धोरणानुसार ई-पॉस वरील खत शासनाच्या माहिती आधारेच खतांचे जिल्ह्यात वितरण केले जाते. त...

भारताच्या ‘जीडीपी’ मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲंन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ (वेव्हज) चे प्रधानमंत्री यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

इमेज
भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा  मोठा वाटा असेल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲंन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ (वेव्हज) चे प्रधानमंत्री यांच्या हस्ते शानदार  उद्घाटन मुंबई  : भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट ,  क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अ‍ॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे  यशाचे दार उघडले जात असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.             वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात ‘वेव्हज’ परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन ,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,  रेल्वे ,  माहिती व प्रसा...