पोस्ट्स

मिसेस भारत आयकाँन २०१८ चा दुसरा सीजन येत आहे-अखिल बन्सल

रॉयल हेरिटेज ग्रुपतर्फे मिस आणि मिसेस भारत आयकॉन हा थाटामाटाचा भारतातील कार्यक्रम आहे.प्रत्येक घरातील मिस आणि मिसेससाठी हा सन्मान सोहळा आहे.                                 मिस आणि मिसेस भारत आयकॉनचे आयोजक आणि दिग्दर्शक श्री.अखिल बन्सल मिसेस भारत आयकॉन्च्या उत्तुंग यशानंतर श्री.अखिल बन्सल रॉयल हेरिटेजचे अध्यक्ष हे मिस आणि मिसेस भारत आयकॉन्चा दुसरा सिझन घेऊन येत आहेत.हा प्रथिष्टीत आणि अद्वितीय असा कार्यक्रम आहे.श्री.अखिल बन्सल म्हणतात की,टीम मिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018 हे सांगताना आनंद होतो की शीतल अरपल यांची पुणे  दिग्दर्शक  म्हणून बोर्डावर यांची नियुक्ती झाली आहे.                                                             पुण्यातील ऑडिशन या त्यांच्या मार्गदर्शनाखाली होतील. शीतल अरपल म्हणतात की त्यांना पुण्यातील फॅशन आणि मीडिया क्षेत्रातून खूप  चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि त्यांना त्याबद्दल सर्वांचे आभार मानायचे आहेत.या कार्यक्रमाचे ऑडिशन्स प्रत्येक शहरात होतील आणि मुंबई मध्ये अंतिम सोहळा होईल. मिस आणि मिसेस भारत आयकॉन ही प्रत्येक भारतीय / NRI मुली आणि लग्न झालेल्या बायकांसाठी खु

नावा नासिकची शान, व्यावसायिकताच नसुन कौटुंबिक भान असलेले आदर्श कुटुंब

इमेज
नावा'  चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न नाशिक- नाशिक अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज् वेल्फेअर असोसिएशन (नावा) चे कुटुंबियांसमवेत असलेले स्नेहसंमेलन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा त्र्यंबक रोडवरील हाॅटेल संस्कॄती येथे उत्साहात संपन्न झाली. सभेमध्ये नवीन कार्यकारिणी कार्यरत झाल्यापासून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जाहिरात दिन, माध्यमांमधील क्रिकेट स्पर्धा आणि भविष्यातील उपक्रमांवर चर्चा करण्यात आली .  सभासदांच्या जाहिरात व्यवसायातील समस्यांबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी विविध स्पर्धांचे कुटुंबियांसाठी आयोजन करण्यात आले ,त्यामध्ये सभासदांचे कुटुंबीय व त्यांची मुले मुली  उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. सर्व महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रमात रंगत आणली. याप्रसंगी अध्यक्ष विठ्ठल देशपांडे, संस्थापक अध्यक्ष, माजी अध्यक्ष  मोतीराम पिंगळे, विठ्ठल राजोळे ,  नितीन राका,  माजी सचिव मंगेश खरवंडीकर , कार्याध्यक्ष   राजेश शेळके,  सरचिटणीस दिलीप निकम, मिलिंद कोल्हे पाटील, गणेश नाफडे,  खजिनदार अमोल कुलकर्णी   सुहास मुंदडा,  अनिल अग्निहोत्री, अमित काळे, सुनील महामुनी, किरण पाटील, सतीश बोरा, महेश कलं

वाईन फेस्टिवलमुळे नासिकचे पर्यटनात वाढ होईल-आ.सीमा हिरे. अविस्मरणीय क्षणांचा अनोखा संगम म्हणजे नासिक व्हँली वाईन क्लस्टर व ग्रेप काउंटी-एक वाईन प्रेमी

इमेज
शुक्रवार ९ मार्च १८ नाशिक - एका बाजूला  "महेंगी हुई शराब के थोडी थोडी पिया करो" सारख्या मनाला भावणाऱ्या गझल आणि दुसरीकडे वाईनचे ग्लासवर ग्लास रिचवणारे दर्दी रसिक प्रेक्षक अशा अपूर्व योगात "हॉटेल ग्रेप काऊंटी" येथे नाशिक व्हॅली वाईन क्लस्टर आयोजित इंडिया ग्रेप हार्वेस्ट च्या पाचव्या सत्रास शुक्रवारी सुरुवात झाली . दुपारी ४ वाजेपासूनच शेतकरी बाजार मध्ये शेकडो ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती . अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला येथे विक्रीस आणला होता . त्याबरोबरच जिल्ह्यातील अनेक नामांकित वाईन उत्पादक कंपन्यांनी आपली उत्पादने टेस्टिंगसाठी  आणि ग्राहकांसाठी सादर केलीत . यावेळी शेतकऱ्यांच्या यशोगाथाही चित्रफितीद्वारे दाखविण्यात आल्या . यावेळी ग्रेप काउंटीचे किरण चव्हाण , इंडिया ग्रेप हार्वेस्ट चे अध्यक्ष जगदीश होळकर, सेक्रेटरी राजेश बोरसे , राजेश जाधव , प्रदीप पाचपाटील , मनोज जगताप , समीर रहाणे उपस्थित  होते . रात्री सत्यम आनंद यांचा गझल गायनाचा कार्यक्रम उशिरापर्यंत चांगलाच रंगात आला होता . "होश वालोंको खबर क्या" , "चाँदी जैसा रंग

लोकराज्य मासिकाचे जिल्हा परिषदेला वावडे ,शासनाला प्रशासनाचा आहेर !

इमेज
         नासिक::-महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र "लोकराज्य" जिल्हा परिषद सदस्यांना वाचण्यास मिळावे व शासनाचे कार्य, कार्यक्रम, योजनांची माहीती सर्वसामान्यांपर्यंत पोहचली पाहीजे या हेतूने तत्कालीन जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या अर्थसंकल्पात तरतूद केली होती.    गेल्या काही वर्षांपासुन रू  २५०००/- ची तरतूद असतांना आजपर्यंत सदस्यांना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून "लोकराज्य" मासिकाचा अंक बघायलाही मिळालेला नाही.     काल झालेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्प सभेत सदस्यांनी या तरतूदीच्या वेळी आश्चर्य व्यक्त केले की मासिक बघायला मिळाले नाही मात्र दरवर्षी तरतूद केली जाते ? या प्रश्नावर प्रदीप चौधरी यांनी उत्तरात सांगीतले, "दरवर्षी सेसमध्ये फक्त तरतूद करून ठेवतो, लोकराज्यची वार्षिक फी भरत नाही त्यामुळे सदस्यांना मासिक मिळत नाही".     यामुळे सभा आटोपल्यानंतर अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत, शासन जनतेसाठी काय करते हेच मुळी जनसामान्याना कळू द्यायचे नाही अशा प्रकारचा उपहासात्मक आरोप जिल्हा परिषद प्रशासनावर केला.

घरात स्त्री चा सन्मान करा. लक्ष्मी नांदेल--नामदार सौ.शितलताई सांगळे.

इमेज
नाशिक::-पाताळेश्र्वर माध्य .विद्यालय पाडळी येथे जागतिक माहिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या . प्रमुख वक्त्या म्हनुन प्रा .सौ.सुनिताताई कचरे संचालीका म .वि. प्र.सेवक सोसायटी , सौ . नलिनी क्षत्रीय, अध्यक्ष महिला मंडळ सिन्नर , सरपंच अनिता जाधव,अरूना रेवगडे , प्रज्ञा शिंदे,कुमोदीनी शिंदे ,मिना पाटोळे , शशीकला पाटोळे. अंजली आव्हाड , प्रतिभा शिरसाठ , वनिता रेवगडे, आनिता रेवगडे , शितल शिंदे , मनिषा पाटोळे जया पाटोळे,चित्रा वाघमारे , सोनाली गोसावी , सुनिता ढोली , सौ .पालवे प्रमुख पाहुण्या म्हनुन हजर होत्या.   प्रास्ताविक सौ . सविता देशमुख यांनी केले . तर आभार एम एम . शेख यांनी मानले .पाडळी, आशापुर, हिवरे , पीपळे , बोगीरवाडी ,ठाकरवाडी येथून मोठ्या प्रमाणात माहिला हजर होत्या. मुख्याध्यापक एस .बी.देशमुख यांनी स्वागत केले . सर्व शिक्षक हजर होते.

समाजकल्याण विभागांर्तगत दिव्यांग लाभार्थींना घरकुल योजनेचे धनादेशांचे सुनिता चारोस्कर यांच्या हस्ते वाटप

इमेज
नासिक::-जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांर्तगत ( 3% ) दिव्यांग लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे धनादेश आज समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.       याप्रसंगी प्रकाश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे, पंचायत समिती सभापती गायकवाड, उपसभापती वसंतराव थेटे , एकनाथराव खराटे, कैलास पाटील, विठ्ठलराव अपसुंदे, धिसाडे ताई, भूपेंद्र बेडसे, गोपाळ साहेब, व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.

पायाभूत काम करणारे ठेकेदार ! जयकुमार सुधीर जालोरी, (BE CIVIL) नासिक

इमेज
    नासिक::- अनेक प्रकारची जनहिताची कामे नोंदणीक्रुत ठेकेदारांमार्फत केली जातात पण प्रत्येक कामात दर्जा उत्तम राखला जाईल असे नाही, याला अपवाद म्हणून नासिक शहरांत गेल्या पाच वर्षापासुन एक नांव उदयांस आले आहे ते जयकुमार जालोरी यांचे.      नासिक मनपांत तसेच खाजगी कामांतून त्याचा प्रत्यय येत आहे, नुकतेच देवळाली कँम्प परिसरांतील "आदेश्वर सोसायटीचे" सुरू असलेले काम.      आदेश्वर सोसायटीच्या अंतर्गत रस्त्याचे काम सध्या जालोरी करीत आहेत, कामाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता ज्या तांत्रिक पद्धतीने काम करावयास हवे व कामाचा दर्जाही उत्तम राखायला हवा तशा पद्धतीचे आदर्श काम होत आहे यांमुळे सोसायटीचे सर्व सदस्य समाघानी असल्याचे जाणवते.       काम करतांना ज्या तांत्रिक व कुशल-अकुशल कामगांरांमार्फत काम केले जात अाहे त्याची प्रत आजच्या उपलब्ध साधनांद्वारे होत आहे, अशा पद्धतीने अनेक ठेकेदार कामे करतात परंतु सर्वांनीच अशी कामे केलीत तर खऱ्या विकासापासुन शहर वंचित राहणार नाही, नासिक शहर सुंदर आहेच पण आणखी सुंदर होण्यापासुन कोणी रोखू शकत नाही.       जयकुमार जालोरी यांच्या माध्यमातून होत असलेली