पोस्ट्स

आदीवासी विकास महामंडळाच्या कारभाराविरोधात ६ एप्रिल पासुन आमरण उपोषण !

इमेज
नासिक::-आदिवासी विकास महामंडळाचा कारभार  गेल्या दोन वर्षा पासून अतिशय धिम्या गतीने चालू असून संचालक मंडळाच्या सुचना व ठरावांची अंमलबजावणी होत नाही या विभागातले अधिकारी कोणाला जुमानत नसल्या मुळे आदिवासी योजना ठप्प होत आहेत. शासनाकडून आलेला निधी योजनावर खर्च होत नाही तो शासनास परत जात आहे. महामंडळाची पंप व पाईप योजनेचा खर्चीत निधी 43 कोटी खर्च न करता शासनाला परत केल्याप्रकरणी संचालक मंडळाला अंधारात ठेवले गेले.खावटी कर्ज वाटप योजनेचे 70 कोटी रूपये परत केल्या प्रकरणी दोशींवर कारवाई व्हावी.या करता व अशा अनेक मागण्यांकरता आदिवासी विकास भवनासमोर उपोषण करण्यात येणार असल्याची माहीती पत्रकार परिषदेत देण्यात आली या वेळी आदीवासी विकास महामंडळाचे भरतसिंग दुधनाग, धनराज महाले,मिनाक्षीताई वट्टी,अशोक मंगाम, मधुकर काठे,विठ्ठल देशमुख,केवलराम काळे,देविदास पाटिल, भगवानदादा वळवी, आदी उपस्तीत होते. सौजन्य नासिक लोकल, नासिक

अटक न करण्यासाठी हवालदाराने मागीतली २५००० ची लाच ! ४ एप्रिलची सलग तिसऱ्या घटनेत एकाच कारणासाठी लाच ! हवालदार जाळ्यात !

इमेज
तक्रारदाराच्या भावास पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जादा कलम लागू न करणे व  अटक करू नये यांसाठी पंचवीस हजार रूपयांची लाच स्विकारतांना नवघर पोलीस ठाणे ग्रामीण चा हवालदार अंकुष मंगल भोईर यांस ठाणे लाचलुचपत विभागाने कारवाई करून सापळा यशस्वी केला,       ४ एप्रिल हा दिवस खोपोली, उस्मानाबाद नवघर मधील पोलीसांच्या लाचखोरीचा तसेच तक्रारदारांस किंवा त्याच्या भावास वा दोघांना अटक करू नये या एकाच प्रकारच्या तक्रारींसाठी नोंद झाला.

माध्यमिक शाळा लिपीक व काँन्स्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात !

इमेज
उस्मानाबाद::-ढोकी पोलीस ठाण्यातील हेड काँनस्टेबल मधुकर प्रल्हाद कदम (आरोपी क्र-१) व जावळे-दुमाला येथील माध्यमिक विद्यालयाचा लिपीक सुनिल भास्कर जाधव (आरोपी क्र-२)यांना उस्मानाबाद लाचलुचपत युनिटने तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी ३ एप्रिलला ३०००/- रूपयांची मागणी केली होती, ती ४ एप्रिल रोजी आरोपी क्र-१ च्या सांगण्यावरून आरोपी क्र-२ ला स्विकारतांना उस्मानाबाद लाचलुचपत चमूने पकडले.

पोलीस निरिक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात ! चार लाखाची मागणी पैकी एक लाखाची रक्कम स्विकारतांना------

इमेज
ठाणे::-खोपोली पोलीस ठाणे, रायगडचे पोलीस निरिक्षक राजन नारायण जगताप यांनी ४०००००/- रूपये व दोन विदेशी दारूच्या बाटल्यांची मागणी त्क्रादाराकडे मागीतली होती त्यापैकी १०००००/- रूपये स्विकारतांना ४ एप्रिल रोजी रात्री सव्वानऊ वाजता लाचलुचपत खात्याकडून पकडण्यात आले.        तक्रारदाराच्या भावास पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करू नये तसेच तक्रारदार यांस इतर गुन्ह्यात अटक न करण्यासाठी सदर लाचेची रक्कम मागण्यांत आली होती.

जिल्हा क्रिडा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ! दोन लाख रूपयांची मागणी, ऐंशी हजार स्वीकारतांना सापडले !

इमेज
बीड येथील जिल्हा क्रिडा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ! सात व्यक्तींचे व्यायामशाळेच्या बांधकामाचे पहिल्या हप्त्याचे प्रत्येकी तीन लाख प्रमाणे अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी दोन लाख रूपयांची मागणी ७ फेब्रुवारी १८ ला फिर्यादी शेतकरी वय ५५ यांच्याकडे करण्यात आली होती.  यांत आरोपी नं १ जिल्हा क्रिडा अधिकारी नामे नंदा गजानन खुरपुडे , व आरोपी नं २ परिचर नामे शेख फईम शेख अल्लाउद्दीन यांना बीडचे पोलीस अधिक्षक हनपुडे पाटील व लाचलुचपत च्या टीमने सापळा रचून आरोपी नं २ यांस ८००००/- रूपये रक्कमेची लाच स्वीकारतांना काल दि ३ मार्च रोजी पकडण्यात आले. लाचेची रक्कम ८००००/- रूपये मिळून आली.

जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहितास सर्वोच्च प्राधान्य द्यावे-पोलीस आयुक्त डाँ.रविंद्रकुमार सिंगल, शहीद पोलीस शिपाई फिरोज पठाण यांना स्मरणांजली अर्पण , महाराष्ट्रातील पहील्याच मार्गदर्शक उपक्रमाचे आयोजन

इमेज
नासिक(3)::-जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे असे आवाहन शहीद पोलीस शिपाई फिरोज अफजलखान पठाण यांच्या स्मरणांजली कार्यक्रमा प्रसंगी नासिक पोलीस आयुक्त डाँ रविंद्रकुमार सिंगल यांनी केले.        शहीद पोलीस शिपाई पठाण यांच्या स्मरणांजली कार्यक्रमाचे आयोजन के.टी.एच.एम.महाविद्यालयाच्या व्हि.एल.सी.सभाग्रुहात करण्यात आले होते.       प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन तसेच शहीद पठाण यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रतिमेसमोर पुष्पचक्र अर्पण करतेवेळी अफजलखान पठाण (शहीद फिरोज यांचे  वडील) यांना त्यांच्या भावना अनावर झाल्याने शहीद मुलाच्या आठवणीने अश्रुंना वाट करू द्यावी लागली त्यावेळी सभाग्रुहातील वातावरण भावनिक झाले होते.           पोलीस खात्यात अधिकारी व कर्मचारी हे जनतेच्या सेवेसाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र सेवा बजावत असतात, वेळप्रसंगी कायद्याची अंमलबदावणी करतांना कधीकधी कठोर कारवाई करावी लागते, जनता व पोलीस समोरासमोर येतात तेव्हा पोलीसही आपल्यासारखेच आहेत ही जाणीव जनतेनेही ठेवायला हवी, मात्र अशा प्रसंगी काही अघटीत घडते अशा वेळी प्रत्येका

रूग्णालयातील लो हायजीनमुळे होणाऱ्या गंभीर संसार्गावर तोडगा ! , प्रगत आयव्ही कंटेनर मानवता कँन्सर सेंटरमध्ये उपलब्ध, डाँ.राज नगरकर, कँन्सरतज्ञ

इमेज
प्रगत आयव्ही कंटेनर मानवता कॅन्सर सेंटरमध्ये उपलब्ध रुग्णालयातील लो हायजीनमुळे होणाऱ्या गंभीर संसार्गांवर तोडगा नाशिक, २ एप्रिल २०१८::- रुग्णालयात विशेषतः क्रिटीकल युनिट्समध्ये कमी दर्जेच्या वैद्यकीय उपकरणांचा वापर आणि रुग्णालयातील अस्वच्छता यामुळे रोगाशी आधीच झुंजणाऱ्या रुग्णांना विविध संसर्ग होण्याची दाट शक्यता असते ज्याने त्यांच्या आधीच कमकुवत झालेल्या प्रकृतीला अधिक धोका संभवतो.  रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे आणि लो हायजीनमुळे संसर्ग झाल्याचे आपल्याला काही नवीन नाही. बॅ्क्टेरिया, फंगस ह्याने कित्येक रुग्ण हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शनला बळी पडतात. यात रक्तप्रवाहाचा संसर्ग, न्यूमोनिया, मूत्रमार्गात संसर्ग (यूटीआय), सर्जिकल साईट इन्फेक्शन (शस्त्रक्रियेतून उद्भवलेले संक्रमण) याचा समावेश आहे. वेळेत निदान न झाल्यास हे प्रकृतीस आणखी गंभीर ठरू शकतात असे मत एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिकचे अध्यक्ष आणि सर्जिकल ओन्कोलॉजिस्ट डॉ. राज व्ही. नगरकर यांनी केले. मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जाणाऱ्या रुग्णांना अशा संसार्गांचा धोका अधिक संभावतो असेही ते म्हणाले.