जिल्हा क्रिडा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ! दोन लाख रूपयांची मागणी, ऐंशी हजार स्वीकारतांना सापडले !


बीड येथील जिल्हा क्रिडा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात !
सात व्यक्तींचे व्यायामशाळेच्या बांधकामाचे पहिल्या हप्त्याचे प्रत्येकी तीन लाख प्रमाणे अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी दोन लाख रूपयांची मागणी ७ फेब्रुवारी १८ ला फिर्यादी शेतकरी वय ५५ यांच्याकडे करण्यात आली होती.  यांत आरोपी नं १ जिल्हा क्रिडा अधिकारी नामे नंदा गजानन खुरपुडे , व आरोपी नं २ परिचर नामे शेख फईम शेख अल्लाउद्दीन यांना बीडचे पोलीस अधिक्षक हनपुडे पाटील व लाचलुचपत च्या टीमने सापळा रचून आरोपी नं २ यांस ८००००/- रूपये रक्कमेची लाच स्वीकारतांना काल दि ३ मार्च रोजी पकडण्यात आले. लाचेची रक्कम ८००००/- रूपये मिळून आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण