आदीवासी विकास महामंडळाच्या कारभाराविरोधात ६ एप्रिल पासुन आमरण उपोषण !

नासिक::-आदिवासी विकास महामंडळाचा कारभार  गेल्या दोन वर्षा पासून अतिशय धिम्या गतीने चालू असून संचालक मंडळाच्या सुचना व ठरावांची अंमलबजावणी होत नाही या विभागातले अधिकारी कोणाला जुमानत नसल्या मुळे आदिवासी योजना ठप्प होत आहेत. शासनाकडून आलेला निधी योजनावर खर्च होत नाही तो शासनास परत जात आहे.
महामंडळाची पंप व पाईप योजनेचा खर्चीत निधी 43 कोटी खर्च न करता शासनाला परत केल्याप्रकरणी संचालक मंडळाला अंधारात ठेवले गेले.खावटी कर्ज वाटप योजनेचे 70 कोटी रूपये परत केल्या प्रकरणी दोशींवर कारवाई व्हावी.या करता व अशा अनेक मागण्यांकरता आदिवासी विकास भवनासमोर उपोषण करण्यात येणार असल्याची माहीती पत्रकार परिषदेत देण्यात आली या वेळी आदीवासी विकास महामंडळाचे भरतसिंग दुधनाग, धनराज महाले,मिनाक्षीताई वट्टी,अशोक मंगाम, मधुकर काठे,विठ्ठल देशमुख,केवलराम काळे,देविदास पाटिल, भगवानदादा वळवी, आदी उपस्तीत होते.
सौजन्य नासिक लोकल, नासिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)