सविता दामोदर परांजपे ३१ आँगस्टला आपल्या भेटीस येत आहे ! वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवते आहे त्रुप्ती तोरडमल, दीनानाथ यांजकडून खास न्यूज मसालाच्या वाचक-दर्शकांसाठी !!!!
दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ] मधुकर तोरडमलांचा वारसा जपणार तृप्ती ‘सविता दामोदर परांजपे’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार मुलांनीही आपला वारसा चालवावा असं सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही वाटत असतं. आपल्या आई-वडीलांचा वारसा चालवत जेव्हा मुलं त्यांचं नाव मोठं करतात, तेव्हा आई-वडीलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल हे मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील खूप मोठं नाव. त्यांची मुलगी तृप्ती तोरडमल आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री बनली आहे. ‘ सविता दामोदर परांजपे ’ या सिनेमाद्वारे तृ्प्ती अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जे. ए. एन्टरटेन्मेंट आणि पॅनोरमा स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या ‘ सविता दामोदर परांजपे ’ या सिनेमाची निर्मिती जॅान अब्राहम करत आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाद्वारे जॅानची पावलं मराठीकडे वळण्यासाठीही तृप्तीच कारणीभूत आहे. तृप्तीला मराठी सिनेमाची निर्मिती करायची होती. स्वप्ना वाघमारे यांची जशी ती मैत्रीण आहे, तशीच जॅानचीही आहे. जॅानसोबत तृप्तीचे घरगुती ऋणान