जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यकाची एक वर्ष वेतनवाढ रोखण्याचे आदेश ! पंचायत समितीतील सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही कणेबाबत नोटीस बजावली !! प्रामाणिक कर्मचाऱ्यांकडून जिल्हा परिषदेतील इतर प्रलंबित प्रकरणांचा निपटाराही लवकर व्हावा अशी अपेक्षा !!! सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

नासिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ.नरेश गिते यांनी प्रशासनातील एकएक नमुने शोधून त्यांचेवर करीत असलेल्या कार्यवाहीने काहींच्या मनात भीती तर काहींच्या मनात स्वागत होत अाहे, सर्वच विभागातील अनेक प्रकरणांचा निपटारा व्हायला हवा असा सूर ही व्यक्त होत आहे. न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणांना आता चालना मिळेल अशी आशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांकडून चर्चिली जात आहे !!
         नाशिक (१७)::- त्रंबकेश्वर पंचायत समिती अंतर्गत विविध प्रकरणात दोषी आढळलेल्या तीन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या खातेचौकशी प्रकरणात सादरकर्ता अधिकारी म्हणून जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यानी अपूर्ण अहवाल सादर केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी पंचायत समितीमधील दोघा कर्मचाऱ्याना नोटीस बजावली असून शिस्तभंगाची कार्यवाही  करण्याचा इशारा दिला आहे.
        त्रंबकेश्वर पंचायत समितीमधील परिचर बळवंत ढाकणे हे ऑक्टोबर २०१३ पासून तर ठाणापाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचर निवृत्ती गबाडे हे २०१० पासून अनधिकृत गैरहजर आहेत. तसेच तोरंगण प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचर सुरेश महाले यांच्यावर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात सर्व सविस्तर दस्तऐवज खातेचौकशीसाठी सादर करणे आवश्यक असताना अतिशय मोघम व त्रोटक माहिती सादर करण्यात आली आहे. याबाबत सादरकर्ता अधिकारी म्हणून जबाबदारी असलेले त्रंबकेश्वर पंचायत समितीमधील सहायक प्रशासन अधिकारी राजेंद्र शिंदे व कनिष्ठ प्रशासन अधिकारी विजय संधान यांचेवर त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ चे नियम ३ चा भंग केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कार्यवाही करणेबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
📌📌📌📌📌📌📌
        खातेचौकशीबाबत जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान अंतर्गत पुणे  येथील यशदा संस्थेच्या वतीनेदेखील सर्व अधिकारी व कर्मचार्याना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तरीदेखील अपूर्ण प्रकरण सादर करण्यात येत असल्यामुळे विभागीय चौकशीत सबळ दस्तऐवज नसल्याने संबधित कर्मचारी निर्दोष सुटतात. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधीतावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
📌📌📌📌📌📌📌
            नाशिक - जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व अधिकाऱ्यांना आढावा घेण्यासाठीची माहिती देताना हलगर्जीपणा केल्यामुळे लघु पाटबंधारे (पूर्व) विभागातील कनिष्ठ सहायकाची एका वर्षासाठी वेतनवाढ बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.
       जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची मासिक सभा घेण्यात येते. या बैठकीसाठी संबंधित सर्व विभागांची माहिती संकलित करून विषयानुसार पृष्ठांकन करून जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व अधिकाऱ्यांना आढावा घेण्यासाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे (पूर्व) विभागाची आहे. सदरचे काम या विभागातील कनिष्ठ सहायकाची शैलेन्द्र जाधव यांचेकडे आहे. यापूर्वीही त्यांना परिपूर्ण माहिती तयार करून बैठकीसाठी सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र तरीदेखील १२ जुलै रोजी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यासाठीची माहिती विस्कळीत स्वरुपात दिल्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच आढावा घेतानाही अडचणी आल्या. याबाबत संबधित कनिष्ठ सहायकास जबाबदार धरून त्याची एक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने बंद करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डो गिते यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!