भर पावसात छावा क्रांतीवीर सेनेचा बदनापुरांत पायताण मोर्चा ! दोन महीन्यात रस्ते दुरूस्त न झाल्यास आमदार खासदार यांना तालुका बंदी - करन गायकर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

         बदनापूर( दि.१६)::- तालुक्यातील गावा-गावांना जोडणारे रस्ते अतिशय खराब झालेले असून या रस्त्यावरून साधे चालणेही दुरापास्त झालेले असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल होत असल्याने बदनापूर येथे भर पावसात छावा क्रांतीवीर सेनेकडून मोर्चा काढण्यात आला.
          दोन महिन्यात रस्ते दुरुस्त झाले नाही तर आमदार व खासदारांना तालुक्यात फिरकू देणार नसल्याचा इशारा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे.
         बदनापुर ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दूरवस्था झालेली असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला अतिशय त्रास सहन करावा लागत असल्यामुळे हे रस्ते लवकरात लवकर तयार करावेत तसेच  रोषनगाव येथील काही शेतकऱ्यांना महापारेषणकडून तयार होत असलेल्या विद्युत टॉवरचा मोबदला मिळालेला नसताना शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे या  शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत हे  गुन्हे मागे घ्यावे या प्रमुख मागणीसाठी बदनापूर ते तहसिल कार्यालयापर्यंत  जवळपास ३ किलोमीटर  मोर्चा निघाला, बदनापूर परिसरात आज सकाळपासून पाऊस सुरू होता या पावसातही मोठया संख्येने ठिकठिकाणच्या गावाच्या तरुणांनी सहभाग नोंदवला.  या मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष करन गायकर व प्रदेश संघटक पंकज जऱ्हाड यांनी केले. यावेळी तहसील कार्यालयासमोर छावा सेनेच्या वतीने ग्रामीण भागातील रस्ते दोन महिन्यात दुरुस्त झाले नाही तर बदनापूर तालुक्यात कोठेही खासदार - आमदार  यांना तालुक्यात फिरकु देणार नसल्याचा इशारा देण्यात आला असून छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने या कामांसाठी शासनाला २ महिन्याचा अवधी देण्यात आला आहे, अन्यथा राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात जनआंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. भर पावसात मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने खासदार व आमदारांवर ग्रामीण भागातील रोष असल्याचे यावेळी चर्चिले जात होते. या मोर्चात प्रदेश महासचिव  शिवाजी मोरे, उमेश शिंदे प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी सेना, नवनाथ शिंदे युवा प्रदेश सरचिटणीस,विजय खर्जुल नाशिक जिल्हा अध्यक्ष,राहुल डोरकुले,  विष्णु मुळे, संदिप दाभाडे, सोपान कोळकर, राहुल कोल्हे,  मुफीद खान, अनिल कोल्हे,  बालासाहेब काळे, अर्जुन पठाडे, निवृत्ती गाढेकर, कृष्णा गाडेकर, समाधान दराडे, दादा जगताप, दादा ताडगे, कैलास दाभाडे,  किशोर मदनृ अमोल मदन,  किरण चौधरी, बळीराम ताडगे, शिवनाथ कोल्हे, स्वप्निल वाघ, अक्षय भोसले, शिवा काळे, शिवा दाभाडे, आप्पासाहेब गव्हाणे, गजानन गव्हाणे,विजय शिंदे, विजय शिरसाठ, गजानन सुरुशे, शरद खेंडके, किरन जोशी, अरुन उजेड, अजिंक्य जऱ्हाड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!