१९६७ मधील रंगमंचावर अवतरलेले वाजे पाऊल आपुले आणी तीन दशकापूर्वी टिळक आणी आगरकर ही एक विचारधारा रसिंकांसाठी येत आहे !!! मुंबई मराठी साहीत्य संघ नाट्यनिर्मितीत पुन्हा सक्रीय !!! सविस्तरतेसाठी खालील लिंक वर क्लिक करा, कमेंट बाँक्स मध्ये नांव व मोबा.नंबरसहीत कमेंट करा !!!
नाटककार विश्राम बेडेकर लिखित ‘वाजे पाऊल आपुले’आणि ‘टिळक आणि आगरकर’रसिकांसाठी पुन्हा नव्याने रंगमंचावर! जयंत सावरकर आणि कौस्तुभ सावरकर पितापुत्रांचे दिग्दर्शन! टिळक आणि आगरकर नाटकाचे अभिवाचनाचे प्रयोग रंगणार! मुंबई मराठी साहित्य संघाची नाट्यशाखा पुन्हा निर्मितीत सक्रीय! संघाच्या गाजलेल्या कलाकृती होणार पुन:रुज्जीवीत! साहित्य संघ मंदिर डॉ. भालेराव नाट्यगृहात सर्वात कमी दरात त्यांची नाटके पहायला मिळणार! १९६७ मध्ये रंगमंचावर सादर झालेले प्रख्यात साहित्यिक विश्राम बेडेकर लिखित आणि दिग्दर्शित, दाजी भाटवडेकर, अरविंद देशपांडे, सतीश दुभाषी, दामू केंकरे, जयंत सावरकर व मंगला संझगिरी यांच्या अभिनयाने पावन झालेल्या ‘वाजे पाऊल आपुले’ तसेच लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर आधारलेलं ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकांच्या पुनरुज्जीवन होत असल्याचे संस्थेचे प्रमुख कार्यवाह डॉ. बाळ भालेराव, नाट्यशाखा कार्यवाह प्रमोद पवार, व उपाध्यक्ष जयंत सावरकर यांनी जाहीर केले. या संस्थेच्या इतर दर्जेदार –लोकप्रिय नाटकांची लवकरच पुनर्न