संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी रविवारी ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालणार, या भव्य सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन संस्थान कडून करण्यात आले आहे-अध्यक्ष हभप संजय धोंडगे, सविस्तर माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा रविवारी " ब्रम्हगिरी प्रदक्षिणा सोहळा "

- वारकरी संप्रदायमध्ये ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला अनन्य साधारण महत्व आहे. भगवान शिवशंकर यांचा ब्रम्हगिरी पर्वतावर पदस्पर्श झाल्याची धार्मिक आख्यायिका आहे. संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताई यांच्या रूपाने येथून ज्ञानगंगेचा उगम झाला. या अवतारी भावंडांंनी ही ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा केली असून त्यास अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे, म्हणून समस्त वारकरी ही प्रदक्षिणा करीत असतात.
           संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून पालखी खांद्यावर घेऊन वारकरी मंडळी अाश्विन महिन्यातील एकादशीला ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा मारतात. हजारोंच्या संख्येने वारकरी  पालखी समवेत भजन करीत ब्राम्हगिरीची प्रदिक्षणा पूर्ण करून गाठीशी पुण्य गाठतात.
यंदाही संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या नेतृत्वाखाली व श्री निवृत्तीनाथ महाराज वारकरी भजनी मंडळ, त्र्यंबकेश्वर, यांच्या पुढाकाराने संत निवृत्तीनाथ महाराज यांची अाश्विन एकादशी दि. ४ नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी ७ वाजता  पादुका ठेवलेली पालखी समाधी मंदिरापासून  ब्राम्हगिरीची प्रदक्षणा करण्यासाठी निघणार आहे. या गोमट्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तथा प्रदक्षिणा पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारो वारकरी आदल्या दिवशी रात्री श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मुक्कामी येणार आहेत. सकाळी ७ वाजता हजारो वारकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये हा पालखी सोहळा ब्रम्हगिरीची प्रदक्षणा करण्यासाठी मार्गस्थ होणार आहे.
निवृत्तीनाथ दादांच्या या ब्राम्हगिरी प्रदक्षिणा सोहळ्यात निवृत्तीनाथ भक्त, वारकरी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्ट अध्यक्ष हभप संजय नाना धोंडगे, त्र्यंबक  गायकवाड, पुंडलिक थेटे, पवन भुतडा, पंडित महाराज कोल्हे, जयंत महाराज गोसावी, संदीप गोसावी, अविनाश गोसावी, ललिता शिंदे, डाँ. धनश्री हरदास, जिजाबाई लांडे, बेलापूरकर महाराज आदींसह आयोजकांनी केले आहे.
प्रदिक्षणा सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात शिक्षकांना पदस्थापना ! शून्य शिक्षक शाळांना मिळाले २० शिक्षक !!