न्यूज मसाला परिवारातर्फे रूग्णांच्या नातेवाईकांना दिवाळी फराळ व सुरूची भोजन वाटप ! कै. भालचंद्र (आप्पा) गोपाळ पवार (मालेगांव) यांच्या चौथ्या पुणस्मरणानिमित्त, !! उपक्रमाच्या सविस्तर माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व कमेंट बाँक्समध्ये आपले नांव व मोबा. नंबर लिहा !!!

नासिक::- कै. भालचंद्र (आप्पा) गोपाळराव पवार , मालेगांव, यांच्या चौथ्या पुण्यस्मरणा निमित्त ६ नोव्हेंबर रोजी संदर्भ सेवा रूग्णालय, नासिक येथे दिवाळी फराळ वाटपाचे आयोजन न्यूज मसाला परिवाराकडून करण्यात आले.
        ज्यांची दिवाळी दवाखाण्यात उपचार घेण्यांत जात असेल व सोबत त्यांचे नातेवाईक असतील तर ? हा प्रश्न व त्याचे उत्तर खूप अवघड आहे, ते पूर्णपणे समाधानकारक कुणालाही देता येणार नाही मात्र प्रयत्न करायला सुरूवात तर करूया याप्रमाणे न्यूज मसाला परिवाराकडून असे उपक्रम राबविले जातात.
       कै. आप्पांच्या पुण्यस्मरणानिमित्त, आप्तेष्टांना दवाखाण्यात उपचार घेतेवेळी स्वत:ची दिवाळी साजरी न करणाऱ्यांच्या मुखी दिवाळी फराळ तरी जायला हवा, याउद्देशाने संदर्भ सेवा रूग्णालयातील रूग्णाच्या नातेवाईकांना (100+50)  दिवाळी फराळ+बिस्किट+केळी व ५० व्यक्तींना सुरूची भोजन देण्यात आले, याप्रसंगी कै. आप्पांचे नातू इंजि. प्रणित पवार, तेजस पाटील, जिग्नेश पाटील व न्यूज मसाला संपादक नरेंद्र पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
      सदर उपक्रमास अन्नछत्रच्या संचालिका सौ. संगिताजी केडीया यांचे मार्गदर्शन मिळाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !