पोस्ट्स

जीएम पोर्टल शासकीय इ बाजारपेठ प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
     नाशिक::- महानगरपालिकेच्या वतीने महापालिकेतील कर्मचारी व अधिकारी यांचे साठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निर्देशानुसार जीएम पोर्टल शासकीय इ बाजारपेठ प्रणाली चे प्रशिक्षणाच्या बाबतीत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधनी संस्थेचे सहाय्यक संचालक बाबासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले. नाशिक महानगरपालिका मनपा, मुख्य मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील रेकॉर्ड हॉल येथे मनपा कर्मचाऱ्यांना  केंद्र शासनाने खरेदी प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता यावी यासाठी जीएम पोर्टल विकसित केले आहे.वस्तू व सेवा सुविधा  खरेदी / निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी या प्रणालीचा वापर शासन निर्देश प्रमाणे अनिवार्य असल्याने या  संबंधी  प्रशिक्षण आयोजित केले होते.  याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी संस्था संस्थेचे सहाय्यक संचालक, महसूल विभागाचे बाबासाहेब शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या विषयातील अनेक मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्

कार्यारंभ आदेश आता जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर येणार ! ठेकेदार व पुरवठादारांनी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांकडे जाऊ वा भेटू नये, अडचण असेल तर अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदवावी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
            नाशिक –  जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणारे कामाचे आदेश आता जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार असून  याबाबतचे आदेश डॉ. नरेश गिते यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.        जिल्हा परिषदेच्या बांधकाम, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत विविध कामे करण्यात येतात. या विविध कामांचे कार्यारंभ आदेश पुरवठाधारकाबरोबरच सर्वसामान्य जनतेला उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्व आदेश प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सन २०१७-१८ तसेच २०१८-१९ मधील सर्व कार्यारंभ आदेश टाकण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर कार्यारंभ आदेश नावाने टॅब तयार करण्यात आला असून त्यावर भेट दिल्यास सर्व विभागांमधील कार्यारंभ आदेश पाहता येणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व पुरवठाधारकांना इ मेल व व्हॉटसअँपव्दारे कार्यारंभ आदेश देण्यात येणार असून यासाठी पुरवठाधारकांनी जिल्हा परिषदेशी संपर्क साधून संबंधित विभागांमध्ये  आपली माहिती कळवावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे. ------

योग आणी भोग जीवनरूपी नाण्याच्या दोन बाजू आहेत ! दुर्गुणांना खड्यासारखे दूर करून जीवनशुद्धी शक्य-कंठभूषण संतोषगीरी महाराज !! विष्णूदास चारूदत्त यांच्या दत्तशुद्दीका चे प्रकाशन !!

इमेज
"कलियुगातील निरस जीवनाला दिशा देणारी दत्तशुध्दिका प्रकाशीत" दुर्गुणांना खड्यासारखे दूर करून जीवनशुध्दी शक्यः कंठभुषण संतोषगीरी महाराज         नाशिक/प्रतिनिधी::-योग आणि भोग जीवन रूपी नाण्याच्या दोन बाजू आहेत,त्या परस्परांशी एकरूप होऊ शकत नाहीत ,एकाचा दुसऱ्यावर प्रभाव पडतो तेंव्हा एक बाजू कमकुवत होते. आणि ज्या बाजूचा प्रभाव अधिक तसे मनुष्याचे जीवन घडते. हे वास्तव ज्ञान संदेश देणारी दत्त शुध्दिका कलियुगात  निरस बनलेला जीवनसार खमंग बनविण्यास  नक्कीच मार्गदर्शक ठरेल अशा शब्दात संतश्रेष्ठ मौनगीरी जनार्दन स्वामी-प.पू. माधवगीरी महाराज यांचे अनुयायी  कंठभुषण ह.भ.प. संतोषगीरी महाराज यांनी विष्णूदास चारूदत्त थोरात यांच्या हस्तलिखीत पुस्तिकेचे प्रकाशनाचे कौतूक केले. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून गुढ लिखाण करणारा चारूदत्तच्या हातून काही अदभूत साहित्य प्रसवले जात असल्याची जाणीव दि.१५ जुन २०१४ रोजी प्रथम मातापित्यांना झाली. त्या क्षणापासून आजवर शेकडो पुस्तके प्रकाशित होऊ शकतील एव्हढे हस्तलिखीत निर्माण झाले असून मकर संक्रांतीच्या पुर्वसंध्येला भोगीच्या मुहुर्तावर दत्तशुध्दिका नामक पुस्तिकेचे

दोषी पोलिस अधिका-यांना तत्काळ निलंबित करा !!! सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा .....      नाशिक : दोन दिवसांपूर्वी भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान युवक कॉंग्रेसच्या व कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलीस अधिकाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली असून भाजप सरकार पोलिसांच्या अडून  दडपशाही पद्धतीने आंदोलकांचा आवाज दडपण्याच्या प्रयत्न करत मारहाण करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी नाशिक शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.         सरकारच्याचुकीच्या धोरणांमुळे शेतकरी, व्यापारी, कामगार, उद्योगपती, मजूर , छोटे-मोठे व्यावसायिक, देशातील अनेक घटक अडचणीत असून पंतप्रधान दडपशाही भूमिकेमुळे आज सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आलेल्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आवाज दडपण्यासाठी भाजपचे सरकार पोलिसांना अंगावर सोडत असून सोलापूरला आणीबाणी सदृष्य परिस्थिती निर्माण केली गेली.               सीबीआय संचालकांच्या मध्यरात्री केलेली उचलबांगडी, कोणाशीही सल्ला मसलत न करता जाहीर केलेली नोटाबंदीचा निर्णय असो अथवा राफेलच्या बदलल

निलंबित ग्रामसेवक "वजनदार" संबंध वापरून झालेली बदली रद्द करण्यासाठी प्रयत्नशील ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
निलंबित झालेला तळेगांव दिंडोरी चा ग्रामसेवक "दक्षिणा" देऊन पुन्हा त्याच जागेवर येण्यास प्रयत्नशील ? नाशिक - दिंडोरी तालुक्यातील तळेगांव दिंडोरी येथे मुख्यकार्यकारी डाँ नरेश गिते यांनी भेट दिली तेव्हा संबधित ग्रामसेवकाने कपाटाची चावी कर्मचाऱ्याकडे असल्याचे कारण देउन दोन दिवसांची वेळ मिळविण्यात यश मिळविले होते, मात्र मुदत संपूनही एक महिण्याच्या आसपासचा कालावधी निघून गेला तरीही ग्रामपंचायतीचे दप्तर जिल्हा परिषद ला घेऊन येण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबधित ग्रामसेवकास ५ जानेवारी रोजी निलंबित करण्यात आले होते व त्याची अन्यत्र बदली केली होती. मात्र संबधित ग्रामसेवकाने "राजकीय वशिला" व "अर्थपूर्ण व्यवहार" करण्याच्या प्रयत्नांनी निलंबन मागे घेऊन पुन्हा त्याच गावांत येण्यास जोरदार "फिल्डिंग" लावल्याची चर्चा आहे.आणि असे झालेच तर कर्तव्यदक्ष व कडक शिस्तीचे मुख्यकार्यकारी अधिकारी हे नेमके राजकीय दबावाला की अर्थपूर्ण व्यवहाराचे बळी ठरतील असा प्रश्न निर्माण होत आहे, तरीही  मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या निर्णयावर ठाम राहतील !  असेही बोलले जात आहे.          संबधित

रासपच्या विदर्भ कार्यकर्ता मेळाव्याला लक्षणीय उपस्थिती ! विरोधकांना दखल घेण्यास भाग पाडणारा यशस्वी मेळावा-आयोजक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नागपूर::-राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित विदर्भ कार्यकर्ता मेळावा नागपूर येथे मोठया थाटात संपन्न झाला या कार्यक्रमाला  विदर्भातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, भाजपा नेते आमदार नरेंद्र पवार जिल्हा महामंत्री राजुभाऊ पा.तकर, रासप युवक आघडी अध्यक्ष राजे भाऊ फड, मुख्य महासचिव रासप बाळासाहेब दौडतले व रासपचे सर्व नेते मंडळी यांची ही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. मेळाव्यात पक्षाची पुढील वाटचाल याबाबत विचारमंथन करण्यात आले,  येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मेळाव्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरणासोबत विरोधकांनी दखल घेण्यास भाग पडावे असा हा मेळावा ठरल्याची चर्चा विदर्भ मराठवाड्यासहीत महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात होत आहे,  या कार्यकर्ता मेळाव्या मध्ये शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अनेक गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी  प्रा.सौ. माधुरी ताई पालीवाल व यु

१६ व १७ जानेवारीला निर्धार परीवर्तनाचा यात्रा जिल्ह्यात येत असुन यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक दि. ११ (प्रतिनिधी):-  येत्या १६ व १७ जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्यात येणारी राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रा यशस्वी करा असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.        नाशिक जिल्ह्यात दि. १६ व १७ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रेच्या पूर्वतयारीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक राष्ट्रवादी भवन नाशिक येथे घेण्यात आली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ बोलत होते.         शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न व समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील जनतेपर्यंत ‘निर्धार परिवर्तनाचा’ हे ब्रीद वाक्य घेऊन परिवर्तन यात्रा काढत आहे. येत्या दि.१६ जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्यात सिन्नर, घोटी, ता.इगतपुरी व नाशिक शहरात तर दि. १७ जानेवारी रोजी दिंडोरी, सायखेडा, ता.निफाड व मनमाड, ता. नांदगाव येथे होणाऱ्या यात्रेत प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री आ.छगन भुजबळ, आ.अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा.सुप्रिया सुळे, आ.दिलीप वळसे पाटील, आ.सुनिल तटकरे, आ.जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. या बैठकीत नाशिक ज

विहित कालमर्यादेत कामे पूर्ण न झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे नियोजन ! वाँटरकप स्पर्धेत सर्व गावांनी सहभाग घ्यावा - नामदेव नन्नावरे!! डासमुक्तीसाठी अभियान राबविण्याचा डाँ.नरेश गिते यांचा मानस !!! गोवर रूबेला लसीकरण मोहीमेत राज्यात पहिल्या पाच मध्ये जिल्ह्याची वर्णी, ९४ टक्के लसीकरण पूर्ण !!!! सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
विहित कालमर्यादेत काम पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा ! नाशिक – जिल्हा नियोजन विकास आराखडयाच्या बैठकीनंतर निधी अखर्चित मु्द्यावरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. नरेश गिते यांनी रुद्रावतार धारण करत बांधकाम, लघु पाटबंधारे विभाग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांकडे आपला मोर्चा वळवला आहे. या विभागांकडून प्रत्येक कामाची तारखेनिहाय माहिती घेण्यात येत असून काम विहित कालमर्यादेत पुर्ण न झाल्यास व निधी खर्च न झाल्यास पाचही विभागातील सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन कार्यवाही करण्याचा इशारा डॉ. गिते यांनी दिला आहे.       विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत अखर्चित निधीवरुन चर्चा झाली होती तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम व लघु पाटबंधारे विभागाच्या कामकामाजाबाबत चर्चा होवून कामांच्या दिरंगाईस कारणीभूत असणा-यांवर कारवाई करण्याच्या सुचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या होत्या. त्यानुसार डॉ. नरेश गिते यांनी या पाचही विभागांच्या कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून कामांच्या मंजुर दिनांकापासून ते ई टेंडर, कार्यारंभ आदेशपर्यतच्या प्रवासाची तारखेनिहाय माहिती घेण्यात