विहित कालमर्यादेत कामे पूर्ण न झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे नियोजन ! वाँटरकप स्पर्धेत सर्व गावांनी सहभाग घ्यावा - नामदेव नन्नावरे!! डासमुक्तीसाठी अभियान राबविण्याचा डाँ.नरेश गिते यांचा मानस !!! गोवर रूबेला लसीकरण मोहीमेत राज्यात पहिल्या पाच मध्ये जिल्ह्याची वर्णी, ९४ टक्के लसीकरण पूर्ण !!!! सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

विहित कालमर्यादेत काम पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा !

नाशिक – जिल्हा नियोजन विकास आराखडयाच्या बैठकीनंतर निधी अखर्चित मु्द्यावरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. नरेश गिते यांनी रुद्रावतार धारण करत बांधकाम, लघु पाटबंधारे विभाग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांकडे आपला मोर्चा वळवला आहे. या विभागांकडून प्रत्येक कामाची तारखेनिहाय माहिती घेण्यात येत असून काम विहित कालमर्यादेत पुर्ण न झाल्यास व निधी खर्च न झाल्यास पाचही विभागातील सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन कार्यवाही करण्याचा इशारा डॉ. गिते यांनी दिला आहे.

      विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत अखर्चित निधीवरुन चर्चा झाली होती तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम व लघु पाटबंधारे विभागाच्या कामकामाजाबाबत चर्चा होवून कामांच्या दिरंगाईस कारणीभूत असणा-यांवर कारवाई करण्याच्या सुचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या होत्या. त्यानुसार डॉ. नरेश गिते यांनी या पाचही विभागांच्या कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून कामांच्या मंजुर दिनांकापासून ते ई टेंडर, कार्यारंभ आदेशपर्यतच्या प्रवासाची तारखेनिहाय माहिती घेण्यात येत आहे. कामास दिरंगाई कोठे झाली, कोणामुळे झाली याबाबत माहिती घेवून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

इ निविदेची कामे तसचे कार्यारंभ आदेश याबाबत मागील महिन्यात विभागांची चांगलीच झाडाझडती घेत ई टेंडर कर्मचा-यांकडील कामांची तपासणी केली होती तसेच या विभागांना सर्व मंजुर कामांचे ई टेंडर प्रकिया करणेबाबत अल्टिमेटम दिला होता. मात्र अतिशय संथगतीने काम होत असल्याने व इ निविदा प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी या विभागांना भेटी देवून कामकाजाची तपासणी केली होती. त्यातुन अनेक गंभीर बाबी समोर आल्या होत्या. विभागामार्फत काम मंजुर असतानाही ई निविदा न करणे, विलंबाने ई टेंडर उघडणे, आदेश देताना विलंब करणे अशा विविध बाबी निर्दशनास आल्याने डॉ. गिते यांनी दोन विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावली होती तर बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठयामधील दोघा कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई केली होती.

      दरम्यान जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागामार्फत ई निविदेच्या कामात अनियमितता केल्यास किंवा ई निविदा करणे बाकी ठेवल्यास, विलंबाने निविदा प्रसिध्द केल्यास सर्व संबंधितांवर कारवाई करण्याचे तसेच प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे नियोजन असल्याचेही डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.

वाँटरकप स्पर्धेत सर्व गावांनी सहभाग घ्यावा-नामदेव नन्नावरे

नाशिक :  ग्रामपंचायत, ग्रामसेवक व विस्तार अधिकारी हे जिल्हा परिषदेचा मुख्य कणा असून गावाच्या परिवर्तनासाठी यांचा सहभाग महत्वाचा आहे.  नाशिक जिल्हयातील चांदवड व सिन्नर तालुकयातील गाव पाणीदार बनविण्यासाठी  या तालुकयांमधील सर्व गावांनी वॉटरकप स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन पाणी फाऊंडेशनचे महाराष्ट्राचे प्रमुख तथा सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात आज विस्तार अधिका-यांच्या आढावा बैठकीत नामदेव ननावरे पाणी फाऊंडेशनबाबत मार्गदर्शन करत या उपक्रमाची माहिती दिली. पाणी फाऊंडेशनने राज्यातील ७६ तालुक्यांची निवड केली असून त्यामध्ये नाशिक जिल्हयातील सिन्नर व चांदवड तालुकयांचा समावेश आहे. वॉटरकप स्पर्धेच्या पहिल्या टप्यात  दोन्ही तालुक्यात ग्रामस्थांनी केलेले काम दिशादर्शक असल्याचे सांगत पुढील टप्प्यासाठी नियोजन करुन सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुल्यांकनासाठी देण्यात येणा-या गुणांबाबत माहिती देवून स्पर्धेपूर्वी मिळणा-या ३० गुणांसाठी नॅडेप, गांडुळखत निर्मिती, शोषखडडे, माती परिक्षण, वृक्ष लागवड, पाण्याचे अंदाजपत्रक यावर काम करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

यावेळी बोलताना ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी पाण्यासाठीचे काम हे अतिशय पुण्याचे काम असून सर्वांनी यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. बैठकीस महाराष्ट ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सहा. गटविकास अधिकारी समिर वाठारकर, दिलीप थेटे यांच्यासह विस्तार अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी आदि उपस्थित होते.

डासमुक्तीसाठी अभियान राबविण्याचा डाँ नरेश गिते यांचा मानस !

          पाणी फाऊंडेशनचे काम जिल्हयातील दोन तालुक्यात असले तरी नाशिक जिल्हयात डासमुक्तीसाठी शोषखडडे तयार करुन डासमुक्त अभियान राबविणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले. सांडपाण्यासाठी वैयक्तिक तसेच सार्वजनिक शोषखडडे तयार करण्यात येणार असून यामुळे जल पातळी वाढणार असून व डासांची उत्पत्ती रोखता येणार आहे. जिल्हयात सर्व ग्रामपंचायतींमध्ये सदरचे अभियान राबविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

गोवर रूबेला लसीकरण मोहीमेत ९४ टक्के काम पूर्ण !
नाशिक - गोवर रूबेला लसीकरण मोहीमेत नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण भागाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून लसीकरणात नाशिक विभागात जिल्हा पहिल्या क्रमांकावर तर राज्यात पहिल्या पाचमध्ये आहे. जिल्हयात आतापर्यत १० लक्ष ७४ हजार ३९८ मुलामुलींचे लसीकरण पुर्ण झाले आहे. शहरी भागात जिल्हा रुगणालयाचे ९८ टक्के नाशिक महानगरपालिकेचे ७४ टक्के तर मालेगाव महानगरपालिकेचे ४८ टककेच काम पुर्ण झाले आहे.

     जिल्हा परिषदच्या अध्यक्षा शितल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते व आरोग्य सभापती यतींद्र पगार याचे मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सध्या राबविल्या जाणाऱ्या गोवर रूबेला लसीकरण मोहीम २०१८ अंतर्गत सर्व शाळांचे लसीकरण पूर्ण होत आले आहे. 

नाशिक जिल्हा ग्रामीण विभागाचे एकूण अपेक्षित शाळेतील मुलं मुली  एकूण लाभार्थी ११३९५४९ एवढे असून आत्तापर्यंत १०७४३९८ मुलामुलींचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे एकूण ९४  टक्के लसीकरणाचे काम  झाले असून मोहिमेच्या वेळी गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांचे लसीकरण  शेवटच्या टप्प्यात करण्यात येणार आहे.   अंगणवाडी विभागातील  व सर्व गावातील वाडी-वस्तीवरील  नऊ महिने ते सहा वर्ष वयोगटातील  सर्व बालकांना  अंगणवाडीमध्ये  लसीकरण सत्र राबवण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये  कोणत्याही प्रकारची  लसीकरण यांमधील गुंतागुंत  आढळून आलेली नाही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने  जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार  या मोहिमेचे  आयोजन व नियोजन  करण्यात आले आहे.  शाळेतील शिक्षक,  मुख्याध्यापक,  संस्थाचालक  यांनी चांगल्या पद्धतीने  या मोहिमेला  सहकार्य केले आहे.

या मोहिमेसाठी आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे हे नियमित जिल्ह्यामध्ये दैनंदिन फिरून नगरपालिका, उपकेंद्र,शाळा, येथील लसीकरणाला भेटी देत असून कार्यक्रमाची नियमित तळ पडताळणी करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!