कार्यारंभ आदेश आता जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर येणार ! ठेकेदार व पुरवठादारांनी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांकडे जाऊ वा भेटू नये, अडचण असेल तर अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदवावी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

            नाशिक –  जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणारे कामाचे आदेश आता जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार असून  याबाबतचे आदेश डॉ. नरेश गिते यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

       जिल्हा परिषदेच्या बांधकाम, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत विविध कामे करण्यात येतात. या विविध कामांचे कार्यारंभ आदेश पुरवठाधारकाबरोबरच सर्वसामान्य जनतेला उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्व आदेश प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सन २०१७-१८ तसेच २०१८-१९ मधील सर्व कार्यारंभ आदेश टाकण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर कार्यारंभ आदेश नावाने टॅब तयार करण्यात आला असून त्यावर भेट दिल्यास सर्व विभागांमधील कार्यारंभ आदेश पाहता येणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व पुरवठाधारकांना इ मेल व व्हॉटसअँपव्दारे कार्यारंभ आदेश देण्यात येणार असून यासाठी पुरवठाधारकांनी जिल्हा परिषदेशी संपर्क साधून संबंधित विभागांमध्ये  आपली माहिती कळवावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.
-----------------------------------------------------
==========================
बांधकाम (१) ला काल सायं. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली असता अनेक ठेकेदार विविध टेबलवरील कर्मचाऱ्यांशी चर्चा करीत असतांना सर्वांचीच तारांबळ झाली, ठेकेदारांना बांधकाम विभागातून बाहेर थांबण्यास सांगण्यात आले. थोड्याच कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ठेकेदारांची भेट घेउन अडचणी समजून घेत चर्चा केली, यापुढे आपणांस कोणत्याही कर्मचाऱ्यांस भेटण्याची आवश्यकता नाही मात्र तरीही काही अडचण आल्यास कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटावे असे सांगीतले, ठेकेदार शशिकांत आव्हाड यांवेळी हजर होते, त्यांच्याशी कार्यारंभ आदेश टँब बद्दल चर्चा करून तत्काळ आपल्या सर्व ठेकेदारांचे ई-मेल व व्हाटस्अँप नंबर कळविण्याबाबत सांगीतले.
----------------------------------------------------
==========================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते प्रदान ! "बातमी अशी कुठे असते का" ची घेण्यात आलेली दखल !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!