दोषी पोलिस अधिका-यांना तत्काळ निलंबित करा !!! सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा .....

     नाशिक : दोन दिवसांपूर्वी भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान युवक कॉंग्रेसच्या व कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलीस अधिकाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली असून भाजप सरकार पोलिसांच्या अडून  दडपशाही पद्धतीने आंदोलकांचा आवाज दडपण्याच्या प्रयत्न करत मारहाण करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी नाशिक शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. 

       सरकारच्याचुकीच्या धोरणांमुळे शेतकरी, व्यापारी, कामगार, उद्योगपती, मजूर , छोटे-मोठे व्यावसायिक, देशातील अनेक घटक अडचणीत असून पंतप्रधान दडपशाही भूमिकेमुळे आज सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आलेल्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आवाज दडपण्यासाठी भाजपचे सरकार पोलिसांना अंगावर सोडत असून सोलापूरला आणीबाणी सदृष्य परिस्थिती निर्माण केली गेली.   

           सीबीआय संचालकांच्या मध्यरात्री केलेली उचलबांगडी, कोणाशीही सल्ला मसलत न करता जाहीर केलेली नोटाबंदीचा निर्णय असो अथवा राफेलच्या बदललेल्या कंत्राटाच्या निर्णयावर पंतप्रधान व त्यांचे सहकारी यांची बोलती बंद झाली आहे.या प्रश्नांचा लोकशाही मार्गाने जाब विचारणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे त्याचा आम्ही निषेध करत असून युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी नाशिक शहर कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी व शहर पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन केली आहे त्यावेळी शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील , राष्ट्रीय रिसर्च कमिटीचे अभिजीत राऊत, किरण जाधव , सरचिटणीस धनंजय कोठुळे , पूर्व विधानसभा अध्यक्ष रोहन कातकाडे, मध्य विधानसभा अध्यक्ष जयेश सोनवणे , आकाश घोलप, सुरज चव्हाण, अजित गोवर्धने, संदीप शिंदे, राजेश पालीवाल, कपिल शिंदे, अक्षय घोटेकर, फारूक काद्री, तुषार गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !