पोस्ट्स

आज शिवजिजाऊ पुरस्कार वितरण ! खासदार उदयनराजे भोसले व नानासाहेब जावळे यांची प्रमुख उपस्थिती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

शिवजिजाऊ पुरस्कार व मराठामित्र सन्मान सोहळा!         नाशिक::---अखिल भारतीय छावा युवा संघटना यांच्यावतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व कोपर्डीच्या ताईसाठी लढणाऱ्या युवकांचा व भारतीय लष्करात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबायांचा राजमाता जिजाऊ भोसले यांच्या जयंती निमित्त 'शिवजिजाऊ पुरस्कार व मराठामित्र सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, नानासाहेब जावळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पवन नगर स्टेडियम नवीन नाशिक येथे आज दि.१९ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५:०० वा.आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवशाहीर सुरेश जाधव संभाजी नगर यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश गांगुर्डे, आशिष हिरे व आयोजकांनी केले आहे.

नासिकला रेल्वेच्या चाक निर्मिती व देखरेख कारखाण्याचे अनंत गिते व डाँ. सुभाष भामरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा साजरा ! खासदार हेमंत गोडसेंकडून वचनपूर्ती, ५३ कोटीच्या प्रस्तावास केंद्राच्या अर्थसंकल्पात मंजूरी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
           नासिक(१७)::--रेल्वेच्या व्हील निर्मिती (चाक निर्माण व देखरेख डेपो) कारखाना नाशिकमध्ये साकारण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार हेमंत गोडसे , तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व रेल्वेमंत्री पियुष गोयल, सचिव प्रविण गेडाम यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी केले.       रेल्वेच्या चाक निर्माण व देखरेख डेपोचे भूमिपूजन आज एकलहरे येथील कर्षण मशीन कारखाना येथे पार पडले. याप्रसंगी केंद्रीय अवजडउद्योग मंत्री अनंत गिते  बोलत होते. याप्रसंगी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे , खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.           यांवेळी अनंत गिते यांनी सांगीतले की, वर्षाला पाचशे रेल्वेचे चाके याठिकाणी बनणार आहेत. तसेच अनेक चाकांची दुरूस्ती व देखभाल होणार असल्याचेही ते म्हणाले. १९८१ मध्ये तत्कालिन रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी रेल्वे कर्षण मशिन  कारखान्यासाठी एकलहरे परिसरातील २५० एकर जागा आरक्षित केली होती, कर्षण मशिन च्या लागणाऱ्या जागेव्यतिरिक्त उर्वरीत जागेवर

नासिकला रेल्वेच्या चाक निर्मिती व देखरेख कारखाण्याचे अनंत गिते व डाँ. सुभाष भामरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा साजरा ! खासदार हेमंत गोडसेंकडून वचनपूर्ती, ५३ कोटीच्या प्रस्तावास केंद्राच्या अर्थसंकल्पात मंजूरी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

                 नासिक::-रेल्वेच्या व्हील निर्मिती (चाक निर्माण व देखरेख डेपो) कारखाना नाशिकमध्ये साकारण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार हेमंत गोडसे , तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व रेल्वेमंत्री पियुष गोयल, सचिव प्रविण गेडाम यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी केले.       रेल्वेच्या चाक निर्माण व देखरेख डेपोचे भूमिपूजन आज एकलहरे येथील कर्षण मशीन कारखाना येथे पार पडले. याप्रसंगी केंद्रीय अवजडउद्योग मंत्री अनंत गिते  बोलत होते. याप्रसंगी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे , खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.           यांवेळी अनंत गिते यांनी सांगीतले की, वर्षाला पाचशे रेल्वेचे चाके याठिकाणी बनणार आहेत. तसेच अनेक चाकांची दुरूस्ती व देखभाल होणार असल्याचेही ते म्हणाले. १९८१ मध्ये तत्कालिन रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी रेल्वे कर्षण मशिन  कारखान्यासाठी एकलहरे परिसरातील २५० एकर जागा आरक्षित केली होती, कर्षण मशिन च्या लागणाऱ्या जागेव्यतिरिक्त उर्वरीत जागेवर

जीएम पोर्टल शासकीय इ बाजारपेठ प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
     नाशिक::- महानगरपालिकेच्या वतीने महापालिकेतील कर्मचारी व अधिकारी यांचे साठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निर्देशानुसार जीएम पोर्टल शासकीय इ बाजारपेठ प्रणाली चे प्रशिक्षणाच्या बाबतीत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधनी संस्थेचे सहाय्यक संचालक बाबासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले. नाशिक महानगरपालिका मनपा, मुख्य मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील रेकॉर्ड हॉल येथे मनपा कर्मचाऱ्यांना  केंद्र शासनाने खरेदी प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता यावी यासाठी जीएम पोर्टल विकसित केले आहे.वस्तू व सेवा सुविधा  खरेदी / निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी या प्रणालीचा वापर शासन निर्देश प्रमाणे अनिवार्य असल्याने या  संबंधी  प्रशिक्षण आयोजित केले होते.  याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी संस्था संस्थेचे सहाय्यक संचालक, महसूल विभागाचे बाबासाहेब शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या विषयातील अनेक मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्

कार्यारंभ आदेश आता जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर येणार ! ठेकेदार व पुरवठादारांनी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांकडे जाऊ वा भेटू नये, अडचण असेल तर अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदवावी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
            नाशिक –  जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणारे कामाचे आदेश आता जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार असून  याबाबतचे आदेश डॉ. नरेश गिते यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.        जिल्हा परिषदेच्या बांधकाम, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत विविध कामे करण्यात येतात. या विविध कामांचे कार्यारंभ आदेश पुरवठाधारकाबरोबरच सर्वसामान्य जनतेला उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्व आदेश प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सन २०१७-१८ तसेच २०१८-१९ मधील सर्व कार्यारंभ आदेश टाकण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर कार्यारंभ आदेश नावाने टॅब तयार करण्यात आला असून त्यावर भेट दिल्यास सर्व विभागांमधील कार्यारंभ आदेश पाहता येणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व पुरवठाधारकांना इ मेल व व्हॉटसअँपव्दारे कार्यारंभ आदेश देण्यात येणार असून यासाठी पुरवठाधारकांनी जिल्हा परिषदेशी संपर्क साधून संबंधित विभागांमध्ये  आपली माहिती कळवावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे. ------

योग आणी भोग जीवनरूपी नाण्याच्या दोन बाजू आहेत ! दुर्गुणांना खड्यासारखे दूर करून जीवनशुद्धी शक्य-कंठभूषण संतोषगीरी महाराज !! विष्णूदास चारूदत्त यांच्या दत्तशुद्दीका चे प्रकाशन !!

इमेज
"कलियुगातील निरस जीवनाला दिशा देणारी दत्तशुध्दिका प्रकाशीत" दुर्गुणांना खड्यासारखे दूर करून जीवनशुध्दी शक्यः कंठभुषण संतोषगीरी महाराज         नाशिक/प्रतिनिधी::-योग आणि भोग जीवन रूपी नाण्याच्या दोन बाजू आहेत,त्या परस्परांशी एकरूप होऊ शकत नाहीत ,एकाचा दुसऱ्यावर प्रभाव पडतो तेंव्हा एक बाजू कमकुवत होते. आणि ज्या बाजूचा प्रभाव अधिक तसे मनुष्याचे जीवन घडते. हे वास्तव ज्ञान संदेश देणारी दत्त शुध्दिका कलियुगात  निरस बनलेला जीवनसार खमंग बनविण्यास  नक्कीच मार्गदर्शक ठरेल अशा शब्दात संतश्रेष्ठ मौनगीरी जनार्दन स्वामी-प.पू. माधवगीरी महाराज यांचे अनुयायी  कंठभुषण ह.भ.प. संतोषगीरी महाराज यांनी विष्णूदास चारूदत्त थोरात यांच्या हस्तलिखीत पुस्तिकेचे प्रकाशनाचे कौतूक केले. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून गुढ लिखाण करणारा चारूदत्तच्या हातून काही अदभूत साहित्य प्रसवले जात असल्याची जाणीव दि.१५ जुन २०१४ रोजी प्रथम मातापित्यांना झाली. त्या क्षणापासून आजवर शेकडो पुस्तके प्रकाशित होऊ शकतील एव्हढे हस्तलिखीत निर्माण झाले असून मकर संक्रांतीच्या पुर्वसंध्येला भोगीच्या मुहुर्तावर दत्तशुध्दिका नामक पुस्तिकेचे

दोषी पोलिस अधिका-यांना तत्काळ निलंबित करा !!! सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा .....      नाशिक : दोन दिवसांपूर्वी भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान युवक कॉंग्रेसच्या व कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलीस अधिकाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली असून भाजप सरकार पोलिसांच्या अडून  दडपशाही पद्धतीने आंदोलकांचा आवाज दडपण्याच्या प्रयत्न करत मारहाण करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी नाशिक शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.         सरकारच्याचुकीच्या धोरणांमुळे शेतकरी, व्यापारी, कामगार, उद्योगपती, मजूर , छोटे-मोठे व्यावसायिक, देशातील अनेक घटक अडचणीत असून पंतप्रधान दडपशाही भूमिकेमुळे आज सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आलेल्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आवाज दडपण्यासाठी भाजपचे सरकार पोलिसांना अंगावर सोडत असून सोलापूरला आणीबाणी सदृष्य परिस्थिती निर्माण केली गेली.               सीबीआय संचालकांच्या मध्यरात्री केलेली उचलबांगडी, कोणाशीही सल्ला मसलत न करता जाहीर केलेली नोटाबंदीचा निर्णय असो अथवा राफेलच्या बदलल